फेर्मा, प्येअरद :  ( १७ ऑगस्ट १६०१ ?–  १२  जानेवारी १६६५ ).  फ्रेंच गणितज्ञ .  ⇨ संख्या सिद्धांता तील महत्त्वाच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध .  फेर्मा यांच्या जीवनाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे .  त्यांचा जन्म बो माँ – द – लोमान्या येथे झाला .  तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते कदाचित तुलूझ विद्यापीठात व पुढे बॉर्दो येथे कायद्याच्या शिक्षणासाठी गेले .  १६३१ मध्ये त्यांनी ऑर्लेआ विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली व तू लूझ येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला .  १६४८ मध्ये तूलूझच्या संसदेत राजाचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली व या जागेवर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले .  फ्रेंच ,  ग्रीक ,  लॅटिन ,  इटालियन व स्पॅनिश या भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या आणि प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासाविषयी ते प्रसिद्ध होते .  गणित हा केवळ त्यांच्या व्यासंगाचा विषय होता .

   फेर्मा यांच्या गणितातील संशोधनाची माहिती त्यांच्या इतर गणितज्ञांबरोबर झालेल्या पत्रव्यवहारातून मिळते .  बॉर्दो येथे असतानाच त्यांनी ⇨ फ्रां स्‍वा व्‍ह्ये ता यांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला .  व्‍ह्ये ता यांच्या समीकरण सिद्धांतावरील लेखनाचा फेर्मा यांनी आपल्या संशोधनात बराच उपयोग केला .  त्यांनी भूमिती व अंकगणित  ( संख्या सिद्धांत )  या दोन्हींच्या अभ्यासात चिन्हांकित बीजगणित हे साधन म्हणून वापरले .  बीजगणितीय समीकरण हे त्यातील अज्ञात संज्ञा रेषाखंड अथवा संख्या निदर्शित करीत असतील त्यानुसार या शाखांमध्ये अर्थवाही होते .  फेर्मा व ⇨ रने देका र्त या दोघांनी वैश्लेषिक भूमितीचा  [ ⟶ भूमिति ]  शोध जवळजवळ एकाच वेळी स्वतंत्रपणे लावला  परंतु फेर्मा यांनी ‘ फ  ( क्ष ,  य ) =  ० हे समीकरण क्ष – य प्रतलातील वक्र निर्देशित करते ’  या वैश्लेषिक भूमितीतील मूलभूत तत्त्वाचा १६२९ मध्ये लावलेला आपला शोध प्रसिद्ध केला नाही .  फेर्मा यांनी आपल्या द्विमितीय वैश्लेषिक भूमितीच्या अभ्यासाच्या पद्धती त्रिमितीय भूमितीच्या अभ्यासाकरिता वापरण्याचा प्रयत्न केला  पण तो यशस्वी झाला नाही .  याच सुमारास त्यांनी बहुपदींच्या कमाल व किमान मूल्यांसंबंधी चर्चा करताना फ  ( क्ष ) ची सापेक्ष कमाल व किमान मूल्ये,

 शून्याप्रत जाऊ देऊन

 (क्ष+ह) –फ(क्ष)

 = ०

 

 यावरून  काढता येतात असे दाखविले .  हे विधान फ ‘ ( क्ष )  =  ० या आधुनिक समीकरणाशी समानार्थी आहे  [ ⟶ अवकलन व समाकलन ].  फेर्मा यांनी कमाल व किमान मूल्यांच्या विवेचनाकरिता भूमितीमधील समस्या निवडल्या आणि त्रिघातापेक्षा जास्त घाताच्या बहुपदी विचारात घेतल्या नाहीत ,  तसेच स्थानिक व सार्वत्रिक कमाल अथवा किमान मूल्ये यांतील फरक त्यांच्या लक्षात आला नाही .  मात्र कमाल व किमान मूल्यांच्या विवेचनातून त्यांनी दोन महत्त्वाचे उपसिद्धांत मांडले .  एक वक्राला छेदिकेची सीमा म्हणून स्पर्शिका काढण्याबद्दलचा  [ या रीतीवरूनच न्यूटन यांनी  ‘ फ्लक्शन ’  ही संकल्पना मांडली  ⟶ कलन ]  आणि दुसरा भूमितीय आकृतींचा ⇨ गुरुत्वमध्य काढण्याबद्दलचा .  क्षेत्र समाकलनामध्येही फेर्मा यांनी संशोधन करून य  =  क क्ष आणि क्ष य  =  क यांसारख्या वक्रांचे क्षेत्र समाकलन करण्याची रीत मांडून दाखविली .  त्यांनी ⇨ शंकुच्छेदांची समीकरणेही मांडली होती .

   फेर्मा यांनी संख्या सिद्धांतात केलेल्या बहुमोल संशोधनामुळे त्यांचे काही निष्कर्ष या शाखेत पायाभूत ठरलेले आहेत .  संख्या सिद्धांतात फक्त पूर्णांकच विचारात घ्यावयाचे ही प्रथा प्रथम त्यांनीच घालून दिली .  यामुळे त्यांच्या संख्या सिद्धांतातील संशोधनात ⇨ अविभाज्य संख्या आणि विभाजकता यांना प्राधान्य मिळाले .  त्यांनी १६४० मध्ये पुढील प्रमेय मांडले  :  क संयुक्त संस्था  ( म्हणजे १ व ती संख्या यांशिवाय इतर संख्यांनीही जिला भाग जातो अशी संख्या )  असल्यास २क  –  १ ही संख्या संयुक्त असते ,  क अविभाज्य असल्यास २क – १ ही संख्या अविभाज्य किंवा संयुक्त असते संयुक्त असल्यास तिचे अवयव २ म क  +  १  अशा स्वरूपात असतात .  त्यांचे दुसरे एक प्रसिद्ध प्रमेय म्हणजे प अविभाज्य व अ चा अवयव नसल्यास  अ(प-१)  = १  ( मापी प ).  २२  प +  १  ( प  =  ० ,  १ ,  २ , ……)  या संख्या  (‘ फेर्मा संख्या ’)  अविभाज्य आहेत ,  असा अंदाज त्यांनी मांडला होता परंतु प  =  ५ असल्यास तो खोटा आहे ,  असे लेनर्ड ऑयलर यांनी दाखवून दिले .  संख्या सिद्धांतातील द्विघाती अवशेष ,  द्विघाती रूप वगैरे महत्त्वाच्या संकल्पनांची बीजे फेर्मा यांच्या संशोधनात आढळतात .  त्यांचे अतिशय गाजलेले विधान म्हणजे क्षप  +  यप  =  झप या समीकरणाला प &gt  २ असल्यास निर्वाह  ( समीकरण सोडवून मिळणारे उत्तर )  नसतो .  या विधानाची सिद्धता त्यांच्या टिपणांमध्ये सापडत नाही . ‘ याची सिद्धता मला सापडलेली आहे ’,  एवढीच नोंद त्यांनी करून ठेवलेली आहे .  त्यांच्या नंतरच्या ऑयलर ,  ए .  एम् ‌.  लझांद्र ,  जे .  एल् ‌.  लाग्रांझ ,  ई .  ई .  क्युमेर वगैरे अनेक गणितज्ञांनी हे विधान प च्या काही विशिष्ट मूल्यांकरिता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप कोणालाही या विधानाची व्यापक सिद्धता देण्यात यश आलेले नाही .  हे विधान खोटे ठरविणारे उदाहरणही कोणाला देता आलेले नाही .  यामुळे ⇨ गणितातील अनि र्वा हित प्रश्नां मध्ये त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे .  या प्रमेयाला  ‘ फेर्मा यांचे शेवटचे व हरवलेले प्रमेय ’  असे संबोधितात .

   फेर्मा यांनी संभाव्यताशास्त्रात केलेल्या संशोधनावरून ब्लेझ पास्काल यांच्याबरोबरच त्यांनाही या शास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय देण्यात येते .  प्रकाशकीमध्ये त्यांनी प्रणमनाच्या  ( एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशाची दिशा बदलते या आविष्काराच्या ) नियमाची गणितीय व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी  ‘ प्रकाशाचा वेग तो ज्या माध्यमातून जातो त्याच्या विरलतेनुसार बदलतो ’  हे गृहीत धरले होते .  हे गृहीत नंतरच्या काळात फार महत्त्वाचे ठरले . 

 फेर्मा हे त्यांच्या काळातील असामान्य गणितज्ञ होत  परंतु त्यांच्या प्रसिद्धी पराङ् ‌ मुखतेमुळे त्यांचा योग्य प्रभाव पडू शकला नाही .  त्यांचा Opera Mathematica हा ग्रंथ त्यांच्या मुलाने दोन खंडांत संपादित करून १६७० – ७९ मध्ये प्रसिद्ध केला .  पॉल टॅनरी व चार्ल् ‌ स हे न्‍री यांनी फेर्मा यांचे कार्य Oeuvres  ( चार खंड व पुरवणी ,  १८९१ – १९२२ )  या शीर्षकाखाली संपादित केले .  फेर्मा कास्‍त्र येथे मृत्यू पावले .

 ओक ,  स .  ज .  मिठारी ,  भू .  चिं.