सिंटर : हा एक रासायनिक गाळाचा खडक आहे. ⇨ खनिजजला तीलखनिजांचे अवक्षेपण होऊन म्हणजे ती साक्याच्या रुपातसाचून सिंटर खडक तयार होतो. याचे सिलिकामय व कॅल्शियमयुक्त(चूर्णीय) हे दोन मुख्य प्रकार वा गट आहेत. सिंटरचा पोत सैलसर, सच्छिद्र किंवा कुहरी (पोकळ्यायुक्त) असतो. 

सिलिकामय सिंटरला गायझराइट किंवा फिओराइट म्हणतात. यातीलसिलिका सजल वा निर्जल असून ती ⇨ ओपल   सदृश्य किंवा चूर्णरुपअसते. सिंटर गरम पाण्याच्या झऱ्यांभोवती [ ⟶ उन्हाळे] व गायझरांभोवती [⟶ गायझर] लेपाच्या वा पुटाच्या रुपात, कधीकधी शंकूसारख्या आकाराच्या उंचवट्यांच्या (गायझर शंकूंच्या) रुपात किंवापायऱ्यांसारख्या रचनेच्या वेदिकांच्या (गच्च्यांच्या) रुपात रासायनिकअवक्षेपणाद्वारे निर्माण होतो. मुख्यतः उष्ण पाण्यातील शैवले अथवाइतर वनस्पतींच्या क्रियेद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे सिंटर निक्षेपित होतो(साचतो). ⇨ धूमुखांलगत व गरम पाण्याच्या झऱ्यांच्या अधिकखोलवर असलेल्या नालींमध्येही सिंटर निक्षेपित होतो. तेथील भिंतींच्याखडकांत बदल होऊनही हा तयार होऊ शकतो. गायझरांच्या नलिकांभोवती व छिद्रांभोवती सिंटर अस्तरासारखा आणि लगतच्या जमिनीच्यापृष्ठभागावर याचा फुलकोबीसारखा लेप साचतो. ताउपो (न्यूझीलंड)येथील उन्हाळ्यांभोवती हा मोठ्या प्रमाणावर आढळतो. अमेरिकेतील‘यलोस्टोन नॅशनल पार्क’ (वायोमिंग) व ‘स्टीमबोट स्प्रिंग्ज’ (कोलोरॅडो)येथील गायझरे व उन्हाळी आणि आइसलँडमधील (मौंट हेक्लाच्यावायव्येस) गायझरे या ठिकाणी सिंटर सामान्यपणेआढळतो व यावरुनत्याचे गायझराइट नाव पडले आहे.

कॅल्शियमयुक्त सिंटरला कधीकधी टूफा,कॅल्केरियस टूफा किंवाकॅल्कटूफा म्हणतात. ट्रॅव्हर्टाइन (कॅल्क सिंटर) हे अशा कॅल्शियमकार्बोनेटाच्या स्पंजाप्रमाणे सच्छिद्र निक्षेपाचे एक उदाहरण आहे. याचुनखडक असलेल्या भागांत वाहणाऱ्या पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडवायू विरघळलेला असतो व त्यामुळे त्यात कॅल्शियम कार्बोनेट पुष्कळप्रमाणातविरघळलेले असते. असे भूमिजल पृष्ठभागी झऱ्यांच्या रुपातपोहोचते तेव्हा त्याच्यातील काही कार्बन डाय-ऑक्साइड वायू दाब कमीझाल्याने निघून जातो व परिणामी त्यातील काही कॅल्शियम कार्बोनेटअवक्षेपित होते. अशा प्रकारे ट्रॅव्हर्टाइन निक्षेप तयार होऊन वाढत जातात.या प्रकारे थंड व गरम पाण्याच्या झऱ्यांच्या मुखाभोवती कॅल्कटूफा वाट्रॅव्हर्टाइन याखडकांची निर्मिती करणाऱ्या या झऱ्यांना (तथाकथित)अश्मीभवनकारी झरे म्हणतात. यांच्याही निक्षेपणाला बाष्पीभवनाप्रमाणेहरिता व इतर वनस्पती संरचना कारणीभूत होतात. या वनस्पतिज द्रव्याचाकुजून क्षय होतो व त्यांच्याजागी पोकळ्या, छिद्रे मागे राहतात. परिणामीकॅल्शियमयुक्त सिंटर सच्छिद्र होते. कारलॉव्ही व्हारी (चेकोस्लोव्हाकिया)येथील उन्हाळ्यांधील तप्त पाण्यात सिंटर निक्षेपित होण्याला मुख्यतः जैवकारकांचे कार्य हेच कारण आहे. तेथे सिसोलाइट निक्षेपित झाले आहे.

अमेरिकेतील मॅथ हॉटस्प्रिंग (यलोस्टोन नॅशनल पार्क, वायोमिंग)येथील सिंटरचे निक्षेप अधिक सुंदर दिसतात. इटलीतकॅल्केरियस टूफाचेजाड थर बनले असून ते बांधकामाचे दगड म्हणून वापरतात. ऑनिक्ससंगमरवर किंवा मेक्सिकन ऑनिक्स हे झऱ्यांमुळे निक्षेपित झालेल्याकॅल्साइटाचे किंवा कधीकधी ॲरॅगोनाइट खनिजाचे पट्टेदार रुप असून तेइमारतीच्या सजावटीसाठी वापरतात. जेथे झऱ्याच्या पाण्यात मोठ्याप्रमाणावर कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले असते,तेथील पाण्यातझाडाच्या फांद्या, पक्ष्यांची घरटी व इतर वस्तू बुडत राहिल्यासत्यांच्यावर कॅल्कटूफाचे कठीण पुट चढते उदा., मॅटलॉक (कॅनारेसबरो).यात वनस्पतींचे शिलाभूत अवशेष (जीवाश्म) तयार होऊ शकतात.

पहा : उन्हाळे गायझर गाळाचे खडक टूफा ट्रॅव्हर्टाइन धूममुख.

ठाकूर, अ. ना.