आणवीय द्रव्यमान एकक : अणू व मूलकणांचे द्रव्यमान मोजण्यासाठी योजलेले खास एकक. संक्षिप्त चिन्ह ए. एम. यू. (‍ॲटॉमिक मास यूनिट). भौतिकीनुसार, १ ए. एम. यू. = ऑक्सिजन (१६) अणूचे द्रव्यमान/१६. रसायनशास्त्रानुसार, १ ए. एम. यू. = ऑक्सिजन अणूचे सरासरी द्रव्यमान/१६. या दोन व्याख्यांनुसार मिळणाऱ्या ए. एम. यू. च्या मूल्यात सूक्ष्म तफावत येते. तीमुळे उत्पन्न होणारे घोटाळे टाळण्यासाठी १९६० मध्ये u या चिन्हाने दर्शविण्यात येणारे हे एकच एकक निश्‍चित करण्यात आले आहे व त्याची व्याख्या खालीलप्रमाणे देण्यात येते:

१ u = कार्बन (१२) अणूचे द्रव्यमान/१२.

पुरोहित, वा. ल.