अपप्रेरक : एखादा गुन्हा करण्याकरिता जो साह्य, उत्तेजन किंवा प्रेरणा देतो, तो  ‘अपप्रेरक’ होय. अपप्रेरित कृत्य न घडले, तरी अपप्रेरणा हा स्वतंत्र गुन्हा मानला जातो. अपप्रेरित कृत्य करणारी व्यक्तीदेखील एखादे वेळी निरपराध ठरू शकते परंतु अपप्रेरिकाला मात्र कायदा दोषमुक्त मानीत नाही. उदा., अपप्रेरणेमुळे विषप्रयोग करणारे अज्ञान मूल निर्दोष मानले गेले, तरी अपप्रेरक दंडनीय ठरतो. प्रत्यक्ष गुन्ह्याला जी शिक्षा निर्धारलेली असते, तीच साधारणत: अपप्रेरकाला होते. अपप्रेरित गुन्हा न घडता अपप्रेरणोद्भव असा भिन्न गुन्हा घडला, तरी अपप्रेरक दंडपात्र गणला जातो.

   

   कवळेकर, सुशील