अग्निदलिक खडक : ज्वालामुखीच्या स्फोटक उद्गीरणात बाहेर पडलेले घन पदार्थ साचून तयार झालेल्या राशींस ‘अग्निदलिक खडक’ म्हणतात. या खडकांपैकी धुळीसारखे सूक्ष्म कण असणाऱ्‍यांस  ज्वालामुखी राख म्हणतात. ज्वालामुखी राखेची राशी थरासारखी व एकत्र चिकटलेल्या कणांची असली म्हणजे तिला ‘टफ’ म्हणतात. ज्वालामुखीतून बाहेर फेकल्या गेलेल्या वाटाण्यापासून तो लिंबाएवढ्या आकारमानाच्या पदार्थास लॅपिली म्हणतात. मोठे अणुकचिदार तुकडे व ज्वालामुखी राख मिळून बनलेल्या खडकाला ‘ॲग्लोमरेट’ म्हणतात. अग्निदलिक खडकांचा समावेश अग्निज खडकात करीत नाहीत, गाळांच्या खडकात करतात.

 

पहा: ज्वालामुखी-२

 

ठाकूर अ. ना.