अर्जुन : पाच पांडवांपैकी तिसरा पांडव. पांडुपत्नी कुंतीस इंद्रापासून झालेला पुत्र. धनंजय, इंद्रसुत, फाल्गुन इ. नावे त्याला आहेत. द्रोणाचार्यांचा तो पट्टशिष्य होता. त्याला शंकरापासून पाशुपतास्त्र, परशुरामापासून शस्त्रविद्या व अग्नीकडून ‘गांडीव’ धनुष्य तसेच इंद्र, वरुण, यम व कुबेर यांच्यापासून विशिष्ट शस्त्रांची प्राप्ती झाली होती. भारतीय युद्धारंभी विषण्णावस्थेतील अर्जुनास सारथी कृष्णाने गीता सांगितली व युद्धप्रवृत्त केले. नर-नारायणांपैकी त्याला नराचा अवतार मानतात. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा व उलूपी ह्या चार पत्न्यांपासून त्याला अनुक्रमे श्रुतकीर्ती, अभिमन्यू, बभ्रुवाहन व इरावान हे पुत्र झाले. भारतीय युद्धात कर्ण, जयद्रथ, भीष्मादी कौरववीरांना त्याने मारले. हा पांडवांसोबत महाप्रस्थान करीत असता मरण पावला.
केळकर, गोविंदशास्त्री
“