अणुकेंद्र: अणूमधील सर्व धन विद्युत् भार व बहुतेक सर्व द्रव्यमान ज्याच्यात केंद्रित झालेले असते तो अणूचा गाभा. यात प्रोटॉन (धन विद्युत् भारित कण) व न्यूट्रॉन (विद्युत भाररहित कण) असतात. उदा., २३८ अणुभार असलेल्या युरेनियमाच्या अणुकेंद्रात ९२ प्रोटॉन व २३८–९२ = १४६ न्यूट्रॉन असतात. संपूर्ण अणूच्या तुलनेने अणुकेंद्राचे आयतन (घनफळ) अत्यल्प असते म्हणून त्याची घनता फार प्रचंड (२·५ ×१०१७ किलोग्रॅम प्रतिघनमीटर) असते. सामान्य विक्रियांत अणुकेंद्र अभंग राहते.
पहा : अणुकेंद्रीय भौतिकी.
पुरोहित, वा. ल.
“