फैजमहंमद खाँ : ( सु . १८३५ –१९२० ) : हिंदुस्थानी संगीतातील एक प्रख्यात गायक . उत्तम उस्ताद असाही त्यांचा लौकिक होता . त्यांच्या घराण्यातच गानविद्या होती . त्यांचे वडील उस्ताद फतेह महंमद खाँ तसेच लखनौच्या प्रख्यात नत्थन पीरबक्षांचे चिरंजीव उस्ताद कादिर बक्ष आणि विद्वान गायक ग ग्गे खुदाबक्ष यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे घेतले . ते बडोदे संस्थानाचे दरबारी गायक व तेथील संगीताच्या सरकारी पाठशाळेचे १८८९ पासून संचालक होते . फैजमहंमद यांची गायकी कठीण होती , त्यांचा सू र स च्चा नि रंगदार होता , त्यांचे अस्ताई – अंतरे अजब तरकिबीचे होते . त्यांचे राग – चलन बुद्धिप्रधान , ठाय लयीतले , कायद्याने व सुरांगाने बांधलेले आ लापीप्रधान होते . त्यांच्या गमक – गायकीत विशेष वजन जाणवे . त्यांचे आलाप व तानपलटे लयीच्या डौलदार वजनात बांधलेले असत . त्यांची गायकी ग्वाल्हेर घराण्याची मानली जाते . पं . भास्करबुवा बखले , पं . गोविंद प्रसाद , निगोजकरबुवा , हंसाबाई , रोकडनाथ , राजरत्न तांबे वकील इ . थोर कलावंत त्यांच्या शिष्यपरिवारात होते . आग्रा घराण्याचे रंगीले गायक फैयाझ खाँ यांचे ते सासरे होत.
जठार , प्रभाकर