फार्सीभाषा: इराणात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये फार्सी भाषा हीच निःसंशय सर्वश्रेष्ठ आहे. एका महान संस्कृतीची आणि राजकीय परंपरेची ही भाषा अत्यंत साहित्यसंपन्न आहे. तिचा सर्वात जुना पुरावा आठव्या शतकाच्या प्रारंभीचा आहे. प्राचीन इराणीचा वारसा पुढे चालवणारी आणि पोटभाषांनी समृद्ध केलेली ही भाषा सुरुवातीपासूनच साहित्यनिर्मितीकडे वळली. फिर्‌दौसी (सु. ९४० – सु. १०२०) हा महाकवी पूर्वेकडील होता. आपल्या साहित्यात त्याने कटाक्षाने इराणी शब्दांचा वापर केला पण इतर लेखकांनी मात्र अरबी शब्दांना भरपूर वाव दिला. आजच्या फार्सीत तर इराणीपेक्षा अरबी शब्दच अधिक प्रमाणात आहेत.

 

ही वैभवसंपन्न भाषा पूर्वेकडे दूरवर पसरली आणि मोगल दरबारात तर ती नंतर राजभाषाच होती. आजही ती अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तुर्कस्तानातही ती प्रचलित आहे.

 

फार्सी भाषिकांची संख्या अडीच कोटींच्या आसपास आहे.

 

ध्वनिविचार : फार्सी भाषा अरबी लिपीचा उपयोग करते. मूळ अठ्ठावीस अक्षरांच्या या लिपीत फार्सीने चार अक्षरांची भर घातली असल्यामुळे ती बत्तीस अक्षरांची झाली आहे.

 

फार्सीची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

 

स्वर: अ, आ, इ, उ, ए, ओ.

व्यंजने: स्फोटक : क, क़, त, प, ग, ग़, द, ब.

                        अर्धस्फोटक : च, ज.

                        घर्षक : ख, फ, स, श, घ, व, झ, झ़, ह.

                        अनुनासिक : न, म.

                        द्रव : र, ल.

                       अर्धस्वर : य, व.

 

व्याकरण:नाम: अरबीतून आलेली नामे सोडल्यास खुद्द फार्सी भाषेत लिंग ही कल्पना नाही. कित्येकदा स्त्री-पुरुषवाचक शब्दच अगदी वेगळे असतात: पिदर्‘बाप’ – मादर् ‘ आई’, अस्ब् ‘घोडा’- मादियान् ‘घोडी’ इत्यादी. कित्येकदा पुल्लिंगदर्शक नर् व स्त्रीलिंगदर्शक मादेह् ही रूपे लावून हवा तो स्पष्टपणा अर्थात आणता येतो : गाव्इनर् ‘बैल’गाव्इमादेह ‘गाय’.

 

अनेकवचनाचे रूप वेगळे करण्यापलिकडे नामाला इतर कोणत्याही विकार होत नाही. संबोधनदर्शक उपयोग नामापूर्वी आइकिंवा नामानंतर हे रूप लावून होतो : आइमर्द् किंवा मर्द्आ ‘अरेमाणसा!

 

नामाचे अनेकवचन एकवचनाला हा हा प्रत्यय लावून होते : मर्द् ‘पुरुष’- मर्द्‌हा,झन् ‘स्त्री’ –झन्हा इत्यादी. प्राणिवाचक नामांना अनेकवचनी आन् हा प्राचीन प्रत्यय काही लेखक वापरतात : झन्-झनान्. पण बोलभाषेतून तो नष्ट झालेला आहे. स्वामित्व दर्शविण्यासाठी वस्तूला– हा प्रत्यय लावून त्यानंतर स्वामिवाचक रूप ठेवतात : किताब्- एआन्मर्द् ‘त्या माणसाचं पुस्तक’, बाघ्-ए-मन्झेल् ‘घराची बाग’.

 

विशेषण: विशेषण सामान्यपणे नामानंतर येते. व्यंजनान्त नाम असल्यास नाम व विशेषण इ या रूपाने आणि ते स्वरान्त असल्यास यि या रूपाने जोडली जातात : मर्दान्इनिक् ‘चांगले पुरुष’ किताब्‌हायिबुझुर्ग् ‘मोठी पुस्तके’. तुलनादर्शक व श्रेष्ठत्वदर्शक रूपे विशेषणाला अनुक्रमे–तर्व- तरिन् हे प्रत्यय लावून मिळतात : बुझुर्ग् ‘मोठा’, बुझुर्ग्‌तर् ‘जास्त मोठा’, बुझुर्ग्‌तरिन् ‘सर्वात मोठा’.

 

क्रियापद: धातूला तन्, दन् किंवा ईदन् हे प्रत्यय लागून क्रियावाचक रूप मिळते : दादन् ‘देणे’, गिरीफ्तन् ‘घेणे’,नविश्तन् ‘ लिहिणे’, खरीदन् ‘विकत घेणे’, इस्तादन् ‘उभे राहणे’, निशस्तन् ‘बसणे’, दीदन् ‘पहाणे’ इत्यादी.

 

सर्व क्रियापदांना लागणारे पुरुषवाचक प्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत : 

 

एकवचन

अनेकवचन

प्र.पु.-अम्

-ईम्

द्वि. पु. –ई

-ईद्

तृ. पु. –अद्

-अन्द्

   हेच प्रत्यय शब्दानंतर आल्यास ‘मी आहे’, इ. अर्थ व्यक्त करतात : बच्चेअम् ‘मी मूल आहे’, मर्द्ईद् ‘तू पुरुष आहेस.’ फक्त तृतीय पुरुष एकवचनी रूप अस्त् असे आहे. 


 

एकंदर क्रियापदव्यवस्था सोपी परंतु समृद्ध आहे. प्रत्ययपूर्व रूपे दोन आहेत. एक क्रियावाचकातून शेवटचा प्रत्यय पूर्णपणे काढून मिळते : कोश्तन् ‘ठार मारणे’-कोश्आवर्दन् ‘आणणे’-आवरखरीदन् ‘विकत घेणे’-खर्-. दुसरे या प्रत्ययातला फक्त-अन् हा भाग काढून मिळते : कोश्त्, आवर्द्, खरीद्. भूतकाळवाचक धातुरूप दुसऱ्या प्रकारे आणि वर्तमानकाळवाचक पहिल्या प्रकारे मिळते. सहाय्यक क्रियापदे, धातुसाधिते, उपपदे यांच्या साह्याने काळ व अर्थ यांची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात.

 

‘आहे’ या अर्थाचे स्वतंत्र क्रियापदही आहे. ते असे : 

 

 

एकवचन

अनेकवचन

प्र.पु.

हस्तम् ‘मी आहे.’

हस्तीम्

द्वि.पु.

हस्ती

हस्तीद्

तृ. पु.

हस्त्

हस्तन्द्

 पण क्रियापद म्हणून चालणारे ‘आहे‘ या अर्थाचे रूप बूदन् ‘असणे’, आज्ञार्थ बाश् ‘अस’, बाशीद् ‘असा’ हे आहे. त्याची काही रूपे पुढीलप्रमाणे:

 

वर्तमानकाळ

भूतकाळ

भविष्यकाळ

मीबाशम्

बूदम्

ख्वाहम् बूद्

‘मी आहे. ‘

‘मी होतो.’

‘मी असेन.’

मीबाशी

बूदी

ख्वाही बूद्

मीबाशद्

बूद्

ख्वाहद् बूद्

मीबाशीम्

बूदीम्

ख्वाहीम् बूद्

‘आम्ही आहो.’

मीबाशीद्

बूदीद्

ख्वाहीद् बूद्

मीबाशन्द्

बूदन्द्

ख्वाहन्द् बूद्

  


 

 खरीदन् ‘विकत घेणे’ या क्रियापदाची काही रूपे पुढीलप्रमाणे आहेत :

 

(आज्ञार्थ) बेखर ‘विकत घे.’ –बेखरीद ‘विकत घ्या.’ 

 

एकवचन

अनेकवचन

वर्तमानकाळ :

मीखरम्

मीखरीम्

मीखरी

मीखरीद्

मीखरीद्

मीखरीन्द्

भूतकाळ

खरीदम्

खरीदीम्

खरीदी

खरीदीद्

खरीद

खरीदन्द्

अपूर्ण भूतकाळ :

मीखरीदम्

मीखरीदीम्

मीखरीदी

मीखरीदीद्

मीखरीद्

मीखरीदीन्द्

भविष्यकाळ :

ख्वाहम् खरीद्

ख्वाहीम् खरीद्

ख्वाही खरीद्

ख्वाहीद् खरीद्

ख्वाहद् खरीद्

ख्वाहन्द् खरीद्

वर्तमानभूत :

खरीदे अम्

खरीदे ईम्

‘मी विकत घेतलं आहे.’

खरीदे ईम्

खरीदे ईद्

खरीदे अस्त्

खरीदे अन्द्

भूतभूत :

खरीदे बूदम्

खरीदे बूदीम्

‘मी विकत घेतलं होतं.’

खरीदे बूदी

खरीदे बूदीद्

खरीदे बूद्

खरीदे बूदन्द्

 


प्रत्ययपूर्व-अन् काढून टाकलेल्या छोट्या क्रियावाचक रूपाला-एह् हा प्रत्यय लावून भूतकाळवाचक धातुसाधित मिळते : खरीदन्-खरीदेह्बूदनबुदेह्. वर्तमानकालवाचक धातुसाधित धातुला-आन् हा प्रत्यय लावून मिळते. सहायक क्रियापदे बूदन्, शुदन्ख्वास्तन् ही आहेत. यांची धातूरूपे बाश्,शव्ख्वाह् ही आहेत.

 

सर्वनाम: पुरुषवाचक सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत : मन् ‘मी’ मरा ‘मला’ तु, तो ‘तू’ तुरा, तोरा ‘तुला’ वै, ऊ ‘तो, ती, ते’, ‘त्याला, तिला’ मामाहा ‘आम्ही, आम्हाला’ शुभा, शुमाहा‘तुम्ही, तुम्हाला’ ईशान् ‘ते, त्या, त्यांना’ (व्यक्तिवाचक), आन्हा ते, त्या ती, त्यांना’ (व्यक्तिवाचक व वस्तुवाचक).

 

वरिष्ठाशी बोलताना किंवा नम्रता दाखविण्यासाठी मन्ऐवजी बन्द सेवक, मुख्‍लीस् ‘भक्त’, इख्‍लास्कीश् ‘परमभक्त’, कमतरीन् ‘क्षुद्रतम’ हे शब्द पुरूषाकडून तर कनीझ् इ. शब्द स्त्रीकडून वापरले जातात: ईनबन्दचितक्शीर्दारम्‘या सेवकाने (मी) काय गुन्हा केला?’

 

याशिवाय कर्ता सोडून इतर कार्यासाठी पुढील रूपे क्रियापदाला जोडून वापरण्यात येतात : अम्, ‘मला, माझा’ अत् ‘तुला, तुझा’ अश् ‘त्याला, तिला, त्याचा, तिचा’ अमान्, इमान् ‘आम्हाला, आमचा’ अतान्, इतान् ‘तुम्हाला, तुमचा’ अशान्, इशान् ‘त्यांना, त्यांचा’: खानेह्अम् ‘माझं घर’ झदमश् ‘मी त्याला मारलं’ गुफ्तन्दशान् ‘ते त्यांना म्हणाले’ अस्बत्-रादीदम् ‘मी तुझा घोडा पाहिला’.

 

दर्शकसर्वनामे: ईन् ‘हा, ही, हे’ – ईन्‌हा, ‘हे ह्या ही’ आन् ‘तो, ती, ते’ –आन्‌हा ‘ते, त्या, ती’. ईन्मीझ् ‘हे टेबल’, आन्किताब् ‘ते पुस्तक’.

 

प्रश्नवाचकवसंबंधीसर्वनामे : किह् ‘कोण’ व चिह् ‘काय’ ही प्रश्नवाचक तशीच संबंधी सर्वनामेही आहेत. संबंधी सर्वनामांना विभक्तिदर्शक प्रत्यय लागत नाहीत. प्रश्नवाचक किह्चे अनेकवचन कियान् आहे : आन्किताबिकिस्त् ‘ते पुस्तक कोणाचे आहे?’ –किरादीदीद् ‘तुम्ही कोणाला पाहिलंत?’ –ईशान्कियान्अन्द् ‘ते कोण आहेत?’ –झनीकिह्ऊरादीदीद् ‘जी बाई तुम्ही पाहिलीत’… –बच्चेहईकिह्किताबरादादीद् ‘ज्या मुलाला तुम्ही पुस्तक दिलंत’….

 

स्ववाचकसर्वनामे : सर्व पुरूषांत आणि दोन्ही वचनांत ख्वुद् ‘स्वतः ‘ हे सर्वनाम वापरले जाते. त्याचे पर्यायी रूप ख्वीश्हे आहे पण या रूपाला विभक्तिदर्शक प्रत्यय लागत नाहीत. ख्वुद् (किंवा मन्ख्वुद्‍ किंवा मन्ख्वुद्‍म्किंवा ख्वुद्इमन् किंवा ख्वुदम्) बिशहर्मीखम् ‘मी स्वतः गावात जातो आहे.’ ख्वुद् (किंवा तोख्वुद्इ.) ऊरादीदी ‘तू स्वतः त्याला पाहिलंस’-ख्वुद् (किंवा ऊख्वुद्इ.) आन्‌रागुफ्त ‘त्यांनी स्वतःच ते सांगितलं.’ याचप्रमाणे ख्वुद् किंवा माख्वुद्, शुभाख्वुद्, ईशान्ख्वुद्ही अनेकवचनी रूपे वापरली जातात.

 

प्रश्र : हो-नाही उत्तराचा प्रश्र साध्या वाक्यामागे आया हे प्रश्रवाचक लावून होतो : आयाईनकिताब्अस्त् ‘(ते) हे पुस्तक आहे का?’ इतर प्रश्र कुजा ‘कुठे’, वक्तीकिह् ‘केव्हा’, चिरा, अझ्चिह्सबब् ‘का, कोणत्या कारणाने’, इ. प्रश्रवाचके वापरून बनतात.

 

नकार: नकारार्थी क्रियापदापूर्वी न हा उपसर्ग लागतो : नबूदम् ‘मी नव्हतो’, नमीबाशम् ‘मी नाही’ , नखर् ‘विकत घेऊ नको’. आज्ञार्थी ऐवजी हे उपपदसुद्धा लागते : मखर् ‘विकत घेऊ नको.’ 


 

संबंधदर्शक : काही संबंधदर्शक शब्द पुढीलप्रमाणे : अझ् ‘पासून’, पेक्षा , बी, ब‘ला, साठी, ने बर् ‘वर’, ता ‘पर्यंत’, बिला ‘शिवाय, विना’ (बिलाशक्क् ‘निःशंक, बेलाशक’).

 

काहीउभयान्वयीअव्यये : व, ओ ‘व आणि’ या ‘किंवा’ मगर ‘पण’, झीराकिह् ‘कारण’, वगर ‘आणि जर’.

 

काहीउद्‍गारवाचके : अइ ‘अरे’, अफ्‌स्‌स‘ अरेरे’, बह्‌बह् ‘वाहवा, शाबास.’

 

संख्यावाचके: सिफ्र् ‘शून्य’, यक्, येक्, ‘एक’ , दु ‘दोन’, सि ‘तीन’, चहार्, चार, ‘चार’, पंज्, ‘पाच’, शश्, शीश् ‘सहा’, हफ्त् ‘सात’, हश्त् ‘आठ’, नुह् ‘नऊ, दह् ‘दहा’, बीस्त् ‘वीस’, बीस्त्उथक् ‘एकवीस’, सद् ‘शंभर’, हझार् ‘हजार’, सद्हझार् ‘लाख’, कुरूर् ‘कोटी’. संख्येला उम् हा प्रत्यय लावून क्रमवाचक होते, यकुम् पहिला (अरबी अव्वल्). अपूर्णांकात नीम् अर्धा, चहार्यक् एक चतुर्थांश, हश्त्यक् एक अष्टमांश इत्यादी.

 

काहीवाक्ये: पिदर्पीर्अस्त् ‘बाप म्हातारा आहे.’ मादर्जवान्अस्त् ‘आई तरुण आहे.’ चंदनफरहाझिर्बूदन्द् ‘किती लोक हजर होते?’ आन्‌राचिह्तौर्मीकुनीद् ‘ते तुम्ही कसं करता?’ कलम्‌रादस्त्गिरीफ्तेह्बूदम्वमीख्वास्तम्काघझ्राबिनवसीम्, किह्शुभाआमदीद् ‘मी हातात लेखणी घेतली होती आणि मी लिहीणार तोच तुम्ही आलात. ‘

 

                        हर् किरा ताऊस् बायद् जौर्-इ हिंदुस्तान् कशद्

                        हर्किरामहबूब्बायद्कुन्दउझिन्दान्कशद्-सादी

 

‘ज्या कोणाला मोर हवा असेल त्याने हिंदुस्थानचा प्रवास सहन केला पाहीजे. ज्या कोणाला प्रेयसी हवी असेल त्याने बेड्या आणि बंदिवास सहन केला पाहिजे.’

 

टीप :  फार्सी भाषेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात अरबी भाषेतील रूपे व प्रयोग आढळतात. त्यांचे व्याकरणही स्वतंत्र आहे. त्याचा विचार या लेखात केलेला नाही.

 

संदर्भ: 1. Lamblon, Ann. K. S. Persian Grammar, Cambridge, 1967.

         2. Meillet, A., Cohen, M. Les Languse du monde, Paris 1952.

         3. Phillot, Lieat, Colonel, D. C. Higher Persian Grammar, Calcutta, 1919.

         4. St. Clair-Tisdall, The Rev. W. Modern Persion Conversation Grammar, Heidelberg, 1923.

 

कालेलकर, ना. गो.