फोंडे  :  गोवे केंद्रशासित प्रदेशात असलेला एक भुईकोट किल्ला .  बेळगाव – पणजी मार्गावर पणजीपासून आग्‍नेयीस सु .  २५ किमी .  अंतरावर वसला आहे .  मराठ्यांनी याला मर्दनगड हे नाव दिले होते .  सध्या हा किल्ला प डीक स्थितीत असून त्यात एक दर्ग्याशिवाय दुसरी कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आढळत नाही .  पूर्वी त्याला खाडीचा खंदक होता .  सोळाव्या शतकात हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही अंमलाखाली होता .  इ . स .  १५१६ मध्ये तेथील किल्लेदार अं कू शखान याच्याकडून तो बळकावण्याचा अयशस्वी प्रयत्न पोर्तुगीजांनी केला .  पुढे आदिलशाही तक्ताचा एक वारस मल्लूखान यास पोर्तुगीजांनी फोंड्यास आदिलशाही सुलतान बनविण्याचा प्रयत्न केला पण तो फसून पोर्तुगीजांना फोंडे सोडावे लागले .  पुन्हा फोंडे पोर्तुगीजांनी हस्तगत केले  ( १५५७ ).  त्यानंतर १५७० – ७१ मध्ये पहिल्या अली आदिलशाहने  ( कार .  १५५७ – ८० )  फोंड्यास तळ ठोकून गोवे जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही .  नंतर फोंडे पोर्तुगीजांनी पुन्हा हस्तगत केले  ( १६७३ ).  शिवाजी महाराजांनी १६  मे १६७५ रोजी फोंडे हस्तगत करून तेथे त्रिंबक पंडित यास सुभेदार नेमले .  छ .  संभाजीच्या वेळेसही तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता .  संभाजीने तेथे तळ ठेवून गोव्यावर स्वारी केली होती  ( १६८३ ).  तेथील सरदेसाई दुल बा जी नाईक प्रतापराव हा पोर्तुगीजांस फितूर झाला ,  तेव्हा पोर्तुगीजांनी फोंडे जिंकण्याचा प्रय त्‍न केला पण येसाजी कंकाचा मुलगा कृष्णाजी कंक  ( त्यालाच संभाजीने येसाजी हेच नाव ठेविले )  याने पराक्रमाची शर्थ करून किल्ल्याचे संरक्षण केले .  संभाजीच्या वधानंतरच्या काळात  ( १६८९ )  हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला पण १७३९ च्या सुमारास मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला .  वसईच्या तहाने  ( ११ सप्टेंबर १७४१ )  पोर्तुगीजांनी किल्ल्यावर आक्रमण न करण्याचे मान्य केले असतानाही त्याच वर्षी तो त्यांनी बळकाविला .  पुढे तो किल्ला त्यांनी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील सोंध्याच्या संस्थानिकास दिला .  सोंधेकरांनी तो किल्ला मराठ्यांना दिला असता पोर्तुगीजांनी १७५६ मध्ये तो पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रय त्‍न केला .  त्या प्र यत्‍ना त पोर्तुगीज व्हाइसरॉय फ्रा न्सिस्कू  द आसीस  ( कार .  १७५४ – ५६ )  मारला जाऊन तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला .  पुढे बारभाईंच्या कारभाराच्या कालखंडात  ( १७७३-८२)   सावंतवाडीचे सावंत ,  सोंधेकर व पोर्तुगीज यांच्यातील हेव्यादाव्यांमुळे तो किल्ला या त्रिकुटापैकी एकाच्या ताब्यात रहात गेला आणि इंग्रजी अंमल सुरू होण्याच्या वेळी तो किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता .  भारताने पोतुर्गीज प्रदेश जिंकून घेईपर्यंत  ( १९६० )  तो त्यांच्याकडेच होता .

 संदर्भ  : 1. Danvers, F. C. The Portuguese in India, 2. Vol s . ,  London, 1966.

           2 .  पिसु र्लें कर ,  पां .  स .  पोर्तुगेज  –  मराठे संबंध ,  पुणे ,  १९६७.

 खरे ,  ग .  ह .