अलका : महाभारतात उल्लेखिल्याप्रमाणे कुबेराची राजधानी. भागवतातील निर्देशाप्रमाणे ही कैलास पर्वतावर नंदा व अलकनंदा या नद्यांच्या दरम्यान होती. हिचे ‘अलकनंदा’ असेही नामांतर आढळते. बौद्ध साहित्यात मात्र हे नगर उत्तर कुरू देशामध्ये असल्याचा उल्लेख आहे. बौद्ध साहित्यात ‘अलकंदा’ म्हणजे ‘समृद्ध नगर’ असा एके ठिकाणी, तर दुसऱ्‍या ठिकाणी ‘मनुष्यवस्तीने गजबजलेले नगर’ असाही, त्याचा अर्थ दिला आहे. महाभारतात अलका नगरीतील एका पुष्करिणीलाही हेच नाव दिलेले आढळते. तसेच ते एक ब्रह्मदेवस्थान असून तेथील ब्रह्मदेवाचे नाव धनाधिप होते.

 

शाह, र, रू. जोशी, चंद्रहास