अवधूत : साधूंच्या एका वर्गास ही संज्ञा आहे. ‘अवधूत’ म्हणजे प्रकृतीच्या सर्व विकारांना धुवून टाकतो तो. ‘औधूत’, ‘अव्धूत’, ‘अब्धूत’ असेही अपभ्रंश आढळतात. त्यांच्यात शैव व वैष्णव असे दोन संप्रदाय आहेत. शैव अवधूत अतिशय विरक्त आहेत. कानफाट्यांप्रमाणे [→ कानफाटे] ते ðगोरखनाथाला आपला गुरू व पंथ संस्थापक मानतात. काही दत्तात्रेयास आपले उपास्य दैव त मानतात. अवधूतगीतादत्तात्रेयाने गोरखनाथास उपदेशिली, अशी नाथ व दत्तसंप्रदायी भाविकांची धारणा आहे. ðदत्तात्रेयास व गोरखनाथासही ‘अवधूत’ ही उपाधी लावली जाते.
रामानंदाने रामानुजाच्या अनुयायांनी एक नवा सर्वबंधमुक्त वैष्णव संप्रदाय स्थापून दिला व त्यांच्यासाठी ‘अवधूत’ ही संज्ञा योजिली. अवधूत वृत्तीच्या काही स्त्रियाही आहेत. त्या पुरुषवेषात राहतात. त्यांना ‘अवधूती’ म्हणतात.
पहा : दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय.
सुर्वे, भा. ग.