अल्गाँक्वियन : भूविज्ञानातील आर्कियन कालानंतरच्या व कँब्रियन कालाच्या आधीच्या कालविभागाचे व त्या कालविभागात तयार झालेल्या खडकांच्या गटाचे नाव. कॅनडातील सुपीरियर सरोवर असलेल्या प्रदेशातील खडकांना हे नाव तेथील पूर्वीच्या रहिवाशांच्या नावावरून दिले गेले. कॅनडातील अल्गाँक्वियन गट मुख्यतः क्वॉर्ट्‌झाइट व चुनखडक यांचा असून त्याच्यात लोहाच्या व तांब्याच्या धातुपाषाणांचे मोठे साठे आहेत. भारतातील ⇨  कडप्पा संघाचे व इतर काही खडक अल्गाँक्वियन कालातले असावे.

केळकर, क. वा.