सिंचन : शेतजमिनीला कृत्रिम रीतीने पाणी देण्याच्या किंवापुरविण्याच्या क्रियेला सिंचन म्हणतात. याउलट जमिनीतील जादा पाणीकृत्रिम रीतीने काढून टाकण्याच्या क्रियेला⇨निचरा म्हणतात. सिंचनव निचरा या दोन्ही क्रि या एकमेकींशीनिगडित आहेत. शेतीसाठीजमिनीचा उपयोग करण्याआधी काही जमिनींना सिंचनाची किंवा निचऱ्याचीगरज असते.हमखास आणि जास्त उत्पादनासाठी या दोन्हींची एकत्रितगरज असते.

काही प्रदेशांत पाऊस हंगामी स्वरुपाचा असतो. तेथे पाण्याचीचणचण अथवा अभाव असतो. त्यामुळे विशिष्ट पिकांच्या पाणीविषयकगरजा पूर्ण होत नाहीत. परिणामी वनस्पती व पिकांची वाढ खुंटते.सिंचनाद्वारे जमिनीला नियमित व पुरेसेपाणी देऊन अशा नैसर्गिकउणिवेवर काही प्रमाणात मात करता येते.

इतिहास : शेतीसाठी सिंचनाचा उपयोग अगदी प्राचीन काळापासूनहोत आला आहे. ईजिप्त, बॅबिलोनिया, चीन, भारत इ.देशांतसिंचनावर आधारलेल्या शेतीमुळे मानवी संस्कृतीचा विकास होण्यासमोठा हातभार लागला आहे.

ईजिप्तमध्ये शक्यतो पाऊस पडत नाही. तेथे नैसर्गिक सिंचनाचीसुरुवात इ. स. पू. ५,००० वर्षांपासून झाल्याचे पुरावे आहेत. तेथे नाईलनदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे तिच्या किनाऱ्यालगतच्या मोठ्या क्षेत्रावरपाणी पसरत असे. पूर ओसरल्यावर याक्षेत्रात तयार होणाऱ्या चिखलातबिया पेरुन तेथे पीक घेतले जाई, तसेच पुरानंतर अनेक ठिकाणीडबक्यांच्या रुपात काही महिने पाणी साचून राहत असे. त्यामुळे असेपाणी उचलून घेऊन शेतीसाठी वापरण्याचे आदिम कृत्रिम सिंचन सुरुझाले असावे. जेथून पाणी वाहून निघून जाते असे मार्ग दगडमातीनेबंद करुन पाण्याचे साठे तयारकरीत असावेत. यातून धरणाची कल्पनापुढे आली असावी. मीनीझ ( इ. स. पू. ३१६८–३१४१) याईजिप्तच्या राजानेनाईल नदीच्या किनाऱ्यावर बंधारे बांधून पुराचे मानवनिर्मित नियंत्रण केले होते. अशा रीतीने नाईल नदीच्या खोऱ्यातीलसिंचन पद्घती सुरु झाली.

सिंचन सुकर व्हावे म्हणून प्राचीन काळात विविध प्रकारचेप्रयत्न झालेले दिसतात. उदा., बॅबिलोनियाचा राजा हामुराबीयांच्या कारकीर्दीत ( इ. स. पू. १७९२–१७५०) कालवे व पाटबांधलेले होते.

चीनमध्ये पहिला कालवा इ. स. पू. तिसऱ्या शतकात खोदण्यातआल्याची नोंद आहे. इ. स. पू. पहिल्या शतकात चीनमध्येदुष्काळ निवारण व भातशेतीला पाणी देणेया कामांसाठी हानवंशीयसम्राट वूटि याने कालवे खोदण्याचे व तलाव बांधण्याचे आदेशदिले होते.

अमेरिका खंडांत यूरोपियन लोकांचा प्रवेश होण्याआधी तेथीलमूळचे रहिवासी रेड इंडियन शेतीला पाणी देत असत.त्यांच्या सिंचनपद्घतींचा अभ्यास करुन यूरोपियन लोकांनी सुधारणा केल्या.

चाणक्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथातसिंचनाविषयीची माहिती दिलेलीआहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकात मीगॅस्थिनीझ यांनी ‘सम्राटचंद्रगुप्ताच्याराज्यातसारा मुलूख कालव्यांनी व्यापलेला असून प्रजा धनधान्याच्याबाबतीत समृद्घ असलेलीआढळली’ असे लिहून ठेवले आहे. इ. स.पहिल्या शतकात भारतात चोल वंशातील राजांनी कावेरी नदीच्याकॉलेरूनफाट्यावर धरण बांधले होते. इ. स. दुसऱ्या शतकात करिकालया चोल राजाने कावेरी नदीवर महान अनईकट्‌टु ( ग्रँडॲनिकट ) हाबंधारा बांधला. चौदाव्या शतकात सतलज व यमुना या नद्यांपासूनकालवे काढण्याचे काम तुघलकघराण्याच्या काळात झाले.

एकोणिसाव्या शतकात पश्चिम यमुना कालवा, पूर्व यमुना कालवाव कावेरीचे कालवे काढण्यात आले. यानंतर उत्तरेत गंगाकालवाव बारी दोआब कालवा आणि दक्षिणेत गोदावरीवरही कालवेकाढण्यात आले. पुण्याजवळील खडकवासलाधरण, भोरजवळील जुनेव भाटघर येथील नवीन धरण आणि नीरा नदीचे कालवे, तसेच प्रवरा वगोदावरी या नद्यांवरीलधरणे व कालवे हेही एकोणिसाव्या शतकाच्याअखेरीस व विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधण्यातआले. सिंध प्रांत भारताचाभाग असताना जगप्रसिद्घसक्कर येथील सिंधू नदीवरचा बंधारा व जवळजवळसंपूर्ण सिंध प्रांत भिजेल असे कालवेहीविसाव्याशतकाच्या पूर्वार्धात बांधले गेले.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पडलेल्यादेशव्यापी दुष्काळानंतर भारताने एक सिंचन आयोगनियुक्त केला होता. त्यामध्ये केलेल्या शिफारशीव त्यानुसार सुरु झालेली पाहणी यामुळे देशातीलसिंचन योजनांचा पाया घातला गेला.

भारतातील सिंचनाची प्रगती व योजना :पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून नवव्या पंचवार्षिकयोजनेपर्यंत सिंचनविभागावर करण्यात आलेलीगुं तवणूक रु. १,५५,६२४.९७ कोटी (निश्चितमूल्यांवर) आहे. दहाव्या पंचवार्षिकयोजनेमध्येसिंचनाकरिता रु. ९२,१४३.४२ कोटी रकमेलामान्यता देण्यात आली. दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्येसिंचनक्षमता क्षेत्र १६.७४३ द. ल. हे. निर्माणकरण्याचे लक्ष्य देण्यात आले. शासनाच्या भारतनिर्माण उपक्र मामध्ये २००९मध्ये १० द. ल. हे.क्षेत्र असलेली सिंचनक्षमता निर्माण करण्याचे लक्ष्यठरविण्यात आले.

प्रथम पंचवार्षिक योजनेपासून भारतात सुरुकरण्यात आलेल्या काही मोठ्या प्रकल्पांची नावेव सिंचनक्षमता हेक्टरमध्येपुढीलप्रमाणे : तुंगभद्रा(आंध्रप्रदेश) १,०८,००० नागार्जुनसागर (आंध्रप्रदेश) ८,८०,००० पोचंपाड २,२८,००० घटप्रभा१,२०,००० तुंगभद्रा २,६८,००० कृष्णा(कर्नाटक) २,४७,००० परांबिकुलम अलियार(तमिळनाडू)९६,००० भाक्रा -नानगल१२,१२,००० भाक्रा(राजस्थान) २,२८,०००राजस्थान कालवा ५२,००० गंगा ६,८४,०००पश्चिम गंडक २,८४,००० दामोदर खोरे प्रकल्प३,४२,००० कंगबासी ३,८०,००० हिराकूड२,५२,००० महानदी६,४४,००० चंबळ (मध्यप्रदेश) २,८०,००० तवा ३,००,००० कोसी५,६४,००० गंडक १,०४,००० मही व कडाणा२,००,००० काकापारा व उकाई ३,८०,०००नर्मदा ४,००,००० पूर्णा ६०,००० गिरणा६४,००० खडकवासला २२,२९८ भीमा१,८८,००० मुळा ६४,००० जायकवाडी १,४०,००० कृष्णा१,०४,००० वारणा ९६,००० ( महाराष्ट्र ).


भारत व महाराष्ट्र राज्यातीलपंचवार्षिक तसेच वार्षिक योजनांमध्येकरण्यात आलेली सिंचन प्रकल्पांची माहिती वत्यानिहाय सिंचनक्षमतेचाझालेला प्रत्यक्ष वापर याविषयीची माहिती कोष्टक क्र . १ व २ मध्येदिली आहे.

कोष्टक क्र. १. भारतातील सिंचनाची प्रगती 

 

मोठे आणि मध्यम

प्रकल्प सिंचनक्षमता

( दशलक्ष हेक्टर )

लघू प्रकल्प

( दशलक्ष

हेक्टर )

एकूण

सिंचनक्षमता

( दशलक्ष

हेक्टर )

सिंचनक्षमतेचा

प्रत्यक्ष वापर

( दशलक्ष

हेक्टर )

 

निर्मित

संचयी

     

पंचवार्षिक योजना पूर्व

(१९५१ पूर्वी )

९.७०

९.७०

१२.९०

२२.६०

२२.६०

पहिली पंचवार्षिक योजना (१९५१–५६)

२.५०

१२.२०

१४.०६

२६.२६

२५.०४

दुसरी पंचवार्षिक योजना

(१९५६–६१)

२.१३

१४.३३

१४.७५

२९.०८

२७.८०

तिसरी पंचवार्षिक योजना (१९६१–६६)

२.२४

१६.५७

१७.००

३३.५७

३२.१७

वार्षिक योजना

(१९६६–६९)

१.५३

१८.१०

१९.००

३७.१०

३५.७५

चौथी पंचवार्षिक योजना

(१९६९–७४)

२.६०

२०.७०

२३.५०

४४.२०

४१.८९

पाचवी पंचवार्षिक योजना (१९७४–७८)

४.०२

२४.७२

२७.३०

५२.०२

४८.४०

वार्षिक योजना

(१९७८–८०)

१.८९

२६.६१

३०.००

५६.६१

५२.६४

सहावी पंचवार्षिक योजना (१९८०–८५)

१.०९

२७.७०

३७.५२

६५.२२

५८.८२

सातवी पंचवार्षिक योजना (१९८५–९०)

२.२२

२९.९२

४६.६१

७६.५३

६८.५९

वार्षिक योजना

(१९९०–९२)

०.८२

३०.७४

५०.३५

८१.०९

७२.८५

आठवी पंचवार्षिक योजना (१९९२–९७)

२.२२

३२.९६

५३.३१

८६.२७

७७.२१

नववी पंचवार्षिक योजना

(१९९७ –२००२)

४.१०

३७.०६

५६.९०

९३.९६

८१.००

दहावी पंचवार्षिक योजना (२००२–०७)

५.३०

४२.३६

६०.३१

१०२.६७

८७.२३

वार्षिक योजना

(२००८-०९)

२.३१

४४.६७

६२.१९७

१०६.८६७

वार्षिक योजना

(२००९-१०)

१.०५

४७.८३

६२.८८१

११०.७०७

वार्षिक योजना

(२०१०-११)

०.२५

४८.७८

६४.१८२

१११.९६२

कोष्टक क्र . २. महाराष्ट्र राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांची संख्या व त्यांपासून निर्माणझालेली सिंचनक्षमता. 

 

मोठे

मध्यम

लघू

लघू

(स्थानिक

क्षेत्र )

एकूण

२००६ पर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प

३२

१८३

२,३९४

५१,१६०

प्रगती पथावरील प्रकल्प

२२

३९

३२८

७,६३७

निर्मित सिंचनक्षमता ( लाख हेक्टर )

२३.३१

७.०९

१०.५६

२२.५६

६३.४६

सिंचनक्षमतेचा प्रत्यक्ष वापर ( लाख हेक्टर )

११.१७

२.०२

२.९८

६.९४

२३.११

विहिरींखालील सिंचन क्षेत्र ( लाख हेक्टर )

५.९७

[ लघू ( स्थानिक क्षेत्र ) – कोल्हापूर पद्घतीचे बंधारे, पाझर तलाव, उपसा जलसिंचन, लघुपाटबंधारे नतलाव इत्यादी ].  

पंडितराव, वि. न.

कृषिविज्ञान या विभागात सिंचनाची गरज, पाणीपुरवठ्याचे स्रोत,पिकास लागणारे पाणी, पिकास पाणी देण्याच्या पद्घती,पाणी उचलण्याचीसाधने आणि सिंचनाच्या पाण्यामुळे जमीन खारवट बनणे यांचा समावेशहोतो. स्थापत्य अभियांत्रिकी या विभागात सिंचन पद्घती, लघुसिंचनप्रकल्प, उपसा सिंचन, भूमिजलाचा उपयोग आणि कालव्यातीलपाण्यामुळे जमिनीपाणथळ व खारवट बनणे आणि त्यावर करावयाचेउपाय यांचा समावेश आहे.

कृषिविज्ञान

सिंचनाची गरज : निरनिराळ्या प्रदेशांमध्ये वार्षिक सरासरीपर्जन्यमान आणि त्याची होणारी वाटणी निरनिराळी असते. त्यानुसारशेतीचे व्यवस्थापन कसे करायचे ते ठरवितात. भारतातील जवळजवळ८०% शेती पावसावरच अवलंबून असून२०% शेती सिंचनाच्या मदतीनेकेली जाते. भारतात अनेक ठिकाणी पाऊस हंगामी किंवा अनिश्चितस्वरुपाचा व अपुरापडतो. त्यामुळे पुष्कळदा जमिनीत पाणी नसते आणितेथे पीक घेता येत नाही. पाण्याचा हा अभाव दूर करुन जमिनीत पुरेशीओल उत्पन्न करण्याकरिता तिला विहिरीचे किंवा पाटाचे पाणी देणेगरजेचे असते. अशा प्रकारे पाणी एकदाच देऊन कार्यभाग साध्य होत नाहीकारण जमिनीला दिलेल्या पाण्याचा बराच भाग निचरा होऊन निघूनजातो, तर पाण्याचा काही भाग हवेमधील उष्णतेमुळे आणि बाष्पीभवनाद्वारेनिघून जातो. पिकाला दिलेल्या पाण्यापैकी सु. ६० टक्क्यांहून अधिकपाणी पिकाला उपयोगी पडत नाही. पीक वाढत असताना पाऊस नपडल्यास पिकाला दिलेले पाणी संपून जमीनकोरडी पडते आणि पिकालाअपाय होतो. म्हणून पिकाला परत पाणी द्यावे लागते. सिंचनाद्वारे पिकांनाद्याव्या लागणाऱ्या पाण्याचा हिशोब करताना शेतजमिनीची ओलितकार्यक्षमता विचारात घ्यावी लागते. ही कार्यक्षमता जमिनीच्यामगदुराप्रमाणे वा भिन्नभिन्न परिस्थितींनुसार ४० ते ७० टक्क्यांपर्यंत असते.वनस्पतिशरीरकि याविज्ञानाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अन्नघटकांच्या मानाने पिकांना पाण्याची गरज फारच जास्त असते. वनस्पतीतील पदार्थांचे विघटन, नायट्रोजनाचा पुरवठा, रासायनिक घडामोडीवगैरे गोष्टी जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबूनअसतात. हलक्या जमिनीत कोरड्या हवामानात वाढणाऱ्या पिकांनासिंचनाची जास्त गरज असते. हवेतील उष्णतामान,आर्द्रता, जमिनीचाव पिकाचा प्रकार आणि पिकाच्या वाढीची प्रत्यक्ष परिस्थिती यांचाविचार करुन पिकाला पाणीदेण्याच्या वेळाठरवितात. पिकाला दिलेले पाणी हेक्टरसेंटिमीटर ( हे. सेंमी.) या एककात मोजतात.एक हेक्टर क्षेत्रावरसर्वत्र एकसारखेपसरविलेले एक सेंटिमीटर खोलीचे पाणीम्हणजे हे. सें मी. पाणी होय. पिकाच्यामुळांच्या पट्ट्यातीलउपयुक्त पाण्याचे प्रमाण६०% पर्यंत घटते, तेव्हा पीक कोजूलागते आणि पिकाला पाणी देण्याची निकडलक्षात येते.पिकाला सर्वसाधारणपणे ८ ते१० दिवसांनी पाणी देतात. काही पिकांच्याबाबतीत हे अंतर २० ते २६ दिवसांचेठेवतात.याला पाण्याच्या पाळ्या म्हणतात.निरनिराळ्या पिकांना द्यावयाच्या पाण्याच्या दोन पाळ्यांधील अंतर वएकूण पाळ्यांचीसंख्या या गोष्टी शेतजमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीतीलमहत्त्वाचा काळ व पिकाचे आयुर्मान यांचा विचार करुनठरवितात.


पाणीपुरवठ्याचे स्रोत : पिकाची पूर्ण वाढ होऊन त्यापासूनअपेक्षित उत्पादन मिळविण्याकरिता पिकाला योग्य वेळी व योग्यप्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी विहिरी,नलिका कूप, लहान-मोठी तळी, हिमनदीवितळून मिळणारे पाणी,नदीनाल्यांवरील पाणी उपसा योजना, धरणे व बंधारे इ. स्रोतांचा वापरकरावा लागतो. या सर्वस्रोतांतील पाण्याचा मुख्य उद्‌गम पाऊस आणिकाही प्रमाणात हिमवृष्टी हे आहेत. पाऊस नियमित व पुरेसा पडल्याससिंचनाची विशेष गरज नसते.

विहिरी व नलिका कूप : भूमिजलाचे पुरेसे पाणी मिळण्याचीशक्यता असलेल्या जागी विहिरी खोदतात किंवा वेधन यंत्रानेजमिनीतभूमीजल पातळीपर्यंत छिद्र पाडून नलिका कूप तयार करतात. या दोन्हीप्रकारच्या विहिरींतील पाणी यांत्रिकपंपाने उपसून पिकाला देतात. काहीविहिरींतील पाणी मोट, रहाट किंवा रहाटगाडगे या साधनांनी उपसूनपिकालादेतात. विहिरींमधील पाणी वाढविण्यासाठी पाझर तलावांचाउपयोग होतो.

तलाव : तलाव नैसर्गिक रीत्या बनलेले असतात किंवा योग्य जागीकृत्रिम रीतीने तलाव बांधून घेतात. त्यांच्यामधील पाणीपाट काढूनपिकांना देतात.

नदीनाल्यांवरील पाणी उपसा योजना : वर्षभर पाणी असलेल्यानदीनाल्यांवर योग्य जागी पाणी खेचणारे यांत्रिक पंपबसवून खेचलेलेपाणी पाटाने पिकांना देतात. हे पंप विजेच्या किंवा डीझेल एंजिनाच्यासाहाय्याने चालविले जातात.

निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीस लागणारे पाणी : मृदेचीउत्पत्ती, तिच्यातील स्थित्यंतरे, वनस्पतीला लागणारी पोषकद्रव्ये वतिची वाढ इ. गोष्टी जमिनीमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरचअवलंबून असतात. बाष्पीभवन, निचरा वशोषण यामुळे जमिनीतीलपाणी सतत कमी होते. आवश्यक पाण्याचे प्रमाण टिकविण्यासाठीजमिनीला वारंवार पाणी द्यावेलागते. जमिनीची जलधारणक्षमता तिच्यापोतावर, मृण्मय खनिज स्वरुपावर व तिच्यातील जैव पदार्थांच्या प्रमाणावरअवलंबून असते. जमिनीला दिलेले पाणी निरनिराळ्या स्वरुपात जमिनीतराहते. कोरड्या मातीच्या कणांवरील पाण्याचादाब ( पीएफ ) ७ असतो,तर भरपूर ओल असलेल्या जमिनीत तो शून्य असतो. निचरापूर्वजलराशी आणि वनस्पती कोजूलागते त्या वेळचे जमिनीतील पाण्याचेप्रमाण यांमधील फरकाला ‘उपयुक्त पाणी ’ म्हणतात. त्याचे प्रमाण दर३० सेंमी.खोलीला वाळूमय जमिनीत २-३ हे. सेंमी. आणि चिकणमातीत ६–८ हे. सेंमी. असते. दिलेल्या पाण्याची उपयुक्तता वेगवेगळ्याजमिनीत वेगवेगळी असते आणि तिचे प्रमाण ६० ते ८०% असते.

पोतातील फरकाप्रमाणे जमिनीची जलधारणक्षमता व इतर परिमाणेयातील बदलानुसार उपयुक्त पाण्याचेही प्रमाणबदलते, म्हणून सर्वजमिनींना सारखेच पाणी देऊन चालत नाही. उपयुक्त पाणी व जमिनीतील प्रत्यक्ष पाणी या दोनमर्यादांमधील पाणी पिकांना सारख्याचसुलभतेने उपलब्ध होत नाही. पिकाला एकंदर किती पाणी द्यावयाचे हेजमिनीतील पाण्याची कमतरता, लवणांचे ( क्षारांचे ) प्रमाण व पावसाचासंभव यांवर अवलंबून असते. सिंचनासाठी पाणीआवश्यकतेपेक्षा जास्तआणि वारंवार दिल्याने त्याचा जमिनीच्या गुणधर्मांवर व पिकांवरही अनिष्टपरिणाम होतो.पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन पाणथळ बनते. अशाप्रकारच्या जमिनीत असणाऱ्या पिकाला ऑक्सिजन वायूचा पुरवठायोग्य प्रकारे न झाल्याने पिकाची वाढ खुंटते. जमीन पाणथळ झाल्यानंतरतिच्यातून होणारा जादा पाण्याचा निचरामंदावतो. परिणामी जमिनीतक्षारांचे प्रमाण वाढू लागते आणि कालांतराने हे क्षार अतिप्रमाणातवाढल्याने जमीन नापीक होऊ लागते.

पिकास लागणारे पाणी : पीक वाढत असताना जमिनीतूनउपलब्ध होणारे पोषक द्रव्य मिश्रित पाणी आपल्या मुळांद्वारेशोषून घेतात,म्हणून पिकाला पाणी देण्याची वेळ, प्रत्येक पाळीला पाणी देण्याचे प्रमाणव त्याचा परिणाम यांची निश्चित माहिती असणे आवश्यक असते.वनस्पतीचे निरनिराळ्या अवस्थांत पृथक्करण केल्यास त्यांत ७० ते९० टक्के पाण्याचे प्रमाणआढळते. जमिनीतील सर्वच पाणी वनस्पतींनाउपलब्ध नसते. पाण्याची उपलब्धता वनस्पतीच्या त्वग्रंध्रांची उघडझाप,बाष्पीभवन, कार्बनग्रहण व श्वासोच्छ्‌वास या क्रियांवर अवलंबून असते.पिकास पाणी किती लागते हे ठरविताना वापरलेल्यातंत्रात बाष्पीभवनाचेप्रमाण, पाण्याची खोली, पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर, उत्पादनक्षमतासिद्घांत, त्रुटित पाण्याचापरिणाम व हवामानविषयक परिस्थिती यागोष्टींचा समावेश होतो. त्याशिवाय पिकाला फुटवे येणे, कांडे धरणे,फुले येणे,दाणे धरणे व बोंड किंवा फळे धरणे या सर्व अवस्थांच्यावेळापत्रकाचासुद्घा विचार करावा लागतो. काही पिकांना वरील अवस्थांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये पुरेसे पाणी न मिळाल्यास त्यांचीवाढ व्यवस्थित होत नाही व उत्पादनात घट येते.पिकास लागणारेपाणी म्हणजे विशिष्ट मुदतीत पिकांची संपूर्ण वाढ होण्यासाठी दिलेजाणारे एकूण पाणी होय. तेस्थूलमानाने जमिनीची जलधारणक्षमता,पिकाच्या वाढीचा काळ, हवामानातील फेरफार व पाणी देण्याची पद्घतयांच्यावरअवलंबून असते. जमिनीतील उपलब्ध पाणी पिकांनी मुळांद्वाराशोषण्याच्या प्रमाणावर त्यांच्या शारीरिक क्रि या व त्यांचेउत्पादन यागोष्टी अवलंबून असतात. जमिनीची निचऱ्यानंतरची जलधारणक्षमता वपाणी देण्याच्या वेळी जमिनीत प्रत्यक्षअसलेले पाणी यांतील फरकाइतकेपाणी प्रत्येक पाळीत देणे इष्ट ठरते. हा फरक साधारण १० टक्क्यांइतकाअसला, तरजमीन १५ सेंमी. खोल भिजेल इतके पाणी द्यावे लागते.सिंचनाच्या परिभाषेत ते हेक्टरला २.५ सेंमी. दिल्याचे समजतात.अर्थातहे प्रमाण आणि पाळीतील अंतर निरनिराळ्या पिकांत निरनिराळे असते.


पिकास पाणी देण्याच्या पद्घती : पिकांनापाणी देण्याबाबतपुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात : (१) जमिनीची परिस्थितीम्हणजे सपाटपणा, चढ-उतार आणि निचरा, (२) त्या भागातील हवामानपरिस्थिती, (३) जमिनीचा प्रकार वत्याच्यावर होणारा सिंचनाचा परिणाम,(४) लागवड करावयाची पिके व त्यांना लागणारे पाणी, (५) पाणीपुरवठ्यालालागणारा खर्च, (६) बागायत क्षेत्रातील बाजारपेठ व दळणवळणाचीसाधने आणि (७) उत्पादकाला मिळणाऱ्या नफ्याचेप्रमाण. 

पिकांना पाणी देण्याच्या पद्घतींचे मुख्यतः तीन प्रकार आहेत : (१)जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी देणे, (२) जमिनीच्या पृष्ठभागाखालूनपाणी देणे आणि (३) जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर काही थोड्या उंचीवरुन फवाऱ्याच्या किंवापावसासारख्या धारांच्या रुपाने पिकावर पाणीफवारणे. या प्रकारांपैकी पहिला प्रकार फार पूर्वीपासून प्रचारात आहे.(२) व (३) हे नवीन प्रकार असून त्यांचा उपयोग अमेरिकेत व इस्राएलवगैरे देशांत मोठ्या प्रमाणात केला जातो.

जमिनीवरुन प्रवाहाने पिकाला पाणी देणे : या प्रकारात (१)मोकार पाणी देणे, (२) साऱ्यांतून पाणी देणे, (३) वाफ्यांतून पाणीदेणे, (४) आळे पद्घत, (५) सरी-वरंब्यांच्या वाफ्यांतून पाणी देणे,(६) लांब सरी-वरंब्यांतून पाणी देणे आणि (७) रुंद वरंबे किंवा (पट्टापद्घतीने ) पाणी देणे या पद्घतींचा समावेश होतो. यांतील पहिल्या पाचपद्घती जुन्या असून (६) व (७) सुधारित आहेत.

मोकार पाणी देणे : जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी सर्वत्र पसरुनपिकांना उपयोगी पडावे म्हणून त्या जमिनीत ठिकठिकाणी योग्य जागीनांगराने तास काढून त्यांच्यामधून पाटाचे पाणी सोडतात. जमिनीच्याएखाद्या भागात चढअसल्यामुळे तेथे पाणी जात नसेल तर योग्य जागीतेथीलच माती खोऱ्याने ओढून लहानसा बांध करुन पाण्याचा ओघवळवून पाणी त्या चढाच्या जागेवरुन वाहील असे करतात. ही पद्घतकमी मेहनत आणि कमी खर्चाची असली तरी फारशीउपयुक्त नाही.चढ-उताराच्या जमिनीत चढाच्या जागी पाणी नेणे कष्टप्रद असते आणिउताराच्या खोलगट भागात पाणीसाचून तेथील पिकाला अपाय होतो.सपाट, परंतु एका बाजूला किंचित उतार असणाऱ्या जमिनीसाठी हीपद्घत चांगलीअसते. त्याचप्रमाणे ज्यांचीआंतरमशागत औतांच्यासाहाय्याने केली जाते आणि पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्या लागतात,अशा पिकांसाठी ही पद्घत वापरणे श्रेयस्कर असते. खरीप हंगामातीलकोरडवाहू पिकांच्या बाबतीत लागवडीनंतरमुदतीपर्यंत पाऊस नपडल्यास ती पिके वाचविण्याकरिता या पद्घतीने त्यांना पाणी देतात.चढ-उताराच्या जमिनीत हीपद्घत वापरल्यास बरेच पाणी वाया जातेआणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर उतारावरील जमीन धुपून जाण्याचा धोकाअसतो. या पद्घतीत पाण्याचा पुरवठा मुबलक लागतो.

साऱ्यांतून पाणी देणे : मोकार पाणी देण्याच्या पद्घतीपेक्षा ही पद्घतजास्त चांगली आहे. जमिनीत पेरण्यात यावयाच्यापिकाला जरुर पडल्यासपाणी देता यावे म्हणून पिकाची लागवड केल्याबरोबर औताच्या साहाय्यानेत्या क्षेत्रात थोड्याउंचीचे बांध तयार करतात. दोन बांधांधील अंतरकमी ठेवतात परंतु लांबी मात्र जमिनीच्या ढाळाप्रमाणे कमी-जास्तठेवतात. सपाट जमिनीवर रुंदी सु. १,५०० सेंमी.पर्यंतही ठेवतात. शेताच्यालांबीप्रमाणे ठराविक अंतरावर या बांधांनाकाटकोन करुन नांगरानेआडवे तास काढून त्यांचा पाटाप्रमाणे उपयोग करतात. या पाटांमुळेत्या जमिनीत लांब चौकोनीवाफे तयार होतात. या वाफ्यांचे बांधलहान असल्यामुळे त्यांत सोडलेल्या पाटाच्या पाण्याच्या पवाहाच्याजोरामुळेकधीकधी ते वाहून जाऊन खिंडारे पडतात. त्या कारणाने पुढीलपाण्याच्या पाळीत साऱ्यांत सोडलेले पाणी सर्वत्र सारखेबसत नाही.त्यामुळे सारा पद्घत ज्यापिकांना दोन-तीन पाण्याच्या पाळ्या द्यावयाच्याअसतात त्यांच्यासाठी उपयुक्तअसते. या पद्घतीत पाण्याचा पुरवठामुबलक असावा लागतो.

वाफे पद्घतीने पाणी देणे : ही पद्घत भारतभर वापरात आहे. विशेषेकरुन तिचा उपयोग बागायती पिकांच्या बाबतीत जास्त प्रमाणावर केलाजातो. या पद्घतीत पाणी देण्यासाठी जमिनीची आखणी करण्यापूर्वी तीसपाट करतात. साधारणतः २ X ४मी. मापाचे वाफे दोन-दोन मीटररुंदीच्या, एकाला एक लागून असलेल्या दोन वाफ्यांच्या मधून एकेक असेउभे दंडनांगराने पाडतात. या उभ्या दंडांना चार-चार मीटर अंतरावरकाटकोन करुन आडवे दंड पाडतात. या आखणीमुळेप्रत्येक वाफ्याच्यादोन बाजूंना पाण्याचे दंड येतात. वाफ्यांची संख्या जमिनीच्या लांबी-रुंदीवरअवलंबून राहते. यावाफ्याच्या चारी बाजूंच्या वरंब्यांची उंची साधारणपणे२०–२५ सेंमी. ठेवतात. यात हात मेहनतीचे काम सारा पद्घतीपेक्षाजास्तअसते व खर्च वाढतो परंतु सर्व पिकाला सारख्या प्रमाणात पाणीमिळण्याची सोय, पाण्याची बचत इ. गोष्टींचाविचार केला असता हीपद्घत खर्चिक नसल्याचे दिसून येते. ती कोणत्याही प्रकारचा पोतअसलेल्या जमिनीत पाणभरती पिके लावण्यासाठी वापरता येते. तिच्यामुळेजमिनीची धूप होत नाही. तिच्यामध्ये दोन दोष आढळून येतात :(१) वरंबे व पाण्याचे दंड यांच्याखाली बरीच जमीन व्यापली जाऊनतिच्यामधून उत्पन्न मिळत नाही. या दोषाचे निराकरण वरंब्यावर व

दंडाच्या कडेने मिश्र पिके लावून त्यापासून उत्पन्न मिळवून करता येते.(२) वाफ्यातील पिकाची आंतरमशागत हातांनीच करावी लागते, बैलीऔते वापरात येत नाहीत. या दोषाचे निराकरण करता येत नाही परंतुया कामासाठी करावा लागणारा खर्च न झेपण्याइतकाही जास्त नसतो.

आळे पद्घत : या पद्घतीत दोन प्रकार आढळतात. एक प्रकारथाळीच्याआकाराचे साधे गोल आळे व दुसरा प्रकार बांगडी आळेकिंवा कडे आळे. दोन्ही प्रकारचे आळे १०–१५ सेंमी. खोल आणि १ मी.व्यासाचे करतात. काही प्रसंगी आळी गोल ऐवजी चौकोनी किंवाचौरसही करतात. बांगडी आळ्यांचा उपयोगविशेषतः फळझाडांच्यालागवडीमध्ये करतात. आळ्याचा व्यास फळझाडाच्या वाढीनुसारबदलत जातो. त्याच्याबुंध्याभोवताली १५–२० सेंमी. मर्यादेपर्यंत मातीचीभर घालून गोलाकार उंचवटा तयार करतात. त्यामुळे आळ्यात भरलेलेपाणी झाडाच्या बुंध्याला भिडत नाही आणि झाडालाअपाय होत नाही.आळ्यात जरुरीइतके पाणी मावेल अशा प्रकारे आळ्याच्या बाहेरच्याकडेने बांध घालतात.

सरी-वरंब्यांच्या वाफ्यांतून पाणी देणे : वाफे पद्घतीप्रमाणे जमीनतयार करुन तिच्यात आवश्यक तितक्या अंतरावर नांगराने सऱ्या काढतात. पाण्याचे उभे पाट ४–५ मी. अंतरावर काढतात. त्यांनाकाटकोनात छेदणारे आडवे पाट ३–४.५मी. अंतरावर काढतात. याउभ्या-आडव्या पाटांमुळे वाफे तयार होतात. त्या वाफ्यांचे बांध वपाट खोऱ्याने माती ओढूनदुरुस्त करुन घेतात. वाफ्यातील एकाआडएक वरंब्यांची वरच्या किंवा खालच्या बाजूंची टोके खोऱ्याने तोडूनवाफ्यातील सर्व सऱ्यां मधून पाणी फिरण्यासाठी वाट करुन देतात.त्यामुळे पाणी संथपणे जिरुन वाफ्यातील सर्व जमीन चांगलीभिजते.पाणी वाया जात नाही.

लांब सरी-वरंब्यांतून पाणी देणे : वाफे पद्घतीप्रमाणे जमिनीचीमशागत करतात. जमिनीस उतार असल्यास समोच्चबिंदुरेषेप्रमाणे२५–३० मी. पर्यंत लांब सऱ्या आवश्यक तितक्या अंतरावर नांगरानेकाढतात. वाळुसरा व गाळमिश्रितजमिनीमध्ये सऱ्यांची लांबी चिकणवटजमिनीतील सऱ्यांच्या लांबीपेक्षा कमी ठेवतात. दोन सऱ्यांमधीलजमिनीचा वरंबाबनतो त्याच्यावर पिकाची लागवड करण्यात येते.त्यामुळे पाणी प्रत्यक्ष पिकाच्या बुंध्यांना भिडत नाही. यातही पाण्यासाठीउभे व आडवे पाट काढावे लागतात. आडवे पाट सऱ्यांच्या ठराविकलांबीनंतर त्यांना काटकोन करुन नांगराने काढतात. उभ्या पाटातूनआडव्या पाटात मंद प्रवाहाने पाणी सोडतात. पाणी संथपणे वाहत असल्यामुळे वरंब्यात चांगले जिरते. पाणी वाया जाण्याची शक्यता फार कमीअसते. पिकांची मशागत औतांनी करता येते. हात मेहनत कमी लागते.लांब अंतरावर लावण्यात येणाऱ्या बागायती पिकांसाठी ही पद्घत फारउपयुक्त असते. लागण करताना फक्त उसाचे पीकसरीच्या तळाशी लावतात.इतर सर्व पिके वरंब्यांच्या बगलांना उताराच्या मध्यावर लावतात. पुढेजरुरीप्रमाणे वरंबे फोडूनमातीची भर पिकांना देऊन ती वरंब्यांच्यामाथ्यावर येतील असे करतात.

रुंद वरंबे किंवा पट्टा पद्घतीने पाणी देणे : पाणी देण्याची एकसुधारित पद्घत. जमिनीवर सव्वा ते दीड मी. अंतरावरसरीच्या नांगरानेखोल सऱ्या पाडतात. त्यांची लांबी जमिनीच्या उताराप्रमाणे १०–१५मी.पर्यंत ठेवता येते. दोन सऱ्यांमधील वरंब्याचा माथा एक ते दीड मी.रुंद ठेवतात. पिकांची लागवड या दीड मी. रुंदीच्या माथ्यावरच करतात.त्यामुळे पिकाला दिलेले पाणी त्याच्या बुंध्याला प्रत्यक्ष भिडत नाही.पाणी वरंब्यात झिरपत असल्यामुळे पाण्याच्या कितीहीपाळ्या दिल्यागेल्या तरी त्याची माती पाण्याने घट्ट होत नाही, भुसभुशीतच राहूनतिच्यात हवा खेळत राहते. दोन वरंब्यांमधील सऱ्यांचा पाण्याच्यापाटासारखा उपयोग होतो. अधूनमधून पाण्याबरोबर वाहत येऊन पाटातसाचलेली मातीउकरुन ती वरंब्यावरील पिकात पसरतात, त्याने पाटखोल होतो. वरंब्यावरील पिकाची मशागत हातमजुरीनेच करुन घ्यावीलागते. वरंब्याची माती पोकळ भुसभुशीत राहिल्यामुळे पिकाची मुळेखोलवर जाऊन पुरेसे पोषक द्रव्य मिश्रित पाणीशोषून घेतात, त्यानेचांगली वाढ होते व त्यामुळे उत्पन्नही जास्त येते.

ज्यापिकांना जास्त प्रमाणातील पाणी सहन होत नाही, त्या पिकांच्यालागवडीसाठी ही पद्घत उत्तम समजतात. विशेषतः हलक्या जमिनीपेक्षामध्यम प्रकारच्या किंवा भारी काळ्या जमिनीत या पिकांच्या लागवडीसाठी तसेच बियांपासून पिकांची रोपे तयार करण्यासाठी या पद्घतीचाफार चांगला उपयोग होतो.

जमिनीच्या पृष्ठभागाखालून पाणी देणे : पाणी देण्याच्या या प्रकारातजमिनीतील मुळांच्या पट्ट्याच्या भागात पाणी फिरेलअशी व्यवस्थाकरतात. या प्रकारात नैसर्गिक व कृत्रिम असे दोन उपप्रकार आढळतात.नैसर्गिक उपप्रकारात मुळांच्यापट्ट्या च्या खाली जमिनीत जलाभेद्य थरअसेल, तर असे पाणी पिकाला देता येते. अशा प्रकारच्या जमिनीतजलाभेद्य थरापर्यंत पोहोचतील असे खोल चर विशिष्ट अंतरावर रांगेनेखोदून त्यांच्यामधून पाणी सोडतात. हे पाणी पोर्शीय पद्घतीने ( बाजूने )पिकांच्या मुळांच्या पट्ट्यात पसरते. यात बाष्पीभवनाने होणारा पाण्याचानाशही टाळता येतो. कृत्रिम उपप्रकारात पिकाच्या मुळांच्या जमिनीतील पट्ट्याखाली सच्छिद्र नळ्या घालून त्यांच्यात पाणी सोडतात. यापट्ट्यापर्यंतच्या जमिनीतील केशिका जलाच्या हालचालीचा फायदावनस्पतींच्या मुळांना मिळावा असेच या उपप्रकाराचेउद्दिष्ट असते.बाष्पीभवनाने पाणी निघून जात नाही आणि पिकाची मशागत औताच्यासाहाय्याने करता येते हे फायदे यातमिळतात. लागवडीनंतर पुष्कळकाळापर्यंत त्याच जागी वाढत राहणाऱ्या पिकांच्या बाबतीत हा उपप्रकार उपयुक्त ठरतो.मात्र खर्च जास्त लागत असल्यामुळे त्याचा प्रसारफारसा झालेला नाही. भारतात हा प्रकार प्रचलित नाही. अमेरिकेच्यासंयुक्त संस्थानांमध्ये ॲरिझोना, कॅलिफोर्निया व उटा राज्यांतआणिइझ्राएलमध्ये हा उपप्रकार काही प्रमाणात प्रचारातआहे.


जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर काही थोड्या उंचीवरुन पाणीफवारणे : तुषार सिंचन : हा फवाऱ्याद्वारे पावसाप्रमाणे पाणी देण्याचाप्रकार १९०० सालाच्या सुमाराला अमेरिकेमध्ये प्रचारात आला.त्यावेळी त्याचा उपयोग मुख्यतः घरापुढीलहिरवळीला पाणी देण्याकरिता करीत असत. पुढे त्याचा उपयोग भाजीपाल्याची पिके, रोपवाटिका( रोपांची बाग ) वफळझाडे यांना पाणी देण्यापुरताच होत असे. १९३०पासून यास लागणारी साधनसामगी म्हणजे जरुर त्या पोलादी ववजनाला हलक्या नळ्या आणि तोट्या झटपट एकमेकींशी जोडता येण्यासारख्या मिळू लागल्यामुळे हा पाणी देण्याचा संचएका ठिकाणाहूनदुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल, असा बनविता येऊ लागला. त्यामुळेत्याचा उपयोग शेतीमध्येही होऊलागला. ज्याजमिनीत पृष्ठभागावरुनप्रवाह रुपाने दिलेले पाणी फार जिरते आणि पाणी देणे कष्टदायक होतेअशाजमिनीसाठी, तसेच फार उतार असल्यामुळे पाण्याने धूप होणाऱ्याजमिनीसाठी आणि समपातळीत आणण्यासाठी फार खर्च लागणारअसलेल्या जमिनीच्या बाबतीत हा पाणी देण्याचा प्रकार फार उपयुक्तअसतो. या प्रकारात पाण्याचे नळ जमिनीखाली घालावे लागतात किंवाव्यवस्थितपणे जमिनीवरही मांडून ठेवता येतात. त्यांना जोडलेले बाजूचेलहान आकाराचे पार्श्व नळ ॲल्युमिनियमासारख्या हलक्या धातूचेघेतात. यांतील आडव्या नळावर जमीन सपाटीपेक्षा काही ठराविक उंचीचेनळ ठराविक अंतरावर जोडलेले असतात. त्यांना पाणी फवारणाऱ्यातोट्या जोडलेल्या असतात. मुख्य मोठ्या नळातून पार्श्व नळामध्येआवश्यक दाबाने पाणी ढकलले जाईल अशी यांत्रिक योजना केलेलीअसते. तिच्यामुळेबाजूकडील नळांतील पाण्यावर ठराविक प्रमाणातदाब पडून त्या नळाला जोडलेल्या उभ्या नळाच्या तोटीतून पावसाच्याधारांप्रमाणे पाण्याच्या धारा बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे पिकालानैसर्गिक पावसाच्या पाण्यासारखे पाणी दिल्याप्रमाणेहोते. पाणी फेकलेजाण्याची कक्षा नळावर बसविलेल्या तोटीचा आकार व पाण्यावरीलदाब यांच्यावर अवलंबून असते.संपूर्ण क्षेत्रात पाणी सारखे पसरावे म्हणूनया तोट्या बसविलेले उभे नळ त्या क्षेत्रात हिशोब करुन योग्य अंतरावरबसवितात. योग्य प्रकारच्या तोटीचा उपयोग केल्यास ताशी अर्धा तेदोन सेंमी.पर्यंत पाणी जमिनीला देता येते. पार्श्वनळांतील पाण्यावरील दाबनियंत्रित करण्याची सोय केलेली असते.

यात दुसरी एक योजना अशी असते की, तिच्यामध्ये तोट्याबसविलेले उभे नळ वापरीत नाहीत. पार्श्व नळांनाच भोके पाडलेलीअसतात, त्यांच्यामधून पाण्याच्या धारा पावसाच्या धारांसारख्या पिकांवरपडतात. त्यांचे प्रमाण दर तासाला २– ५ सेंमी. इतके जास्त असते.त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला नसला तर तिच्यावर अनिष्टपरिणाम होण्याचासंभव असतो.

जमिनीला पाणी देण्याच्या या दोन्ही प्रकारांच्या बाबतीत प्राथमिक खर्चफार असतो. शिवाय तिच्यातीलयांत्रिक सामगीची देखभाल करण्यासाठीहीखर्च जास्त येतो. त्यामुळे ती भारतात फारशी वापरात नाही.चढ-उताराच्या पाटाच्या पाण्याच्या प्रवाहाने धुपून जाण्याची शक्यताअसलेल्या व सपाट करुन घेण्याकरिता अफाट खर्च करावा लागणाऱ्यापरंतु नगदीपिकांना योग्य असलेल्या जमिनीला पाणी देण्यासाठी हीयोजना उपयुक्त ठरते. मात्र पाण्याचा पुरवठा पुरेसा, खात्रीशीर वकायमटिकणारा आणि गाळ विरहित असावा लागतो. या योजनेमुळे पुढीलप्रमाणे फायदे मिळतात : (१) प्रत्येक पाळीतद्यावयाच्या पाण्याची बचतहोते. (२) दिलेले पाणी पिकाबाहेर वाहून जाऊन ते वाया जात नाही.(३) पाणी देता यावेम्हणून जमीन सपाट करुन घ्यावी न लागल्यामुळेखर्चात बचत होते. (४) पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होत नाही.(५) पाणी अडविण्याकरिता वाफे, सारे वगैरे करावे न लागल्यामुळेत्यांत वाया जाणारी जमीन पिकाखाली येऊन उत्पन्नातभर पडते. (६)दिलेले सर्व पाणी जमिनीत मुरते, त्यामुळे पिकावर त्याचा चांगलापरिणाम होऊन उत्पन्न वाढते. (७)द्रवरुपातील खते, कीटकनाशके वकवकनाशके यांचाही या योजनेद्वारा उपयोग करता येतो.

समोच्च रेषेशी समांतर पाटामधून पाणी देण्याचा प्रकार : निसर्गतःउंचसखल असलेल्या जमिनीत पाण्याचे नुकसान नहोता पिके काढण्यासाठी एक नवीन सिंचन पद्घत शोधून काढण्यात आली आहे. तिलासमोच्च रेषेशी समांतर पाटामधून पाणी देण्याचा प्रकार म्हणतात. त्यातपिकांना पाणी देण्यासाठी जमिनीच्या उताराच्या दिशेने कालव्याच्या चाऱ्याकाढूनत्यांच्यामधून जरुरीप्रमाणे पाट आणि दांड समोच्च रेषेला समांतरकाढतात. त्यांच्यामधून समोच्च रेषेला धरुन लागवडकेलेल्या पिकांनापाणी देण्यात येते. साधारणतः ३ – २०% प्रमाणात उतार असलेल्याजमिनींना याप्रमाणे पाणी देणेजास्त सुलभ जाते. रेताड जमिनीत हीयोजना उपयोगी पडत नाही. तिचा उपयोग सर्व प्रकारच्या फळझाडलागवडीच्याआणि बागायती पिकांच्या बाबतींत श्रेयस्कर ठरतो.

ज्याजमिनीचा उपयोग करावयाचा असेल तिच्यात असलेल्या चढ-उताराचे प्रमाण उंचसखल भाग आणि समोच्च रेषा इ. बाबी दर्शविणारानकाशा प्रथम तयार करुन घेण्याची आवश्यकताअसते. पिकांना पाणीदेण्यासाठी चाऱ्या व पाटांची प्रथम आखणी करतात. चाऱ्या जमिनीच्याउताराच्या दिशेने काढतात. नंतर जमिनीच्या उताराला आडव्या येणाऱ्यासमोच्च रेषेला समांतर मार्गदर्शक रेषा नक्की करतात. मार्गदर्शक रेषांचीलांबी साधारणतः १२० मी. पेक्षा जास्त ठेवत नाहीत. विहिरीच्यापाण्यावर भिजणाऱ्या क्षेत्रासाठी ही लांबी सु. ४६ मी. ठेवतात.

फळझाडांची लागवड मार्गदर्शक रेषेला समांतर करतात. मोसमीपिकांची पेरणी सर्वांत खालच्या मार्गदर्शक रेषेपासून सुरुकरुन वरच्यादिशेने मार्गदर्शक रेषेला समांतर पेरीत जातात. पिकाला पाणी देतानाउंचावरील किंवा चढाकडीलभागाकडून सुरुवात करुन क्रमाक्रमानेखालच्या बाजूकडे पाणी देत येतात. पाण्याची पहिली पाळी देतानाविशेष काळजीघ्यावी लागते. पिकाच्या ओळीच्या दोन्ही टोकांनायोग्य प्रमाणात पाणी मिळेल अशी दक्षता बाळगतात. या पद्घतीत एकहेक्टर क्षेत्र भिजविण्यास एका पाळीला जवळपास ३० तास इतका वेळलागतो. मोकार पाणी देण्याच्या पद्घतीत याचकामासाठी सु. ५६ तासलागतात. मोकार पाणी देण्याच्या पद्घतीत ठराविक क्षेत्राला जितकेपाणी लागते त्याच्यानिम्म्याइतके पाणी यात पुरेसे होते. सर्व जमिनीतपाणी संथपणे आणि सारखे जिरते. जमिनीची धूप होत नाही.हातमजुरीचेकाम कमी असल्यामुळे खर्चात बचत होते.

आ. १. साधी ठिबक सिंचन पद्घती : (१) झडप, (२) पार्श्वप्रवाह प्रतिबंधक, (३) दाब नियंत्रक, (४) गाळणी, (५) नलिका, (६) ठिबक नलिका, (७) उत्सर्जक, (८) अंत्य टोपण.ठिबक सिंचन : ठिबक सिंचनाद्वारे पिकांच्या मुळाजवळ थेंब थेंबपाणी दिले जाते, त्यामुळे बाष्पीभवन आणि खोलवरजमिनीत मुरुन होणारापाण्याचा अपव्यय टाळला जातो. यात पाण्याचा वापर जवळजवळ पूर्ण-पणे नियंत्रित केलेलाअसतो. परिणामी जमीन पाणथळ होऊन क्षारपडहोण्याचे थांबते. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पिकाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात (१२–३१ टक्के ) वाढण्यास मदत होते. तसेच सिंचनाखालील क्षेत्रवाढविण्यास (२५–४० टक्के ) मदत होते.ठिबक सिंचनासाठी पाण्याचेमुख्य नळ, उपमुख्य नळ व पार्श्व नळ असे नळांचे जाळेच तयार करावेलागते. पार्श्व नळावरबसविलेल्या ठिबक यंत्रणेच्या तोट्यांतून पिकाच्यामुळाजवळ आवश्यक दाबाने थेंब थेंब पाणी दिले जाते. या पद्घतीमुळेपाण्याची जवळपास २५–५० टक्के बचत होते. या पद्घतीद्वारे पिकाला द्रवरुपातील पोषक घटकांचा तसेच कीटकनाशकांचा पुरवठा करता येतो.


  विहिरीतील पाण्यामुळे जमीन खारवट बनणे : शेतीसाठीवापरल्या जाणाऱ्या पाण्यात क्षारांचे प्रमाण एक दशलक्ष भागात १००भागांपर्यंत असले तरी चालते परंतु एवढ्या वरुनच शेतीस लागणारे पाणीचांगले किंवा वाईट हे ठरविता येत नाही.क्षारांचे स्वरुप, त्यांचे रासायनिकगुणधर्म, जमिनीची खोली, मातीची संरचना, पीक बारमाही बागायती कीहंगामीबागायती, पिकाला किती पाणी लागते, पिकाची क्षार पचविण्याचीशक्ती इ. गोष्टी लक्षात घेऊन पाण्याची प्रत ठरवावीलागते. याबाबत ज्यावेळी विहिरीचे पाणी शेतीसाठी वापरावयाचे असेल त्या वेळी अधिककाळजी घ्यावी लागते.विहिरीच्या झऱ्यातून येणारे पाणी हे जमिनीच्यानिरनिराळ्या थरांतून झिरपत आलेले असते. झिरपताना जमिनीतील क्षारपाण्यात विरघळतात. जमीन ज्याखडकांपासून तयार झाली त्यांचा प्रकार,जमिनीचा निचरा, जमिनीतील जैविकपदार्थांचे प्रमाण इ. गोष्टींवर पाण्यातविरघळलेल्या क्षारांचे स्वरुप व प्रमाण अवलंबून असते. नदीवर धरणबांधून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्यातून दिले जाते. अशा पाण्यातक्षारांचे प्रमाण कमी असते. कारण नदीत येणारे पाणी बहुधा जमिनीच्यापृष्ठभागावरुन वाहत आलेले असते. त्यामुळे हे पाणी मातीच्या थोड्याचकणांच्या सान्निध्यात व तेही थोडा वेळच येते.

पाण्यात जे क्षार असतात त्यात सोडियमाच्या क्षारांचे प्रमाणअधिक असते. कारण सोडियमाचे क्षार पाण्यात अधिकविद्राव्य असतात.हे क्षार म्हणजे सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराइड व सल्फेटहे होत. पोटॅशियमाचेही क्षार पाण्यात विद्राव्य असतात. कॅल्शियम वमॅग्नेशियमाचे क्षारही पाण्यात असतात. त्यांची बायकार्बोनेटे, क्लोराइडेव सल्फेटे हे क्षारपाण्यात विरघळण्याची शक्यता असते. या सर्व क्षारांपैकी सोडियमाचे क्षार जमीन व वनस्पती यांना अपायकारक ठरतात.त्यातल्या त्यात कार्बोनेटे व बायकार्बोनेटे हे अधिक अपायकारकअसतात, कारण त्यामुळे जमीन क्षारीय होत जाते. सोडियम क्लोराइड वसल्फेट हे उदासीन असल्यामुळे ते तितकेसे अपायकारक नसतात. उलटत्यामुळे कार्बोनेट वबायकार्बोनेटांद्वारे तयार होणारी क्षारीयता नियंत्रणातठेवली जाते. कॅल्शियम व मॅग्नेशियमाचे क्षार कमी प्रमाणात विद्राव्यअसल्यामुळे पाण्यात कमी प्रमाणात आढळतात आणि कमी अपायकारकही असतात. जमिनीचे कण फार बारीक असल्यास त्यांच्या जास्तपृष्ठभागाच्या सान्निध्यात पाणी येते आणि अशा जमिनीत पाण्याची हालचालमंद होत असल्यामुळे पाणीजमिनीच्या कणांच्या सान्निध्यात अधिक वेळराहून अधिक क्षार विद्राव्य होतात. दक्षिण ट्रॅप खडकापासून बारीककणांचीव अधिक खोलीची माती तयार होते, तर जांभा खडकापासूनअधिक खरखरीत माती तयार होते. म्हणून पहिल्याप्रकारच्या जमिनीतीलविहिरीच्या पाण्यात अधिक क्षार व दुसऱ्या प्रकारात कमी क्षार आढळतात. ग्रॅनाइट, पट्टिताश्म किंवाकुरुविंदाच्या खडकापासून तयार झालेल्याजमिनीतील विहिरीच्या पाण्याचे दुसऱ्या प्रकाराशी साम्य आढळते.

पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असेल, तर अशा प्रकारच्यापाण्याच्या वापरामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे त्यामातीची संरचना बिघडते. मातीचे कण चिकट बनतात. जमीन खारावते वउपळते. यामुळे आवश्यक अशा सूक्ष्मजंतूंची जीवनकिया व्यवस्थित होतनाही. अशा जमिनीत वनस्पतींच्या वाढीला आवश्यक ते क्षार उपलब्ध होतनाहीत. परिणामतः वनस्पतींची वाढ नीट होत नाही. अशा परिस्थितीतचबोरॉनाचे प्रमाण वाढून वनस्पतींना अपायकारक ठरते.

विहिरीच्या पाण्यात क्षार जास्त असल्यास पावसाळ्यानंतर तेशेतीला वापरण्यापूर्वी दोन-तीन वेळा विहिरीतून काढून शेताबाहेरसोडून देतात. विहिरीच्या पाण्यात कार्बोनेटे जास्त असल्यास विहिरीत१००–१२५ ग्रॅ. फेरस सल्फेट वर्षातून दोन वेळाटाकतात.

गोखले, गो. पां.

पाणी उचलण्याची साधने : पाणी उचलण्याकरिता मानवीशक्ती, बैलांची शक्ती, पाणी तसेच वाऱ्यापासून उपलब्ध होणारी नैसर्गिकशक्ती व यांत्रिक शक्ती यांचा वापर करण्यात येतो. निरनिराळ्या प्रकारचीशक्ती वापरुन चालणारी साधने म्हणजेसूप, चंपारा, ओवटी, आर्किमिडीजस्क्रू , साखळी पंप, मोट, रहाटगाडगे इ. वेगवेगळ्या साधनांनी पाणी३० सेंमी. ते ३० मी. उंचीपर्यंत उचलून जमिनीला दिले जाते. यांपैकीकाही साधनांबद्दलची माहिती खाली दिली आहे.

सूप : हे धान्य पाखडण्याच्या सुपासारखे परंतु त्यापेक्षा मोठे असूनते बांबूच्या कामट्या आणि त्याच्या पातळ व लांबलचक काढलेल्यापट्ट्यां पासून तयार करतात. याच्या जाड काठाच्या व बिनकाठाच्या बाजूंनासमांतर रेषेत दोन दोऱ्याबांधतात. पाण्यात उभी असलेली दोन माणसेत्या दोऱ्याची टोके हातात धरुन सुपाला झोका देतात, त्यामुळे सुपातपाणीभरते. झोका चालू असतानाच सूप वरच्या बाजूस उचलले जाऊनपाणी पलीकडे उंच ठिकाणी ओतले जाते. याचा वापरकोकणात होतो.

चंपारा : हे नाल्यातून अगर तळ्यातून १ मी. उंचीवर पाणी उचलण्याचेप्रतिभार तत्त्वावरील साधन आहे. ते अंदाजे २ मी.लांब, ३० सेंमी.रुंद व पिछाडीस ३० सेंमी. उंच अशा सुपाच्या स्वरुपाचे लोखंडीपत्र्याचे बनविलेले असते. चंपारामध्यभागी लाकडी टेकूवर आधारतात.शेजारी रोवलेल्या लाकडी तिकाटण्याला जमिनीपासून २ मी. उंचीवरबांधलेल्याआडव्या वेळूच्या एका टोकास चंपाऱ्याची मागील बाजूदोराने टांगतात आणि दुसऱ्या टोकास चंपाऱ्याच्या पाण्यासह वजनापेक्षाथोड्या जास्त वजनाचा दगड बांधतात. नाल्यात अगर तलावात उभेराहून एक माणूस चंपाऱ्याची पिछाडीपाण्यात दाबतो त्यामुळे त्यात पाणीभरते. लगेच दोरीवरील पकड सैल केल्यावर वेळूच्या दुसऱ्या टोकालाबांधलेल्यादगडाच्या वजनामुळे चंपारा वर उचलला जाऊन टेकूभोवतीफिरुन त्यातील पाणी ०.५–१ मी. उंचीवर ओतले जाते.याचा वापरकोकणात व घाटाच्या प्रदेशांत होतो.

ओवटी : ओवटीने ओढ्यातील वा बुडकीतील पाणी प्रतिभाराच्यातत्त्वाने माणसांकरवी उचलता येते. पाण्याच्यासाठ्या जवळ गाडून पक्काकेलेल्या बळकट खांबावर जमिनीपासून २ मी. उंचीवर एक दणकटपातळ वासा त्याच्याबेचक्यात लोखंडी सळईने आडवा जोडून घेतात.सळई वाशाच्या मध्यभागी न घेता ती अशी बसवितात की, यावाशाचा बुंध्याकडील भाग तोकडा राहून शेंड्याकडील भाग विशिष्टप्रमाणात लांब राहील. वाशाच्या लांबीकडील टोकाला उभ्या बांधलेल्यावेळूच्या तुकड्याखाली बादलीअडकवितात. पाण्याने भरलेल्याबादलीच्या वजनापेक्षा थोड्याअधिक वजनाचादगड वाशाच्याबुंध्याकडील भागाला दोरीने घट्टआवळून बांधतात. पाणी विहिरीतून खेचावयाचे असेल तर पाणीखेचणाऱ्या माणसाला उभे राहण्याकरिता विहिरीच्या काठाला लागूनमाची तयार करतात. ओवटीचालविणारा माणूसउभा वेळूखाली ओढून त्याला अडकविलेलीबादली पाण्यात बुडवितो.ती भरल्यानंतर वेळूवरील पकडसैल केल्यावरप्रतिभारी दगडानेबादली वर उचलली जाते.अपेक्षित उंचीवर बादली पोहोचली की, त्या बादलीतील पाणीतयार करुनठेवलेल्या थारोळ्यातओततात. ओवटी तयार करणेसोपे असून नादुरुस्त झाल्यासती घरीच दुरुस्त करता येते.ओवटीचा वापर कोकणात जास्तप्रमाणात केला जातो.


आर्किमिडीज स्क्रू : लाकडीनळाच्या आतील बाजूस लाकडीविभाजक लावून आरपार जाणाऱ्याआसावर दांडा बसवूनआर्किमिडीज स्क्रू तयार करतात. २.५ चौ. सेंमीव ४ मी. लांब आसाभोवती त्याची दोन्ही टोके मोकळी ठेवून मध्यभागीनागमोडी पद्घतीने लावलेल्या फळ्यांनी ४० सेंमी. व्यासाचा २.५ मी. लांबउघडा स्कू तयार करतात. त्याला बाहेरच्याबाजूने फळ्या मारुन तो बंदकरतात आणि त्याच्या एका टोकास दांडा बसवितात. हा बंद स्क्रू  पाण्याशी२५º कोनकरुनदोन खांबांवर असा आधारतात की, त्याचे दांडालावलेले टोक शेतातील पाटावर येते व दुसरे टोक पाण्यात अर्धे बुडते.अशा स्क्रू चा दांडा माणसांकरवी फिरविल्यास खालील पाणी वर चढूनपाटात पडते. एका ठिकाणाहून हा स्क्रू  दुसऱ्याठिकाणी सहज नेता येतो.सूप, चंपारा व ओवटी यांच्यापेक्षा हा स्क्रू  जास्त कार्यक्षम असूनचालविण्यास सोपा आहे. केरळ राज्यात याचा वापर जास्त प्रमाणात होतो.

साखळी पंप : विहिरीच्या काठावर मजबूत पायावर दोन्ही बाजूसदांडे असलेले एक लोखंडी दातेरी चाक बसवून त्यावरएक निरंतसाखळी पाण्यात १ मी.पर्यंत बुडवून ठेवीत. उपलब्ध पाणी काढण्याचे हेसाधन आहे. चाकाचे दांडेमाणसांकरवी फिरविल्यास साखळीत अडकूनपाणी चाकांपर्यंत वर खेचले जाते आणि तेथून बाहेर पाटात पडते.अशा पंपात साखळीला प्रत्येकी ३० सेंमी. अंतरावर लाकडी गट्टूमध्ये१० सेंमी. व्यासाच्या जाड कातडी पिशव्या बसवितात आणिसाखळीचीखेचली जाणारी बाजू एका लोखंडी नळीतून वर आणतात. साखळीचेदांडे माणसांनी फिरविल्यास साखळीतअडकलेल्या पाण्याबरोबर कातडी पिशव्यांत साचलेले पाणीही

कोष्टक क्र . ३. पाणी उचलण्याच्या साधनांच्या कार्यक्षमतेची तुलनात्मक माहिती

 

उंचीस उपयोग

दर ताशी पाणी

उचलण्याची क्षमता

लागणारी शक्ती

 

शेरा

साधन

मीटर

पासून

मीटर

पर्यंत

हजार लिटर

पासून

हजार लिटर

पर्यंत

माणसे

बैल

 

सूप

०.३०

०.४५

 

चंपारा

०.५०

१.००

२०

१०

 

ओवटी

१.५०

४.००

१०

 

आर्किमिडीज स्क्रू 

०.५०

१.००

३०

१६

 

साखळी पंप :

(१) साधा

(२) कातडी

पिशव्यांसहित

(३) दुहेरी साखळी

पंप

 

३.००

३.००

५.००

२०

१,२

 

मोट :

(१) सोंडेची वा

पत्र्याची

(२) बिनसोंडेची

रहाटगाडगे

लाट

पाणदट्ट्या

पवनचक्की

२.५०

२०.००

३.००

३.००

३.००

१०.००

३०.००

३०.००

१०.००

४.००

१००.००

३०.००

२५

१५

१५

१.५

०.५

०.५

१,२

नैसर्गिक पाणी

नैसर्गिक वारा

चाकापर्यंत येते. यात दुहेरी साखळीपंप असा दुसरा प्रकार असतो. असे पंप बैलांच्यासाहाय्याने चालविलेजातात. त्यात एका आसाभोवती बसविलेल्या दोन चाकांवरील साखळ्यानिरनिराळ्या नळ्यांतून वरयेतात. आस फिरु लागल्यावर चाके फिरुलागतात व दोन्ही नळ्यांतून वर येणाऱ्या पाण्याचा एक प्रवाह सततवाहूलागतो.

लाट : विहिरीवर दोन लाकडी चके एकमेकांपासून अंदाजे १.५ मी.अंतरावर बसवून त्यांवर पोहऱ्यांच्या दोन माळाबसवितात. चाकांचेपरीघ एकमेकांस लांब फळ्यांनी जोडतात. काठावर बसून एक अगरदोन माणसे एकाच वेळी एकफळी पायांनी खाली दाबून चाके फिरवितातआणि पाणी वर येते.

माणसांच्या, जनावरांच्या, नैसर्गिक पाण्याच्या व नैसर्गिक वाऱ्याच्याशक्तीवर चालणाऱ्या पाणी उचलण्याच्या साधनांच्याकार्यक्षमतेचीतुलनात्मक माहिती कोष्टक क्र . ३ मध्ये दिली आहे.

यांत्रिक शक्तीवरील पाणी उचलण्याची साधने : यांत्रिक शक्तीनेपाणी उचलण्याची विविध साधने वापरात आहेत. केरोसीन, पेट्रोल आणिडीझेल एंजिने व आडव्या अगर उभ्या आसाच्या विद्युत् मोटारींवरचालणारे पश्चाग्र गतीचे पंप,केंद्रोत्सारी पंप, आसाधारित प्रवाही पंप वउभ्या आसाचे चक्की पंप यांचा या साधनांत मुख्यतः समावेश होतो.

प्रवाहातीलअगर साठ्या तील पाणतळापासून पश्चाग्र गतीचे वकेंद्रोत्सारी पंप ५-६ मी. उंचीपर्यंतच बसवावे लागतात. त्यापेक्षा उंचीजास्त झाल्यास पाणी खेचण्याचे काम मंदावते व प्रसंगी बंदही पडते.नदीकाठी अगर विहिरीवर हे पंप बसविण्यापूर्वीपावसाळ्यातील उच्चतमतसेच उन्हाळ्यातील नीचतम पाणतळाची माहिती असणे आवश्यकअसते. पाणतळावर १– ५ मी. दरम्यान एक अगर अनेक ठिय्ये करुनपाणतळानुसार विशिष्ट ठिय्यांवर पंप बसवावे लागतात. पंपापासूनपाणतळ ५मी. पेक्षा खोल जाऊ लागल्यास पंप ताबडतोब दुसऱ्याठिय्यावर बसवावा लागतो. आसाधारित प्रवाही पंपाचा वापरमुख्यतःएका चारीतील पाणी २-३ मी. उंचीवरील दुसऱ्या चारीत उचलूनटाकण्यासाठी होतो.

उभ्याआसाचे चक्की पंप विहिरीवरील पक्क्या लोखंडी तुळयांवरआधारुन पाण्यात टांगून ठेवतात. पंपाच्या खालील टोकास लावलेलेजलोत्सारक पंखे पाण्यात बुडल्यावरच हे पंप कार्यान्वित होत असल्यामुळेपंखे कोरड्या स्थितीतकदापिफिरणार नाहीत याची काळजी घ्यावीलागते. भूमिगत १००–१२५ मी. खोल छिद्रातून पाणी उचलण्यास ह्यापंपाचा उपयोग होतो. नद्यांवरील मोठ्या जलसिंचन योजनांमध्ये ह्यापंपाचा वापर सर्वत्र केला जातो.


स्थापत्य अभियांत्रिकी

सिंचन पद्घती : प्रपात प्रवाह कालवे : वाहणाऱ्या प्रवाहानेसिंचनाकरिता पाणी उपलब्ध करुन देण्याची प्राथमिक पद्घती म्हणजेप्रपात प्रवाहसिंचन पद्घती होय. नदीला पूर आला म्हणजे पाणी बाजूच्याभूभागावर पसरु लागते. अशा पुरापासूनसंरक्षण व्हावे म्हणून नदीलादोन्ही बाजूंस बांध घालतात. या बांधांतून कालवे काढतात. नदीला पूरआला की,कालव्यातून प्रवाह वाहू लागतो आणि त्यातील पाणी तटाच्याभूभागांना पाहिजे त्या प्रमाणात लहान कालवे व चाऱ्यायांद्वारे देता येते.कालव्यात येणारे पाणी कमी-जास्त करता यावे म्हणून बांधासदरवाजे बसवितात. अशा दरवाजांच्याअभावी कालव्यात अपेक्षेपेक्षासिंचनजास्त पाणी शिरुन नुकसान होण्याची शक्यता असते. ईजिप्त देशातहीपूर्वी अशा पद्घतीने सिंचन होत असे.

प्रवाहसिंचन : प्रवाहसिंचन हा प्रपात प्रवाह पद्घतीचा पुढील टप्पाहोय. बंधाऱ्याचे कार्य म्हणजे नदीतील पाणी अडवून वत्याची पातळीवाढवून नदीच्या तळापासून काही मीटर उंच तळ असलेल्या कालव्यातपाणी नेणे शक्य करणे हा होय.अतिरिक्त पाणी बंधाऱ्यावरुन किंवाबंधाऱ्यातील दरवाजांतूनवाहून जाते. नदीच्या वरील भागात खोऱ्याच्यादोन्ही बाजूतळापेक्षा बऱ्याच उंच असल्यामुळे अशा कालव्यांनीबंधाऱ्याच्या अगदी जवळची जमीन भिजविता येत नाही. परंतु खोलखणलेल्या भागातून काही अंतर गेल्यानंतर कालवा अशा भागात प्रवेशकरतो की, कालव्याची नदीकडील जमीनकालव्यापेक्षा खालच्यापातळीची असते. अशा भागात उपकालवे, फाटे व चाऱ्या करुन जमीनभिजविता येते. अशाबंधाऱ्यांचा पाणी साठविण्याचा उद्देश नसून केवळपाण्याची पातळी उंचावण्याचा असतो. जेव्हा बंधारे मोठ्या जलाशयांच्याखाली काही अंतरावर बांधलेले असतात तेव्हा बंधारा थोडा अधिक उंचकेल्यास, त्यात पाण्याची साठवणही करता येते.महाराष्ट्रातील कृष्णानदीवरील खोडशी येथील बंधारा केवळ पाणी उंचावण्याचे कार्यकरतो परंतु गोदावरी नदीवरीलनांदुरमधमेश्वर येथील बंधारा नदीच्यापाण्याची पातळी उंचावतो व साठवणही करतो.

जलाशय : सिंचन पद्घतीतील सुधारणेचा तिसरा टप्पा म्हणजेपावसाळ्यात नदीतून वा नाल्यातून वाहणारे पाणी समुद्राला मिळूनवाया जाऊ नये, म्हणून ते योग्य जागी धरण बांधून साठविणे. तसेचनदीचा प्रवाह जेव्हा सिंचनाच्या गरजेपेक्षा कमीअसेल तेव्हा कालव्याला जलाशयातून पाणी पुरविणे हा होय. उदा., भोरजवळ येळवंडीया नीरेच्या उपनदीवर बांधलेलेभाटघरचे धरण. महाराष्ट्रात मुठा, दारणा,प्रवरा, भीमा, गोदावरी, गिरणा आदी नद्यांवर असेच जलाशय तयारकेलेले आहेत. पंजाबमध्ये सतलज नदीवर भाका येथे, ओरिसामध्येमहानदीवर हिराकूड येथे, गुजरातमध्ये नर्मदा नदीवरसरदार सरोवरतसेच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांतहीनद्यांवर धरणेबांधून मोठाले जलाशय तयार करण्यात आलेआहेत. नर्मदा नदीवरीलसरदार सरोवर हा भारतातील सर्वांत मोठा जलाशय आहे.

जलाशयाचे सिंचनाशिवाय इतर उपयोग : जलाशयाचे इतर उपयोगम्हणजे पूरनियंत्रण, विद्युत् उत्पादन, उद्योगधंदे व गृहोपयोगासाठीपाणीपुरवठा, मत्स्यसंवर्धनाची व जलकीडेची सोय हे होय.

जलाशयात करावयाच्या साठ्याचा निर्णय : जलाशय निर्माणकरण्याआधी संभाव्य ठिकाणांची अनेक तऱ्हांनी पाहणी करावी लागते.ज्याठिकाणी जलाशय निर्माण करावयाचा असेल तेथे नदीच्या प्रवाहाचीअनेक वर्षांची माहिती उपलब्धअसेल तर त्या ठिकाणी किती साठाकरता येईल याचा अधिक खात्रीलायक अंदाज करता येतो. जलाशयासाठीबांधावयाच्या धरणावर पाणलोट क्षेत्र किती आहे ? पाणलोटक्षेत्रात दरवर्षी किती पाऊस पडतो ? केव्हा पडतो ? पडतो त्या वेळीकिती वेळात किती पडतो ? इ. माहिती गोळा करावी लागते. यामाहितीच्या साहाय्याने व आधीच निर्माणकेलेल्या जलाशयाच्या जागी,पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस व जलाशयाच्या जागी उपलब्धझालेला पाणीपुरवठ्याचा अंदाज बांधण्यात येतो.

जलाशयाची जागा : धरणाच्या जागी नदी अरुंद व वरच्या बाजूसखोरे रुंद असावे. शक्यतो धरणाच्या वरच्या बाजूस उपनद्या वा नालेमुख्य प्रवाहाला मिळत असावेत. अशा ठिकाणी धरणाचा खर्च कमीहोऊन पाण्याचा साठा अधिक होऊ शकतो. धरणाच्या जागेचे सर्वेक्षणकरुन, पायाची तपासणी करुन आणि वेगवेगळ्या पर्यायांचा विचारकरुन ती पक्की करावी लागते.

जलाशयातील उपयोगी साठा : जलाशयातील सर्वच साठा दरवर्षीउपयोगात आणता येत नाही. जलाशय सामान्यतः पावसाळ्याच्या अखेरीसभरलेले असतात. त्यात काही अंशी पावसाळ्यानंतरच्या नदीच्या प्रवाहानेथोडीशी भर पडते परंतु याउलट पावसाळ्याच्या अखेरीपासून पुन्हापावसाळा सुरु होईपर्यंत बाष्पीभवनाने साठा काही प्रमाणात कमीहीहोत असतो. साधारणतः १५०–२०० सेंमी. इतके पाणी बाष्पीभवनानेवाया जाते. जलाशयाच्या तळापर्यंतचे पाणी वापरता येत नाही. नदीच्याप्रवाहाबरोबर वाहून येणारा गाळ तलावाच्या तळाशी बसतो. वर्षानुवर्षेहा गाळ वाढत जातो. याकरिताजलाशयातून पाणी सोडणाऱ्या धरणाखाली जलाशयाच्या तळाच्या काही मीटरवर मोऱ्या बांधलेल्या असतात.त्यामुळे यामोऱ्यांच्या पातळीखालील पाणीसाठा वापरता येत नाही.जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व जमिनींची बांधबंदिस्ती करणे हाजलाशयातील गाळ कमी करण्याचा उपाय आहे.

पाण्याच्या साठ्या चे मोजमाप : सिंचनाकरिता लागणाऱ्यापाण्याच्या साठ्या चे मोजमाप साठ्याची लांबी, रुंदी व खोली यांच्यासरासरी मापांवरुन करतात. पाण्याच्या वाटपाचे मोजमाप काढण्याकरितानिश्चित आकारमानाच्या वितरकामधून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मोजतात.पहिल्या आकारमानास निश्चलमापन व दुसऱ्यास प्रवाहमापन म्हणतात.

निश्चलमापनात इंग्लिश पद्घतीत (१) गॅलन, (२) दशलक्ष घ. फू.,(३) एकर इंच वा एकर फूट म्हणजे एक एकर क्षेत्रावर एक इंच किंवाएक फूट खोल पसरलेल्या पाण्याचे परिमाण हे एकक वापरतात. दशमानपद्घतीत (१) लिटर, (२) दशलक्ष घ. मी., (३) हेक्टर क्षेत्रावरपसरलेल्या पाण्याची खोली १ मिमी., १ सेंमी. किंवा १ मी. असेलत्याप्रमाणे हेक्टर मिमी., हेक्टर सेंमी. किंवा हेक्टर मी. हे एककवापरतात. प्रवाहमापनात इंग्लिश पद्घतीत (१) दर मिनिटाला गॅलन,(२) दर सेकंदाला घ. फू. म्हणजेच क्यूसेक, (३) तासाला एकर इंचकिंवा दिवसाला एकर फूट हे एकक वापरतात तर दशमान पद्घतीत(१) दर सेकंदाला लिटर, (२) दर मिनिटाला लिटर, (३) दर सेकंदालाघ. मी. ( क्यूसेक ) व (४) दरतासाला घ. मी. हे एकक वापरतात.प्रवाहमापन पद्घतीत पाण्याचा प्रवाह निमग्न निर्गमद्वार प्रवाहमापकबंधाऱ्यावरुनठराविक मापनात वाहत ठेवून त्या वाहण्याचा वेग एकासमीकरणाने काढतात. किती काळ त्या प्रमाणात प्रवाह वाहू शकेल त्यावरुन पाण्याचे एकूण परिमाण काढतात. जमिनीच्या मशागतीपासूनपीक तयार होईपर्यंत त्यास लागणाऱ्या एकूण पाण्याच्या परिमाणास त्यापिकाचे जलमान म्हणतात. तसेच पाण्याचे परिमाण पीक असलेल्याक्षेत्रावर पसरले, तर त्याची खोली जितकी इंच भरेल तितके त्या पिकाचेजलमान असे मानण्याची पद्घत सर्वसाधारणपणे रुढ आहे. एक एकरफूट पाणी किती क्षेत्रावरील पीक काढण्यास उपयोगी पडेल त्या क्षेत्राच्यापरिमाणावरुनही पिकाचे जलमान मापण्याची दुसरी रीत आहे.


कालवे : शेतीला सर्वांत जास्त पाणीपुरवठा कालव्यांपासून होतो.जलाशय निर्माण करणाऱ्या धरणापासून किंवा प्रवाहाचे पाणी अडवूनतयार केलेल्या बंधाऱ्यापासून कालवे निघतात. कोणत्या मार्गाने कालवान्यावयाचा हे ठरविताना कालव्याचाखर्च अवास्तव वाढू नये आणिसमादेश क्षेत्र जास्तीत जास्त व्हावे अशा दृष्टीने कालव्याची आखणीकेली जाते. कालव्याच्यातळाचा ढाळ जितका कमी ठेवता येईलसिंचनत्यानुसार जास्त समादेश क्षेत्र कालव्याखाली येऊ शकते परंतु ढाळजितका कमी ठेवावा त्यामानाने कालव्याचे आकारमान मोठे धरावेलागते व त्यामुळे कालव्यात जास्त गाळ भरण्याचा संभव वाढतो. जेथेकालवे नाल्यांना ओलांडून जातात तेथे कालवे सरळ नेल्यास भरावाचाखर्च वाढतो मात्र एकूण ढाळात बचत होते. वळणाने नेल्यास भरावाचाखर्च वाचतो परंतु कालव्याची लांबी काहीशी वाढते, त्यामुळे एकूणढाळवाढतो व समादेश क्षेत्र काहीसे कमी होते. हाच प्रकार कालव्याच्यामार्गात जेव्हा एखादा उंचवटा येतो तेव्हा होतो. कालवा सरळ न्यावातर खडक फोडीचा खर्च वाढतो, लांबून वळणाने न्यावा तर कालव्याचीलांबी वाढते. या सर्व गोष्टींचा विचार करुन वेगवेगळ्या पर्यायांच्याखर्चाचा व परिणामांचा अंदाज घेऊन खर्च अवास्तव वाढणार नाही वसमादेश क्षेत्रहीनिष्कारण कमी होणार नाही, अशा बेताने कालव्याचीआखणी करावी लागते.

कालव्याची रेखाटणी : कालव्याचा मार्ग निश्चित झाला म्हणजेत्याच्या वेगवेगळ्या भागांची रेखाटणी करावी लागते. कालव्याचे आकारमान असे असले पाहिजे की, भिजणाऱ्या नियोजित क्षेत्रास वेळेवरपाणी मिळावे. पाण्याची प्रवाहक्षमता ठरविली की कालव्याची रेखाटणीठरविता येते. तळाची रुंदी, पाण्याची खोली, बाजूंचा विचार, कालव्याच्याआतीलभागाचा खडबडीतपणा व तळाचा ढाळ यांवर कालव्याचीप्रवाहक्षमता अवलंबून असते. प्रवाहक्षमता ही प्रवाहाची पाणवाट वपाण्याचा सरासरी वेग यांच्या गुणाकाराइतकी असते. नळरुंदी खोलीव बाजूंचा उतार यांवरुन आकारमान काढता येते परंतु सरासरी वेगनिश्चित केलेल्या सूत्राप्रमाणे काढावा लागतो.

कालव्यातील गाळ व धूप : कालव्यांची रेखाटणी करताना कालवेवाहत्या पाण्याने धुपून जाऊ नयेत किंवा पाण्यातील गाळाने भरुन जाऊ व नयेत, ही महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यावी लागते. खडकाळ प्रदेशांमध्येहा प्रश्न बिकट नसतो परंतु नदीच्या मुखाजवळच्या किंवा नद्यांच्यागाळांमुळे तयार झालेल्या भूप्रदेशांतील कालवे रेखाटताना याबद्दल फारचकाळजीघ्यावी लागते. डोंगराळ प्रदेशांतील नद्यांच्या प्रवाहात एक तरगाळ विशेष नसतो, तर कालव्यांच्या प्रदेशात मुरमाड जमीन पुष्कळअसल्यामुळे मुरुमाचे अस्तर कालव्यांच्या बाजूंना दिले की तो धुवूनजाण्याची भीतीही कमी होते. याउलट वालुकामय प्रदेशातील नद्यांमध्येगाळाचे प्रमाण जास्त असते आणि मुरमाड जमिनीचा अभाव असल्यामुळेमुरुमाचे स्वस्तअस्तर करता येत नाही. कालव्यात पाणी वाहत असतानाप्रवाहाचा वेग व प्रवाहाची खोली यां ध्ये कालव्यातील निलंबित गाळाचे विशिष्ट प्रमाण वाहून नेण्याची शक्ती असते. कालव्याच्यापाण्यात त्या विशिष्ट प्रमाणांपेक्षा कमी गाळ असल्यास पाणी कालव्याच्यातळातून काही गाळ उचलून घेते आणि कालव्याचा तळ व बाजूहीधुपून जातात. पाण्यात अधिक गाळ असेल तर काही गाळ कालव्याच्या तळात बसून साचतो. धुपून जाण्यामुळे कालव्याच्या पाण्याचीपातळी कमी होऊ शकतेव काही समादेश क्षेत्राला पाणी न मिळण्याचीशक्यता उत्पन्न होते. गाळ भरल्यास पाणी वाहण्याची पातळी वाढते,कालवा फार प्रमाणात धुपून गेल्यास किंवा गाळाने भरल्यास कालव्याच्या सुस्थितीला धोका निर्माण होण्याचा संभव असतो, म्हणूनवालुकामय प्रदेशात गाळाने न भरणारे व धुपून न जाणारे असे कालवेअसणे महत्त्वाचे असते. नुसत्या प्रवाहक्षमतेचा विचारकेला, तर घर्षणगुणांक व तोयालिक ढाळ (कालव्यातील पाण्याच्या पृष्ठभागाचा ढाळ)माहीत असताना वेगवेगळ्या रुंदी व खोलीचे कालवे बांधता येतात. परंतुगाळाने भरुन जाऊ नये किंवा धुपू नये असा कालवा बांधावयाचाअसेल, तरकालवा ज्याआकारमानाच्या कणांनी बनलेल्या मातीतूनजातो त्या कणांना योग्य अशी रुंदी व खोली यांचे एकच प्रमाण असते,असे केनेडी या शास्त्रज्ञाने प्रयोगांनी सिद्घ केले. त्यांनी ज्याभागांमध्ये हेप्रयोग केले तेथे अनुभवाने त्यांचे पुढील सूत्र लागू पडते, असे दिसून आले.

= म ख ०.६४

यामध्ये व = गाळ व धूप टाळणारा वेग, म = ज्या भागातून कालवावाहतो त्यातील मातीच्या कणांच्या आकारमानांचा निदर्शक गुणांक, ख = पाण्याची खोली. मॅनिंग सूत्राप्रमाणे तळरुंदी व खोलीयांच्या ज्याजोड्या शक्य असतील म्हणजे जरुर ती प्रवाहक्षमता देतील,त्यांपैकी जी खोली वेगाशी वरील सूत्राने सुसंगत ठरेल तीच खोली वतिच्या जोडीची नळरुंदी कालव्याच्या रेखाटणीमध्ये अवलंबणे योग्य होय.

स्थिर जलमार्ग : गाळाने न भरणाऱ्या व धुपून न जाणाऱ्या कालव्यांनास्थिर जलमार्ग म्हणतात. स्थिर जलमार्गाच्या रेखाटणीकरिता केनेडीयांनी निश्चित केलेल्या सूत्रात तोयालिक ढाळ हा एक घटक विचारातघेतला नव्हता. म्हणून अधिक अनुभवानंतर वेगळ्या तोयालिक ढाळांनायोग्य असे तळरुंदी व खोली यांचे प्रमाण ठरवून देण्यात आले होतेआणि त्याप्रमाणे काही काळापर्यंत स्थिर जलमार्गाची रेखाटणी होतअसे. पुढे अभियंते लेसी यांनी अनेक निरीक्षणांनंतर स्थिर जलमार्गाबद्दलनवीन उपपत्ती मांडली. या उपपत्तीप्रमाणे विशिष्ट वालुकामय प्रदेशातजलमार्गाच्या बाबतीत तळरुंदी, तोयालिक खोली ( कालव्याच्या पाणवाटेला पाण्याशी स्पर्श झालेल्या लांबीने भागून येणारी ) व तोयालिकढाळ निश्चित असतात. सर्वसाधारणपणे लेसी यांच्या सूत्रांनी स्थिर जल मार्गाची आखणी करण्याची पद्घत भारतात अवलंबण्यात आली आहे.कालवे सर्वस्वी स्थिर ( गाळ न भरणारे किंवा न धुपणारे ) असतनाही. कारण ज्याप्रवाहमानाकरिता कालव्यांची रेखाटणी केली जाते,तेवढ्या च प्रवाहमानाने पाणी कालव्यात नेहमी वाहत नाही. तसेच ज्याभूभागातून कालवा वाहत असतो त्यातील मृत्तिकेच्या कणांचे आकारमानही सर्वस्वी निश्चित राहत नाही.

उपकालवे, फाटे, पाट व क्षेत्र चाऱ्या : जलाशयाच्या धरणापासूनकिंवा बंधाऱ्यापासून कालवा निघतो. परंतु समादेश क्षेत्राच्या सर्व भागांनापाणी मिळण्यासाठी समोच्च रेषांचा विचार करुन अनेक फाटे, पाट वक्षेत्र चाऱ्या असे लहान होतअसलेले दुसरे उपकालवे बांधावे लागतात.


कालव्यांवरील बांधकामे : कालव्यावर व त्याच्या शाखांवरदोन मुख्य प्रकारची बांधकामे करावी लागतात. पहिल्या प्रकारात प्रारंभनियामक, मध्य नियामक, गाळ निष्कासक, गाळवर्जक, जलमोचक, जलप्रपातव प्रवाहमापक यांच्या बांधकामाचा समावेश होतो तर दुसऱ्यातजलवाहक पूल, जलसेतू , ऊर्ध्वलंघक व बोगदे या बांधकामांचा अंतर्भावहोतो.यांचे मुख्य कार्य म्हणजे कालव्याच्या वेगवेगळ्या भागांचापूर्वनियोजित पाणीपुरवठा करणे व कालवा सुस्थितीत ठेवणे. दुसऱ्याप्रकारचे मुख्य कार्य कालव्याच्या व त्याच्या शाखांच्या मार्गात येणारेजलमार्ग व उंचवटे सुलभतेने ओलांडणे.

प्रारंभ नियामक : याचे प्रमुख कार्य कालव्याच्या गरजेप्रमाणे बंधाऱ्यातून पाणी सोडणे हे असते. याकरिता आवश्यक प्रवाहमानाच्या हिशोबाने बंधाऱ्यात पुलासारखी रचना करुन तीमध्ये योग्य त्या आकारमानाचेदरवाजे बसवितात. हे दरवाजे वर-खाली करता यावेत अशी यंत्रणाबंधाऱ्याच्या माथ्यावर बसविलेली असते. दरवाजे मुख्यतः दोन प्रकारचेअसतात. पहिल्या प्रकारात बांधकामात बसविलेल्या पोलादी खोबणींच्यामध्ये ते खाली-वर होतात. त्यांना वर-खाली करण्याकरिता दरवाजाच्यामाथ्यापासून बंधाऱ्याच्या माथ्यापर्यंत एक पोलादी दांडा नेला जातो. यादांड्याच्या वरच्याकाही लांबीमध्ये आटे पाडलेले असतात. दुसरे आटेपाडलेले चाक या दांड्यावर बसविलेले व ठोकळ्यात अडकविलेले असते. हे चाक फिरविले म्हणजे दांडा व दार खाली-वर होते. या सर्वहालचालीत घर्षण कमी व्हावे व चाक फिरविण्याला शक्ती कमी लागावीअशी रचना असते. दरवाजाचा दुसरा प्रकार अरीयद्वार हा होय. याचाआकार कंसासारखा असून कंसाची बहिर्गोल बाजू बंधाऱ्याच्या बाजूलाअसते. कंसाच्या खालच्या व वरच्या टोकांपासून त्रिज्येसारखेवर्तुळ-मध्याकडे दांडे सरकतात. वर्तुळमध्यामधील एक आडवा दांडा प्रारंभनियामकाच्या बांधकामात बसविलेला असतो. कंस या आसाभोवतीफिरविण्याकरिता त्याला पोलादी दोर जोडून ते बंधाऱ्याच्या वर रहाटाच्यासाहाय्याने ओढण्याची व खाली सोडण्याची यंत्रणा केलेली असते. प्रारंभनियामकाची आखणी अशी असावी लागते की, ज्यामुळेत्याच्यावरीलव खालीलपाण्याच्या पातळीतील फरक कमी असावा आणि त्यातूनपाणी बाहेर पडताना खळबळाट शक्य तितका कमी व्हावा. नियामकातूननिघणाऱ्या पाण्याचा वेग व कालव्यातील पाण्याचा वेग यांतील फरकामुळेकालव्याचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी दरवाजाच्या खालील व पुढीलबांधकामाची रचना विशिष्ट पद्घतीने करावी लागते. काही वेळा कालवेधरणापासूनच निघतात तेव्हा धरणातील पाण्याची पातळी व कालव्यातीलपाण्याची पातळी यांतील फरक फार मोठे असतात. त्यामुळे नियामकाचीआखणी व बांधणी नियामकाला व कालव्याला नुकसान पोहोचू नयेअशी करावी लागते. कालव्याला जसा प्रारंभ नियामक असतो, तसाचपरंतु लहान नियामक उपकालवे किंवा फाटे निघतात तेथे बांधावा लागतो.

मध्य नियामक : कालव्यापासून उपकालवे किंवा मोठे फाटे फुटताततेथे मध्य नियामक कालव्यामध्ये बांधतात. याची रचनाही सामान्यतःबंधाऱ्यात बांधलेल्या प्रारंभ नियामकासारखीच असते. याचे कार्य म्हणजेकालव्याचा मध्य नियामकाच्या खालचा भाग व त्याच्या वरच्या बाजूसनिघणारा उपकालवा किंवा फाटा यामध्ये पाण्याची इच्छित वाटणी करणेहोय. वेळप्रसंगी ( उदा., खालच्या भागात कालवा फुटल्यास ) खालीपाणी मुळीच पाठवावयाचे नसल्यास दरवाजे बंद करुन वरुन येणारेपाणी मुख्य कालव्यात साठविता येते किंवा जलमोचकाद्वारे एखाद्यानिरुपद्रवी नाल्यात सोडून देता येते.

गाळ निष्कासक व गाळवर्जक : वालुकामय प्रदेशांत काही ठिकाणीप्रारंभ नियामकाच्या वर-खाली अनुक्रमे गाळवर्जक व गाळ निष्कासकाची रचना करतात. वालुकामय प्रदेशात वाहत्या पाण्यात जो गाळअसतो त्यातील जड भाग तळालगत पाण्याबरोबर वाहत असतो. अशावेळी तळाचे पाणी सोडून कमी गाळ असलेले वरचेच पाणी कालव्यातशिरेल अशीव्यवस्था करण्यासाठी गाळवर्जकाची यंत्रणा असते. काहीठिकाणी जड गाळ कालव्यात शिरला, तरीही तो खालच्याभागात जाऊ नयेम्हणून गाळ निष्कासकाची योजना कालव्याच्या प्रारंभ नियामकापासूनथोड्या अंतरावर करतात. यामध्ये कालव्याच्या तळात एक जाळीसारखीरचना करुन जड गाळ खाली पडेल आणि तो वाहून नदीला मिळेलअशा तऱ्हेची बांधणी असते.

जलमोचक : कालव्याच्या बांधामध्ये मध्य नियामकाच्या वरच्याबाजूस याची रचना करतात. बांधकामामध्ये वर-खाली होणारा एकदरवाजा बसविलेला असतो. तो उघडला असता कालव्यातील पाणीएका जलमार्गावाटे नाल्याला मिळते. कालव्यात शिरलेले परंतुअनावश्यक पाणी अशा रीतीने काढून टाकता येते.

जलप्रपात : ह्या रचनेच्या साहाय्याने कालव्यातील पाण्याची पातळीकमी करता येते. कालव्याच्या आखणीमध्ये काही विशिष्ट ढाळकालव्याच्या तळाला देणे आवश्यक असते. जेव्हा कालव्याला द्यावयाचाढाळ भूमीच्या ढाळापेक्षा बराच कमी असेल तेव्हा कालव्याची पातळीअधूनमधून एकदम कमी करुन नेहमीच्या ढाळाने कालवा बांधतात.पाण्याचा मोठा प्रवाह अशा रीतीने एकदम कमी केल्यास जी शक्ती निर्माणहोते, ती कालव्याची नासधूस न होता विसर्जित होईल अशा तऱ्हेच्याबांधकामास जलप्रपात म्हणतात. जलप्रपात दोन प्रकारचे असतात. एकामध्ये वरुन खाली पडणारे पाणी इष्ट आकारमानाच्या व खोलीच्याकुंडात पडून नंतर कालव्यात वाहते. या कुंडातील खोलीमुळे किंवापाणउडीमुळे जास्तीची शक्ती विसर्जित होते त्यामुळे कालव्याचा पुढीलभाग सुस्थितीत राहतो. दुसऱ्या प्रकारात खाली पडणारा प्रवाह एकाघसरंडीवरुन वाहत येऊन पाणउडी घेऊन कालव्याला मिळतो.

प्रवाहमापक : कालव्यातून वाहणाऱ्या प्रवाहाचे निश्चित प्रमाणसुरुवातीस व पुढे दर काही किमी. अंतरावर करणे वाटपाच्या दृष्टीनेआवश्यक असते. बंधाऱ्यातील व कालव्यातील पाण्याची पातळीयांतील फरक व प्रारंभ नियामकाच्या उघड्या भागाचे क्षेत्र यांवरुनप्रवाहमापनाचा हिशोब करता येतो. तसेच पाणउडीच्या प्रपातांचा किंवापाणउडीच्या दुसऱ्या रचनांच्या साह्याने प्रवाहमापनाची व्यवस्था केलीजाते. जेथे अशी व्यवस्था नसते तेथे कालव्यातील पाण्याचा वेग मोजूनकालव्याच्या आकारमानाला त्याने गुणून प्रवाहमान काढता येते.

जलवाहक पूल व ऊर्ध्वलंघक : नाल्यांना कालवे जेथे ओलांडताततेथे नाल्याच्या आकारमानानुसार आणि त्यांच्या पातळ्यांतील फरकाचाविचार करुन बांधकामे करावी लागतात. जेथे कालव्याची पातळीनाल्यातील पुराच्या वर असेल आणि नाला लहान असेल, तेथे जलवाहकपुलाची योजना करतात. हा नेहमीच्या रस्त्यावरील पुलासारखाअसून पुलाच्या माथ्यावर मातीचा भराव टाकून त्यातून कालवानेतात. नाला मोठा असेल आणि नाला व कालवा यांतील पाणीपातळ्यांतील अंतर बरेच असेल, तर नेहमीसारखा पूल बांधून त्यावरुनदोन्ही बाजूंना भिंती बांधून त्यांधून कालव्याचे पाणी नेतात. यालाजलवाहिनी म्हणता येईल. 

जेथे कालव्याच्या पाण्याची पातळी नाल्याच्या पाण्याच्या पातळीच्याआसपास किंवा खाली असते तेथे कालव्यावरुन नाल्याचे पाणी जाईलअशा रीतीने बांधकाम करतात किंवा सलोह काँक्रिटचे नळ नाल्याखालीघालून त्यातून नेतात. यावेळी कालव्याचा प्रवाह दाबाखाली वाहतअसतो. या रचनेला ऊर्ध्वलंघक म्हणतात.


बोगदे : कालव्याच्या मार्गात ज्यावेळी एखादा उंचवटा येतो वत्याला वळसा घालून जाणे खर्चिक होते तेव्हा उंचवट्याला विवर पाडूनत्यातून कालवा न्यावा लागतो. हा काही वेळा कालव्यासारखा पृष्ठभागापासून खणून व नंतर पुलासारखी कमान बांधून किंवा स्लॅब( काँक्रि टची भक्कम लादी ) टाकून वर पुन्हा माती भरुन करतात. बोगद्याचाआतील पृष्ठभाग जर चांगल्या खडकाचा असेल तर त्याला अस्तरकेले नाही तरी चालते. एरवी बोगद्याच्या आतील बाजूस काँकिटचेअस्तर करणे आवश्यक असते. कालांतराने खडक आतून सुटेल किंवाखडकाच्या खडबडीतपणाने प्रवाहात होणारा अडथळा कमी व्हावाम्हणूनही खडकातील बोगद्याला काँकिटचे अस्तर करतात.

कालव्याचे अस्तर : हे बहुधा काँकिटचे, विटांचे, फरशीचे किंवाकाँकिटच्या ठोकळ्याचे असते. कधीकधी अस्फाल्टयुक्त काँक्रिटचेहीअस्तर करतात. अस्तर करण्याचा हेतू कालवा सुस्थितीत रहावा आणित्यात दुरुस्ती करावी लागू नये असा असावा लागतो. वालुकामय प्रदेशांतपाण्याचा झिरपा कमी व्हावा म्हणून कालव्यांना अस्तर लावतात. मुरमाडव खडकाळभागांत कालव्याचा झिरपा कमी करणे आणि खडबडीतपणाकमी करुन बाजूचे घर्षण कमी करणे हे दोन्ही उपयोग अस्तर केल्यानेसाधतात. घर्षण कमी झाल्यामुळे कालव्याचे आकारमान कमी ठेवतायेते व खर्च वाचतो.

कालव्याच्या प्रवाहक्षमतेचा पावसाळ्यात उपयोग :ज्यावेळीसमादेश क्षेत्राला पावसाळ्यात पाण्याची गरज नसते मात्र नदीत प्रवाहअसल्यामुळे कालव्यात पाणी घेता येते, तेव्हा हे अतिरिक्त पाणीसाठविण्याकरिता कालव्याच्या खालच्या टोकाजवळ एखाद्या नाल्यालाधरण बांधून जलाशय निर्माण करतात.

लघुसिंचन प्रकल्प : जलाशय किंवा बंधारे यांच्यापासून होणाऱ्यासिंचनक्षेत्राची व्याप्ती २० हेक्टरांपासून लक्षावधी हेक्टरांपर्यंत असूशकते. जलाशयाच्या आकारमानावर किंवा बंधाऱ्यापासून मिळणाऱ्याकायम स्वरुपाच्या प्रवाहमानावर हे क्षेत्र अवलंबून असते. सुमारे एकहजार हेक्टर क्षेत्रापर्यंत भिजविणाऱ्या सिंचन प्रकल्पाला लघुसिंचन प्रकल्पम्हणतात. ही व्याख्या केवळ व्यवहाराकरिता म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याच्या कक्षेत कोणती कामे असावीत वगैरेसारख्या कार्यवाहीच्यासोयीकरिता वापरण्यात येते. सिंचन नदीच्या किंवा नाल्याच्या प्रवाहावरचअवलंबून असते. पावसाळ्यानंतर प्रवाह कमीकमी होत जातो व कधीकधी अगदीच थांबतो, तेव्हा बंधाऱ्यावरील सिंचन पुरेशा दीर्घ काळापर्यंत प्रवाह टिकून असताततेथेच शक्य होते.

कोल्हापूर पद्घतीचे बंधारे : लघुसिंचन प्रकल्पाचा आणखी एकप्रकार म्हणजे लहान नद्यांना पावसाळ्याच्या अखेरीस पाणी अडविणारेपुलासारखे बंधारे होत. असे बंधारे कोल्हापूर जिल्ह्यात काही सहकारीसंस्थांनी व काही शासनाने बांधले आहेत. यामध्ये नदीच्या प्रवाहालाविशेष अडथळा येऊ नये म्हणून पुलाचे स्तंभासारखे दगडी स्तंभउभारतात.पावसाळ्याच्या अखेरीस या स्तंभांध्ये आडव्या फळ्या वमाती टाकून पाणी अडवितात. त्यामुळे ५– ७ मी. खोलीचा लहानसातलाव तयार होतो. हे पाणी उपसा पद्घतीने नदीच्या काठावरील पिकांनादेण्यात येते. पावसाळ्याच्या आरंभीमच्छामधील फळ्या व माती काढूननदीचा प्रवाह मोकळा करुन देण्यात येतो.

उपसा सिंचन : लहान प्रमाणावर उपसा सिंचन : विहिरी, बुडक्या( नाल्याच्या काठी बांधलेल्या ) विहिरी व लहान नाले यांपासून पाणीउपसण्याकरिता रती, डेकली, दून, मोट किंवा रहाटगाडगे वापरतात. रतीकिंवा डेकलीसाठी एक खांबविहिरीच्या काठावर रोवून, त्याच्यामाथ्यावर एक आडवा वासा आसावर बसवितात. या वाशाच्या एकाटोकाला दोरीनेमडके किंवा बादली टांगतात आणि दुसऱ्या टोकाला एकवजन बांधतात. विहिरीच्या माथ्यावर एक आडवी तुळई टाकून माणूसतिच्यावर उभा राहतो आणि दोरी बांधलेले टोक खाली दाबून धरतो वबादली किंवा मडके पाण्यात बुडते. नंतर हळूहळू ते टोक सोडून दिलेम्हणजे बादली वाशाच्या दुसऱ्या टोकाला बांधलेल्या वजनामुळे वर येतेआणि माणूस बादलीतील पाणी पाटात ओततो. अशा रीतीने पाट वाहताठेवता येतो. या प्रकारात उपसा उंची अगदी कमी असावी लागते. यामध्येवासा व बादली यांच्याऐवजी एक पन्हाळी वापरतात. पन्हाळीचे पाण्यात बुडवावयाचे टोक बंद असते ते टोक हाताने दाबून बुडविले कीपन्हाळीत पाणी भरते आणि ते टोक उचलले म्हणजे पाणी दुसऱ्याटोकाने पन्हाळीतून पाटात पडते. याला उपसा उंची रतीपेक्षाही कमीलागते. सिंचन क्षेत्र थोडे जास्त असेल, तर मोट किंवा रहाटगाडगे पाणीउपसण्याकरिता वापरतात. मोटेला बैल किंवा रेडे जुंपतात. सामान्यतःमोटेला रहाटगाडग्यापेक्षा अधिक उपसा उंची चालते.

मोठ्या प्रमाणावर उपसा सिंचन : यासाठी विहिरीवर, बुडकीवर, वाहत्या कालव्याकाठी किंवा नदीकाठी आधुनिक तऱ्हेचा पंप बसवूनपाणी उपसतात. हे पंप अगदी कमी अश्वशक्तीपासून ते मोठ्या अश्वशक्तीचे असतात. पाण्याची उपलब्धता, गरज व उपसण्याची एकंदर उंचीयांना योग्य असे अनेक मोठाल्या प्रकारचे पंप आणि ते चालविण्या करिता तेलावर चालणारी एंजिने किंवा विद्युत् चलित्रे वा जनित्रे वापरतात.

पंपाचे मुख्य प्रकार : केंद्रोत्सारक व टरबाइन पंप हे दोन मुख्य प्रकारसिंचनाकरिता वापरतात. यांशिवाय साखळी पंप, वात पंप व फोर्स पंपहेही प्रकार आहेत. साखळी पंप व वात पंपांची उपसाक्षमता अगदीचथोडी असते आणि कार्यक्षमताही कमी असते. फोर्स पंपाची उपसाक्षमताजास्त असते परंतु कार्यक्षमता कमी असते व त्यांना दुरुस्ती खर्च जास्तलागतो. या कारणांकरिता केंद्रोत्सारक व टरबाइन या दोन प्रकारचे पंपसिंचनाकरिता नेहमी वापरले जातात.

केंद्रोत्सारक पंप : याची उपसा उंची ( पाण्याच्या पातळीपासूनपंपापर्यंतचे अंतर ) ६-७ मी. पेक्षा जास्त असत नाही. पंप एकाचआसावर जोडलेल्या एंजिनाने किंवा विद्युत् चलित्राने चालविला जातो.जेव्हा पाण्याची पातळी ६-७ मी. पेक्षा अधिकात अधिक वर गेली तरते पंप व एंजिन किंवा पंप व विद्युत् चलित्र पाण्याखाली बुडून पंप बंदपडणे शक्य असते. पंप सुरक्षित ठेवण्यासाठी दोन टप्पे योजावे लागतात.पाण्याची पातळी कमीत कमी ६-७ मी. चढली म्हणजे पंप वरच्याटप्प्यावर उचलून ठेवावा लागतो.

टरबाइन पंप : जेथे नेहमीच पाण्याची पातळी ६-७ मी. पेक्षा बरीचखाली-वर होण्याचा संभव असतो व अवजड केंद्रोत्सारक पंप हलविणेसोयीचे नसते, तेथे ( विशेषतः मोठ्या नद्यांच्या काठी किंवा जलाशयाच्याकाठी बांधलेल्या विहिरींच्या बाबतीत ही परिस्थिती नेहमीच शक्यअसते ) टरबाइन पंप वापरतात. हा पंप एका उभ्या आसावर बसविलेलाअसतो. तो नेहमीच पाण्यात बुडलेला असतो. हा पाणी उपसून आसाभोवतीच्या नळातून पाणी वर चढवितो. विद्युत् चलित्र आसापासून उंचपाणी-पातळीच्या वर बसविलेले असल्यामुळे ते हलविण्याचा प्रश्नउद्‌भवत नाही. या पंपांची कार्यक्षमता चांगली असते.


उपसा योजनेचे इतर मुख्य घटक : योजनेच्या महत्त्वाप्रमाणे वपरिस्थितीनुसार पंप व एंजिन किंवा विद्युत् चलित्र यांशिवाय खालीलमुख्य घटकांचीही जरुरी असते.

उपादान कुंडी : नदीच्या तळाशी नेहमी पाणी असणाऱ्या जागी हीबंद कुंडी बांधतात. हिचा उद्देश गाळाशिवाय पाणी पंपाला मिळावेअसा असतो.

उपादान कूप : उपादान कुंडीपासून नदीकाठावर बांधलेल्या उपादानकूपामध्ये पाणी नेले जाते. या उपादान कूपामध्ये पंप बसविलेला असतो.या उपादान कूपाच्या माथ्याला एक खोली बांधलेली असते. तेथे पंप वविद्युत् चलित्र असते, याला पंपघर म्हणतात. पंपापासून इच्छित जागीपाणी नेण्याकरिता एक मोठा नळ बसविलेला असतो, त्याला उद्‌वाहकनळ म्हणतात. हा नळ शेवटी एका टाकीत पाणी सोडतो, तिला वितरणकुंडी म्हणतात. या वितरण कुंडीतून बहुधा उघड्या पाटाने पाणीवेगळ्या शेतांपर्यंत नेले जाते. काही ठिकाणी झिरपून पाणी वाया जाऊनये म्हणून पाटांच्याऐवजी नळातून पाणी नेतात.

उपसा सिंचनाचा मुख्य उपयोग : नगदी पिकांकरिता उपसा सिंचनाचाखर्च मोठा असल्यामुळे, सामान्यतः हंगामी अन्नधान्य पिकांकरिता त्याचानियमित वापर क्वचितच केला जातो. बारमाही व नगदी पिकांकरिताउपसा सिंचनाचा अवलंब करणे परवडते. म्हणून उपसा सिंचनाच्याशक्यता जेथे आहेत तेथे सिंचन योजना कार्यवाहीत आणण्याचीशेतकऱ्यांची धडपड असते. अवर्षणाच्या वेळी अशा योजनांचाअन्नधान्याच्या पिकांसाठीही उपयोग केला जातो.

भूमिजलाचा उपयोग : विहिरींपासून सिंचन : एका विहिरीचाउपयोग अगदी लहान क्षेत्राला होत असला, तरी विहिरींपासून सिंचनहोणारे एकूण क्षेत्र फार मोठे आहे. ज्याभागांमध्ये मोठ्या किंवालहान प्रवाहसिंचन योजना शक्य नसतात, तेथे असलेल्या विहिरींमुळेबागायती शेती शक्य होते.

भूमिजलाची उपलब्धता : सिंचनाला विहिरी उपयुक्त व्हाव्यातयाकरिता भूपृष्ठाखाली पुरेसे पाणी उपलब्ध असले पाहिजे. शेतीकरिताउपयुक्त व्हावे म्हणून भूजल भूपृष्ठापासून फार खोल नसावे शिवाय भूपृष्ठस्तरांची रचना अशी असावी की, उपलब्ध पाणी विहिरीतून काढणे शक्यव्हावे. भूपृष्ठावर लहान-मोठ्या कणांचे वाळू, गोटे असे थर असल्यामुळे, अशा थरांची जाडीही पुष्कळच जास्त असल्याने भूपृष्ठाखालीपाण्याचा एक मोठा जलाशयच असतो. त्यामुळे अशा भागातीलविहिरींपासून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा होऊ शकतो. ज्याप्रदेशांतप्रवाहसिंचनाच्या सोयी विस्तृत प्रमाणात असतात तेथे भूमिजलाचीपातळी वाढवायला मदत होते, म्हणून तेथे मोठ्या प्रमाणावर विहिरींवरीलसिंचन शक्य होते. ज्या भूपृष्ठाखाली खडकाचेच थर मोठ्याप्रमाणात असतात आणि खडकांतील थरांमधील मुरुम किंवा गेरुअशा सच्छिद्र थरांमध्ये पाणी राहण्यासाठी थोडी जागा असते तेथेएकंदरीत सिंचनोपयोगी भूमिजल कमी असते.

उघड्या विहिरी : उघड्या  विहिरी पृष्ठभागापासून खणत पाण्याच्यापातळीपर्यंत प्रथम नेतात. नंतर पाणी उपसण्याची तात्पुरती सोय करुनपाण्याच्या पातळीखाली जरुर तितक्या खोलीपर्यंत खणत नेतात.उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळेल इतकी खोल विहीर खणून झालीम्हणजे आवश्यक तितक्या खोलीपासून वर पृष्ठभागापर्यंत दगड किंवाविटांनी बांधून काढतात. असे बांधकाम पुरेशा भक्कम पायापासून सुरुकरतात. वालुकामय भागांत उघडी विहीर पाण्याच्या खाली खणणे अवघडअसते, कारण पाणी उपसा सुरु केल्याबरोबर बाजू आधी ढासळतनसल्या, तरी नंतर ढासळावयास सुरुवात होते. खोदाईच्या बाजू ढासळतीलअसे वाटल्याबरोबर तळांत काँकीट किंवा लोखंड यांचे एक मोठे कडेटाकतात आणि त्यावर विहिरीचे बांधकाम लगेच सुरु करतात. नंतरतळातील वाळू किंवा माती खणणे सुरु करतात. कड्याखालील वाळूव माती सगळीकडून सारखी काढली म्हणजे कडे खाली बसत जातेआणि त्याच वेळी माथ्याचे बांधकाम वर वाढविले जाते. अशारीतीने कडे पुरेशा खोलीपर्यंत नेतात आणि त्याच वेळी विहिरीचेबांधकामही पूर्ण करतात.

नलिका कूप : नलिका कूप तयार करण्यासाठी जमिनीत भूजलपातळीपर्यंत खोल भोक घेण्यात येते व त्यामध्ये नळ सोडण्यात येतो. जरभोक सबंध खोलीपर्यंत चांगल्या खडकात असेल, तर तळापर्यंत नळन बसविता फक्त पृष्ठभागापाशीच नळ बसवून त्यातून पंप भोकाच्यातळापर्यंत खोल सोडला तरी चालतो. फक्त गृहोपयोगाला पुरेल एवढेचपाणी अशा नलिका कूपांत बहुधा मिळते. मात्र नदीच्या किंवा तत्समवालुकामय प्रदेशांतील नलिका कूपांतून पुष्कळ पाणी मिळू शकते.नलिका कूप सामान्यतः ४५ – ५० सेंमी. व्यासाचे भोक जमिनीत घेऊनआणि त्यामध्ये २५ – ३० सेंमी. व्यासाचे नळ सोडून त्या नळात बसविलेलेपंप ६० – १०० मी. खोल असतात. नळ बसविताना जमिनीखालीलथरांपैकी जे सच्छिद्र थर असतील त्यांच्यामध्ये सच्छिद्र नळ आणिअच्छिद्र थर असतील त्यांध्ये अच्छिद्र नळ एकमेकांना जोडून बसवितात. भोक घेताना प्रत्येक मीटर थर कोणत्या तृहेचा आहे याची नोंद केलीजाते आणि अशा नोंदीचा कूपाचे नळ जोडताना उपयोग केला जातो. अशाप्रदेशांत भोके घेण्याकरिता प्रथम जेवढे भोक घ्यावयाचे असेल तेवढा नळउभा करुन त्यातून तळाची माती व वाळू काढून घेतात म्हणजे नळ जमिनीतखोल घुसत जातो. भोक पुरेसे खोल झाले म्हणजे नलिका कूपाचा सच्छिद्रव अच्छिद्र तुकडे जोडलेला नळ मोठ्या नळातून खाली सोडण्यात येतोआणि बाहेरचा नळ वर ओढून घेण्यात येतो. त्याच वेळी नलिका कूप वबाहेरची मोकळी जागा यांध्ये वाळू भरण्यात येते. बाहेरचा मोठा नळकाढून घेण्यात आला म्हणजे नलिका कूपात पंप बसवितात.

पाझर तलाव : विहिरीतून मिळणाऱ्या पाण्याची पातळी वाढविण्यासपाझर तलावांचा उपयोग होतो. पाझर तलाव म्हणजे ज्यालाकालवा नाहीअसा लहानसा तलाव. पाणी धरणाच्या भिंतीखालून व तलावाच्याकाठाखालील सच्छिद्र थरातून झिरपून खालच्या नाल्याकडे वाहत जाते.सिंचनाच्या तलाव किंवा धरणाखालून पाणी झिरपू नये म्हणून खबरदारीघेण्यात येते. ती पाझर तलावाच्या बाबतीत घेतली जात नाही. धरणालाखालून पाझरणाऱ्या पाण्याने धोका पोहोचणार नाही अशी खबरदारीघेतली जाते. झिरपण्याच्या प्रमाणाच्या अनिश्चितीमुळे पाझर तलावाचाउपयोग सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही. काही तलावांचा अपेक्षेपेक्षाजास्त व काहींचा कमी उपयोग होतो. पाझर तलाव बांधण्यासाठी पुढीलनिष्कर्ष काढण्यात आले आहेत : (१) पाझर तलाव अशा खोऱ्यातबांधावेत की, त्यात आधीच काही विहिरी उपयोगात आहेत व ज्यांपासूनचांगले पाणी मिळू शकते. (२) पाझर तलाव ४०– ५० सेंमी. पर्जन्यमानाच्या क्षेत्रात उपयोगी होतात.(३) पाझर तलावाचा फायदात्याखालच्या ५-६ किमी. लांबीच्या नाल्याच्या काठी दोन्ही बाजूंस ५–१०किमी. अंतरापर्यंत होतो.


कालव्याच्या पाण्यामुळे जमीन पाणथळ व खारवटबनणे : ज्याभागांत नेहमी पावसावर शेती पिकत असते, त्या भागांतप्रवाही सिंचनाला सुरुवात झाली म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर पूर्वीपेक्षापुष्कळच अधिक पाणी ओतले जाते, ते सर्व पिकांच्या वाढीला जरुरचअसते असे नाही. कमीत कमी पाणी दिले, तरीसुद्घा काही पाणी जमिनीतमुरते. काही पाणीवाटप व्यवस्थेच्या दोषामुळे जमिनीवर पसरते आणि काहीकालव्यामधून व त्याच्या उपशाखांमधून जमिनीत मुरते. या सर्वांचापरिणाम असा होतो की, भूमिजलाची पातळी उंचावू लागते. जेथे ती मूळचीखूप खोल असते तेथे लवकर परिणाम दिसून येत नाहीत परंतु आधीचजेथे ती पृष्ठभागाच्या जवळ असते, तेथे या पातळीच्या वाढीचे दुष्परिणाम अनुभवास येऊलागतात. जेथे पृष्ठभागाखालील थर खोलपर्यंत पुरेसेसच्छिद्र असतील, जमिनीला पुरेसा उतार असेल तेथे त्या सच्छिद्र थरातूनजास्तीचे पाणी वाहून जाऊन नाल्याला किंवा नदीला जाऊन मिळते परंतु तेथर जर सच्छिद्र नसतील, जमिनीला ढाळ अपुरा असेल, नाल्यांत अडथळेअसतील, तर भूमिजलाची पातळी इतकी वर येते की, जमीन पाणथळ होते.

जमिनीच्या खालच्या थरात जर क्षार असतील, तर ते पाण्यातविरघळतात आणि पृष्ठभागातील आर्द्रतेचे बाष्पीभवन होते तेव्हाकाही ठिकाणी क्षारांचा थर पृष्ठभागावर दिसू लागतो. या दोन्ही प्रकारांनीजमिनीची उत्पादनक्षमता कमी होते व काही वेळा जमीन सर्वस्वी नापीकहोते. विशेषतः सोडियमाचे क्षार जमिनीच्या पोताला अपायकारकअसतात. कालवे सुरु होण्याच्या वेळी समादेश क्षेत्रात जे नाले पावसाळ्याशिवाय कोरडे असतात ते हळूहळू बारमाही वाहू लागतात, त्यांमध्येपाणकणीस व लव्हाळा यांसारख्या वनस्पतींची वाढ होऊ लागते. नंतरच्यापावसाळ्यात या वनस्पतींमुळे गाळ साचतो व वर्षानुवर्षे हा कम चाललाम्हणजे १५–२० वर्षांत मूळचे ४-५ मी. खोल असलेले नाले गाळानेकाठापर्यंत भरुन जातात.त्यामुळे बाजूच्या जमिनीच्या निचऱ्याला आणखीचअडथळा येतो.

उपळा व खारवटपणा यांवर उपाय : प्रथमतः कालवे व फाटे यांतूनपाण्याचा झिरपा कमी होईल अशी अस्तरे लावली, तर जमिनीत पाणीमुरण्याचे प्रमाण काहीसे कमी होते. विशेषतः कालवे जेव्हा मुरमाडप्रदेशात खोदून न्यावे लागतात, तेव्हाअशा अस्तराचे महत्त्व विशेषआहे. समादेश क्षेत्राच्या वेगवेगळ्या भागात बारमाही पिके मंजूर करतानात्या त्या भागाचीनिचराशक्ती विचारात घेऊन ऊस, केळी यांसारखीपिके मंजूर करणे हा दुसरा मार्ग होय. तिसरा मार्ग म्हणजे समादेशक्षेत्रातील लहान-मोठे नाले जरुर तर खोल खणून त्यांतून निचृयाचेपाणी अडथळ्याशिवाय नदीला पोहोचेल अशी व्यवस्था करणे हा होय.

खारवट जमिनीची सुधारणा : चर काढून भूमिजलाची पातळी जरउतरवली, तरी खारवट जमिनी लगेच सुधारत नाहीत. त्या सुधारण्याकरितापृष्ठभागातील क्षारांचे प्रमाण ते खरडून काढून टाकून व वर पाणी देऊनक्षार कमी झाल्यानंतर, आमखते वापरुन धैंचासारखी पिके घेऊनजमिनीचा पोत हळूहळू सुधारु शकतो. नंतरच खारवट जमिनी काहीकाळाने पूर्वीसारख्या सुपीक करता येतात.

सिंचन प्रकल्पाचे फायदे : सिंचनाच्या सोयीमुळे कोरडवाहूजमिनींना बागायत शेतीचे स्वरुप प्राप्त होते. सिंचनामुळे भूमिजलाचीपातळी वाढते, विहिरींवरील सिंचनही वाढते, वेगवेगळ्या कसबीलोकांना काम मिळते आणि व्यापार व उद्योगधंदेही वाढतात. सिंचनाच्यासोयीबद्दल सरकार फक्त पाणीपट्टीद्वारा उत्पन्न मिळविते असे नाही, तरअप्रत्यक्षपणे जकात, प्राप्तिकर, विकीकर, रेल्वेवाहतूक भाडे वगैरेंपासूनहीसरकारला उत्पन्न मिळते.

संरक्षक व लाभदायक कामे : सिंचन कामाचे त्यापासून मिळणाऱ्याप्रत्यक्ष उत्पन्नाच्या दृष्टीने संरक्षक व लाभदायक असे दोन वर्ग कल्पिलेजातात. संरक्षक कामांकडून सरकार प्रत्यक्ष आर्थिक लाभाची अपेक्षाकरीत नसते. केवळ दुष्काळी भागातील लोकांना अवर्षणापासून काहीप्रमाणात संरक्षण देणे एवढाच उद्देश समोर ठेवून अशा तऱ्हेची कामेमंजूर होत असतात. लाभदायक वर्गातील प्रकल्पांपासून मात्र कामे पूर्णझाल्यानंतर तुटीसह भांडवली खर्चावरील व्याजाइतके दरवर्षी निव्वळउत्पन्न मिळावे अशी अपेक्षा असते.

लाभदायित्वाची कसोटी : सिंचन कामावरील बांधणीचा झालेलाखर्च व त्यावरील व्याज मिळून दरवर्षी अखेरीस झालेला तुटीसहभांडवली खर्चाचा आकडा काढतात. त्या कामापासून मिळालेले निव्वळउत्पन्न (पाणीपट्टीमधून देखभाल वदुरुस्तीकरिता झालेला खर्च वजाजाता उरलेली रक्कम ) जर व्याजापेक्षा कमी असेल, तर असे व्याज उणेनिव्वळ उत्पन्न एवढी रक्कम तुटीसह भांडवली खर्चाच्या रकमेत मिळवूनझालेल्या तुटीसह भांडवली खर्चाचा आकडा काढतात. सिंचनक्षेत्राचीपुरेशी वाढ झाली म्हणजे निव्वळ उत्पन्न व्याजाइतके किंवा जास्त होऊलागावे अशी अपेक्षा असते.

लाभव्यय प्रमाण : अर्थशास्त्रज्ञांच्या मते लाभव्यय प्रमाण ही कसोटीअधिक शास्त्रशुद्घ आहे. सिंचनामुळे जमिनीचा अधिक चांगला वापर करतायेऊन उत्पादनात वाढ होते. सिंचन केलेल्या जमिनीतील उत्पादनाची अंदाजेकिंमत आणि तीचजमीन सिंचन केले नसताना तिच्यामधून निघणाऱ्याउत्पादनाची अंदाजे किंमत या दोन्हींतील फरक सिंचनामुळे किती वाढझाली ते दाखवितो. सिंचन झालेल्या जमिनीत उत्पादन मिळविण्यास जोअधिक खर्च लागला तो या अधिक उत्पादनातून वजा केला म्हणजेसिंचनामुळे झालेला नफा काढता येतो. अशा प्रकारे होणारा वार्षिक नक्तलाभ व सिंचनकामावरील वार्षिक खर्च ( भांडवलावरील व्याज, देख भालीचा व दुरुस्तीचा खर्च ) यांचे प्रमाण यास लाभव्यय प्रमाण ही संज्ञादेण्यात आली आहे. जेव्हा हे प्रमाण १:१ हून अधिक असेल, म्हणजे लाभव्ययापेक्षा जास्त असेल तेव्हा अशा तऱ्हेच्या सिंचन प्रकल्पावर खर्चकरणे सार्वजनिक हिताचे आहे, असे समजण्यास हरकत नसते. दोनकिंवा अधिक योजनांचाविचार करताना अगक्र म ठरविण्यासाठीही यालाभव्यय प्रमाणाचा उपयोग करता येतो.

सोमण, ना. श्री.


महाराष्ट्रातील सिंचन : महाराष्ट्रातील जवळजवळ ८०–८५ टक्केशेती मोसमी पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. एकूण क्षेत्रापैकीकेवळ १६.४ टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात जलसिंचनाचेप्रामुख्याने कालवे, तलाव, पाझर तलाव-विहिरी, उपसा सिंचन, तुषारसिंचन, ठिबक सिंचन, नलिका कूप असे प्रकार पडतात. सिंचनात महाराष्ट्रअग्रेसर राज्यअसून संपूर्ण भारताच्या सु. ६० टक्के ठिबक सिंचनपध्दती एकट्या महाराष्ट्रात वापरली जाते.

जागतिक बँकेने केलेल्या अर्थसाहाय्यामुळे महाराष्ट्र जलक्षेत्र सुधारप्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या २३६ सिंचन प्रकल्पांचे कालवे व वितरणप्रणालींच्या पुनर्स्थापनेची कामे तसेच २८६ प्रकल्पांच्या धरणांची सुरक्षाउपाययोजनांची कामे महाराष्ट्र शासनाने हाती घेतली आहेत. त्यांपैकी२०१२ पर्यंत १३६ प्रकल्पांची कालवा पुन:स्थापना कामे व १५९प्रकल्पांची धरण सुरक्षा कामे पूर्ण झालेली आहेत. २३६ प्रकल्पांवरएकूण १,५११ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून, ५५६ पाणीवापरसंस्थांना सिंचन प्रणाली हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रराज्याला६९ मोठे-मध्यम प्रकल्प, प्रकल्प घटक १८६ लघू प्रकल्पघोषित करण्यात आलेले असून त्यांपैकी २०१२ पर्यंत ३५ मोठे-मध्यमप्रकल्प, प्रकल्प घटक आणि सु. १,००० लघू पाटबंधारे प्रकल्पांचीकामे पूर्ण करण्यात आली असून, ५ लाख ९३ हजार हेक्टर सिंचनक्षमता या कार्यकमांतर्गत निर्माण झाली आहे.

राज्यातीलशेतीचे क्षेत्र, जनतेची कृषीवरील निर्भरता आणि कृषी-मालावर आधारीत उद्योग यांचे महाराष्ट्रात प्रामुख्याने कृष्णा, भीमा, तापी,गोदावरी, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात लहान-मोठ्या सिंचनयोजना कार्यान्वित आहेत. पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करुन राज्यातील तील अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे.याबाबतचा प्रादेशिक समतोल साधणेही अत्यावश्यक आहे.

राज्याच्यास्थापनेनंतर सिंचन धोरण व कार्यपद्घती ठरविण्यासाठीआवश्यकतेनुसार समित्या व आयोग यांची नेणूक करण्यात आली.त्यातील काही प्रमुख आयोग आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण शिफारशींचातपशील पुढीलप्रमाणे आहे :

(१) महाराष्ट्र राज्य सिंचन आयोग – १९६२ :राज्यातीलसिंचन-विषयक प्रश्न व जलसंपत्ती विकासासंबंधीत बाबींची चौकशी करण्यासाठी स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ७ डिसेंबर, १९६० रोजीमहाराष्ट्र राज्यसिंचन आयोगाची स्थापना झाली. १९६२ मध्ये याआयोगाने आपला अहवाल सादर केला.

निवडक शिफारशी : (१) ज्यापदेशात प्रवाही सिंचन पद्घतीराबविणे अशक्य आहे तेथे विहिरींसारखी सिंचन साधने योजावी.(२) अधिक पाणी आवश्यक असणाऱ्या उद्योगांना पुरेसे पाणी आहेतेथेच केंद्रीभूत करावे. (३) सिंचनाचा विकास कालावधी हा बांधकाम सुरु झाल्यापासून ८ वर्षे किंवा सिंचनास सुरुवात झाल्यावर ५ वर्षेइतका असावा. (४) कालवे व चाऱ्या ज्याभागातून जातील, त्याभागातील गामीण जनतेच्या घरगुती पाणी पुरवठयच्या बाबी विचारातघेतल्या जाव्यात. (५) प्रकल्पातील निर्वासित लोकांचे प्रत्यक्ष पुनर्वसनकरण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. (६) दर १०–१५ वर्षांनीसिंचन धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी खास चौकशी आयोगाचीनेणूक करावी.

(२) अवर्षणप्रवण क्षेत्राची सत्यशोधन समिती (सुकथनकरसमिती )-१९७३ :१९७२–७४ मधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही समिती स्थापन करण्यात आली. यांमध्ये भूजल व पिण्याचे पाणीयांवर स्वतंत्र प्रकरणांचा समावेश करण्यात आला. 

निवडक शिफारशी : (१) राज्यातील८३ तालुके अवर्षणप्रवणक्षेत्रात अंतर्भूत करावेत. (२) अवर्षणप्रवण क्षेत्रात मृदा व जलसंधारणाची कामे एकात्मिक पध्दतीने पाणलोट क्षेत्र आधारावर करण्यातयावीत. (३) पाणलोट क्षेत्र विकास कार्यकमांतर्गत मृदा व जलसंधारणासाठी लोकशिक्षणाला महत्त्व द्यावे. (४) लघू पाटबंधारे क्षेत्रात वनीकरणकार्यक्रमही राबविण्यात यावेत. (५) ठिबक सिंचनास उत्तेजन द्यावे.(६) सिंचन प्रकल्प लाभक्षेत्रात भूसुधारणेची कामे करावीत. लाभक्षेत्रातील सर्व जमिनीवर कर आकारण्यात यावा. (७) जलसंपत्तीचीउपलब्धता व तिचा वापर यांचा हिशोब ठेवण्यासाठी एक कायमस्वरुपीसंघटना स्थापन करावी.

महाराष्ट्रातील / अवर्षणप्रवण क्षेत्राच्या पाणीविषयक गरजांचीछाननी या अहवालात झाली.

(३) आठमाही पाणी वापर समिती – १९७९ :देऊस्कर, देशमुख,दांडेकर समिती – ६ जुलै, १९७८ ते १४ फेबुवारी, १९७९.

निवडक शिफारशी : (१) उपलब्ध पाणी साठ्यां पैकी पाणीखरीप पिकांसाठी तर पाणी रब्बी व उन्हाळी पिकांसाठी द्यावे. (२) प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे सर्व लाभक्षेत्रामध्ये मशागतीयोग्यक्षेत्राच्या प्रमाणात वाटप करावे. (३) लाभक्षेत्रातीलशेतकऱ्यांना द्यावयाच्या पाण्याचे प्रमाण निश्चित करुन शेतकृयांना पीक स्वातंत्र्य द्यावे.

(४) सिंचन व्यवस्थापनाबाबत उच्चधिकारी समिती-१९८१ :अध्यक्ष – सुरेश जैन.

निवडक शिफारशी : (१) जलसंपत्तीच्या कार्यक्षम वापरासाठी राज्यस्तरावर स्वायत्त महामंडळाची रचना असावी. सिंचन हजार हेक्टरपेक्षाअधिक असणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र व स्वायत्त प्रकल्पस्तरीय प्राधिकरण निर्माण करावे. (२) सिंचन विकास महामंडळ आणि प्रकल्प प्राधिकरण यांच्याकडून देखभाल व दुरुस्ती याबाबतचा खर्च व्हावा. (३)मर्यादित जमीन धारणा कायदा लाभक्षेत्रात तातडीने लागू करावी. (४) विदर्भात रब्बी पाणी वापर वाढविण्यासाठी वाफे सिंचन पद्घतीचावापर सुरु करावा. (५) घनमापन पद्घतीने पाण्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेगळा पाणी दराचा विचार व्हावा. (६)शासनाच्या उपसा सिंचनयोजनेतील २५ टक्के खर्च लाभधारकांनी उचलावा.(७) पाणीपट्टी वसुलीसाठी अधिक कडक धोरण शासनाने ठरवावे.सिंचन वसुलीसाठी संबंधित विभागातील रोखपाल पदांची निर्मिती करावी.

(५) प्रादेशिक अनुशेष विषयक दांडेकर समिती – १९८४ : निवडकशिफारशी : (१) राज्याच्यासर्वच प्रदेशातील सिंचनाबाबतची अनुशेषमोजणी तालुका पातळीवर करणे आवश्यक करावी. (२) वेगवेगळ्यापिकांखाली असलेल्या सिंचन क्षेत्राची मोजणी समान निर्देशांक पद्घतीनेव्हावी म्हणून समतुल्य क्षेत्र संकल्पना स्वीकारावी.

(६) महाराष्ट्र जलसिंचन आयोगाने (१९९९) राज्यातीलनदीखोऱ्यांतीलपाण्याची उपलब्धता, लागवड, भूजलाची वाढ, पाणलोट क्षेत्र विकासाद्वारेभूजलात पडणारी भर, आधुनिक सिंचन तंत्रांचा वापर व पाणी देण्याच्यापद्घतीतील सुधारणा या बाबीविचारात घेऊन राज्यातीलसिंचनक्षमताकमाल १ टक्क्यापर्यंत वाढविता येईल असे अनुमान काढले आहे.

नद्याजोड प्रकल्प : १९९९ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने देशातील पाण्याच्या समस्यासंपुष्टात आणण्यासाठी नद्या एकमेकांना जोडून पाणी पुरविण्याचे जाळेनिर्माण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. ती म्हणजेच‘नद्याजोड प्रकल्प ’ होय.

पाण्याचे दुर्भिक्ष्यआणि मान्सून पावसाचे प्रमाण या दोन्हींचा ताळमेळ घालणे हेच नद्याजोडप्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. धरणे बांधून पाणी साठवण क्षमता वाढविणेआणि कालव्यामधूनहोणाऱ्या पाणी पुरवठयचे कालव्याचा फाटा दुसऱ्यानदीच्या प्रवाहास जोडणे आणि त्या नदीतील धरणातील पाणीसाठावाढवून ते पाणी त्याखालील क्षेत्राला वापरणे अशा प्रकारच्या नियोजना मुळे कायमस्वरुपी पाण्याचे दुर्भिक्ष्य संपविता येऊ शकेल. याचा पर्यावरणावर कुठलाही प्रकारचा वाईट परिणाम होणार नसून ते कमी खर्चाचेकाम आहे.

अलीकडील हवामान बदलाच्या काळात नद्याजोड प्रकल्प अत्यंतउपयुक्त ठरणारा असून पाऊसमानातील विविधता आणि त्यामुळे वनस्पती,प्राणी व पिकांमध्ये निर्माण होणारी विविधता, अधूनमधून पडणारे दुष्काळ,त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या तसेचकोरडवाहू शेतीत संरक्षित पाण्यामुळे वाढणारीउत्पादकता आणि उत्पादनवाढ लक्षात घेताभविष्यकाळातील अन्नसुरक्षेची व पिण्याच्यापाण्याची गरज भागविण्यासाठी नद्याजोड 

 प्रकल्प हा अत्यंतमहत्त्वपूर्ण ठरु शकतो.


पाणी वाटपाचा वाद व सहकार्य :प्रवाहाच्या काठावरील जमिनींच्या मालकांचेप्रवाहावर काही हक्क असतात. सामान्य वापराकरिता ते निरपवाद आहेत. घरगुतीउपयोगाकरिता किंवा जनावरांच्या उपयोगा करिता पाणी वापरणे ( जरी त्यामुळे इतरांनापाणी कमी पडणार असले तरी ) यांचा सामान्यवापरात समावेश होतो. याशिवाय एखादीपाणचक्की चालविण्यासाठी किंवा शेतीला पाणी देण्यासाठीही तीरस्थजमीन मालकाला अधिकार आहे, असे समजण्यात येते परंतु तो सर्वस्वीनिरपवाद नाही. त्याच्या पाणी वापराने इतर तीरस्थांना पाणीपुरवठाम्हणण्यासारखा कमी होता कामा नये.

तीरस्थाधिकाराला मर्यादा : तीरस्थाधिकार काही वेळा वहिवाटीने,न्यायालयाच्या निर्णयाने किंवा शासनाने केलेल्या कायद्याने मर्यादितहोतात. उदा., महाराष्ट्रात पचलित असलेल्या सिंचनविषयक कायद्यानेविशिष्ट कलमाखाली जाहीरनामा काढून प्रवाहांच्या पाण्याचा शेतीकरिताहोणाऱ्या वापरावर बंदी घालता येते.

एकाच राष्ट्रातील पाण्याच्या वाटपाचे वाद : एकाच राष्ट्रातील दोनप्रदेशांतून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबद्दल वाद उद्‌भवू शकतो. वरच्याप्रदेशात आधीच धरणे बांधून वाजवीपेक्षा जास्त पाणी अडविले, तरखालच्या प्रदेशांच्या विकासाला अडथळा येऊ शकतो. खालच्या प्रदेशांनीआधीच मोठा खर्च करुन मोठे जलाशय निर्माण केले व पुढे वरचे प्रदेशनवे जलाशय निर्माण करु इच्छित असतील, तर ते त्यांना हरकत घेतात.

दोन सार्वभौम राष्ट्रांमधील पाण्याच्या वाटपाचे वाद : जेव्हा नद्यादोन राष्ट्रांमधून वाहतात तेव्हा असे वाद निर्माण होतात. काही वेळा तेबळाच्या जोरावर सोडविण्याचा प्रयत्न होतो, तर काही वेळा ते तडजोडीनेसोडविले जातात. भारत आणिपाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू व तिच्याउपनद्या यांच्या प्रवाहाच्या वाटणीचा वाद निर्माण झाला तेव्हा जागतिकबँकेच्या मध्यस्थीने वाटाघाटी झाल्या. अखेरीस १९६० मध्ये उभयराष्ट्रांमध्ये पाणी वाटपाबद्दल तह झाला.

मायदेव, अ. गो.

भारताचे पाणी वाटपासंबंधीचे वाद : आंतरराष्ट्रीय वाद :नदी जर एकापेक्षा अधिक देशांत वाहत असेल, तर तिच्या पाण्याच्याहक्कावरुन व वाटपावरुन देशादेशांत तंटे व तणावगस्त परिस्थितीनिर्माण होते. पाणी वाटपाचा वाद अनेक शतके अनेक देशांत विविधनद्यांवरुन सुरु आहे. जॉर्डन व ईजिप्तचे जॉर्डन आणि नाईल नदीवरुनअसलेले भांडण इतिहासप्रसिद्घ आहे. अशी भांडणे होऊ नयेत म्हणूनआंतरराष्ट्रीय लवाद नेले जाऊन त्यांद्वारे पाणी वाटपासंबंधी तह वकरार होतात. नद्यांच्या खोऱ्यां मध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रदेशांचा आर्थिकविकास घडवून आणणे, पाणीपुरवठा, जलविद्युत्प्रकल्प, जलसिंचनयोजना, पूरनियंत्रण, मासेमारी विकास, जलपर्यटन इ. हेतू आंतरराष्ट्रीयतहांमुळे साध्य होतात. भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय पाणी वाटपासंबंधी वाद व करार पुढील कोष्टकात दिलेले आहेत :

कोष्टक क्र. १ : भारताचे आंतरराष्ट्रीय पाणी वाटपासंबंधीचे वाद

नदी 

देश 

करार दिनांक 

चर्चेचे मुद्दे 

महाकाली 

भारत-नेपाळ 

फेब्रुवारी, १९९६ 

पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प (भारतातील सारडा प्रकल्प), सप्तकोसी बहुउद्देशीय प्रकल्प, सूर्यकोसी पाणी साठवण प्रकल्प तसेच नदी वळविणे योजना. 

गंगा 

भारत-बांगलादेश 

१२ डिसेंबर, १९९६ 

गंगा, फेनी, तिस्ता पाणी वाटप, फराक्का प्रकल्प तसेच पुरासंबंधी माहिती पुरविणे. 

ब्रह्मपुत्रा 

भारत-चीन 

५ जून, २००८ 

नदीतील पाण्याची पातळी, पर्जन्यमान इत्यादीसंबंधी माहितीची देवाण-घेवाण. 

सिंधु 

भारत-पाकिस्तान 

१९६० 

बागलिहार जलविद्युत् प्रकल्प, किशनगंगा जलविद्युत् प्रकल्प. 

 राष्ट्रीयवाद : आंतरराष्ट्रीय वादांप्रमाणेच एकाच राष्ट्रातील दोन वा अधिकराज्यांतूनवाहणाऱ्या नदीच्या पाण्यासंबंधीचे वाद व तंटे उपस्थित होतात. अशी परिस्थिती उद्‌भवल्यास आंतरराज्यीयनदी पाणी वाटप कलम१९५६ (Inner State River Water Dispute Act) या कायद्याच्याअधिनियम ३ नुसार केंद्र सरकार पाणी वाटप वादासंदर्भात नदीखोऱ्याच्याएका राज्याकडूनविनंती अर्ज स्वीकारते. भारतातील आंतरराज्यीय पाणी वाटपासंबंधीचे प्रमुख वाद खालील कोष्टकात दिलेले आहेत.

कोष्टक क्र. २ : भारताचे आंतरराज्यीय पाणी वाटपासंबंधीचे वाद 

नदी 

राज्ये 

लवाद स्थापना 

निवाडा

कृष्णा 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,

कर्नाटक. 

एप्रिल, १९६९ 

मे, १९७६ 

गोदावरी 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा. 

एप्रिल, १९६९

जुलै, १९८०

नर्मदा 

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र. 

ऑगस्ट, १९६९ 

डिसेंबर, १९७९ 

पाणी वाटपासंबंधीचे वाद सामोपचाराने सोडविल्याने राज्यांतील पारस्परिक सहकार्य, समझोता व सामंजस्य घडून येण्यास मदत होते. पाणीवाटपासंबंधी नेमून दिलेला लवाद जो निर्णय घेतो तो राज्येमान्य करुनतंटा मिटवितात. उदा.,कृष्णा पाणी वाटप लवाद. न्या. ब्रिजेशकुमार यांच्याअध्यक्षतेखाली लवादाने नदीच्या पाण्याचा सर्वाधिक वाटा आंध प्रदेश,त्याखालोखाल कर्नाटक व महाराष्ट्राला दिला. १९७६ मध्ये न्या. बच्छावतआयोगाने नेमून दिलेली पाणी वाटपाची मुदत२००० मध्ये संपल्यानंतरलवादाची पुन:स्थापना होऊन पाण्याची वाटणी करण्यात आली. दोन्ही लवादांनी केलेले कृष्णा पाणी वाटपाचे प्रमाण खालील कोष्टकात दिले आहे. 

कोष्टक क्र. ३ : कृष्णा पाणी वाटप आयोग 

राज्य 

न्या. बच्छावत आयोग 

(१९७६ –२०००)

न्या. ब्रिजेशकुमार आयोग 

(२०११–५०)

आंध्र प्रदेश 

८११ अब्ज घन फूट 

१,००१ अब्ज घन फूट 

कर्नाटक 

७३४ अब्ज घन फूट 

९११ अब्ज घन फूट 

महाराष्ट्र 

५८५ अब्ज घन फूट 

६६६ अब्ज घन फूट 


 इझ्राएलमधील सिंचन : सध्या जगात इझ्राएलची सिंचनपद्घती अत्याधुनिक व अतिप्रगत आहे. त्या सिंचन पद्घतीची माहितीथोडक्यात दिली आहे. इझ्राएलमधील कृषी क्षेत्रात सु. १.२ अब्ज घनमीटर पाणी दरवर्षी वापरले जाते.त्यापैकी सु.  ९० कोटी घनमीटर पाणीगोडे असते. उर्वरित पाणी नि:सारण (सांडपाणी), पुराचे पाणी, खारे पाणीव खाऱ्या पाण्याच्या विहिरींतून मिळते. 

इझ्राएलने आपल्याकडील मर्यादित पाण्याच्या स्रोताचा पुरेपूर वापरकरुन घेण्यासाठी विविध सिंचन पद्घतींचा अवलंब केला आहे.

(१) ठिबक सिंचन : ठिबक सिंचनाद्वारे एका तासात १–२० लि.पर्यंतपाणी पुरविता येते ज्यातपाण्याचा जवळजवळ ९५ टक्के पर्यंत वापर होतो.या पद्घतीचा वापर सरळ वाढणाऱ्या पिकांच्या लागवडीकरिता करतात.

या पद्घतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे समप्रमाणात जमिनीतीलआर्द्रता टिकून राहते व पाण्याचा अपव्ययही फार कमी प्रमाणात होतो.सांडपाण्याच्या वापरासाठी ठिबक सिंचनाचा विकास करण्यात आलाआहे. या पद्घतीत पाण्याचे नियंत्रित वितरण होते. सिंचन नळ्यांत ( तोट्यांत )दंतूर प्लास्टिकच्या बनलेल्या गाळणी (जाळ्या ) बसविलेल्या असतात, ज्यामुळेपाण्याचाप्रवाह गरगरत वाढतो व त्यांद्वारे धुळीचे कण वा घाणीचेकण वाहून नेले जातात. याद्वारे नळ्यांत होणारा अवरोध टाळला जातो.

भूमीगत सिंचन : यात ठिबक सिंचनातील उपनलिका ५० सेंमी.खोलीपर्यंत जमिनीत गाडल्या जातात. टारप्लानद्वारे या उपनलिकांचे संरक्षणकेले जाते. ठिबक नळ्यांभोवती लहान मुळे उगवू नयेत याची ते काळजीघेते. बाहेरील मातीचे कण वा धूळ नळ्यांत शिरु नये म्हणून हवेच्याझडपा बसविलेल्या असतात. पाण्याचा प्रवाह बंद केला म्हणजे या झडपासुरु होऊन बाहेरील धूळ वा कण येण्यापासूनसंरक्षण होते. या पद्घतीत विविध ठिबकविकसित केले आहेत. रेखीय ( रेषीय )ठिबक,नियंत्रक वा अनियंत्रक स्थिर ठिबक इत्यादी.

 आ. २. स्वयंचलित नियंत्रक ठिबक पद्घती : (१) नियंत्रक झडप, (२) अभिचालित्र चालक, (३) प्रवाहमापक, (४) सूक्ष्मनियंत्रक केंद्र, (५) एल्सीडी स्वयंघटक, (६) रासायनिक अंतःक्षेपण केंद्र, (७) गतिनियंत्रक प्रदान, (८) चलित्र, (९) जलउद्गम, (१०) संगणक आंतरपृष्ठ शृंखला तळ, (११) प्रवर्धक, (१२) संवेदक, (१३) परिवर्तक, (१४) उत्सर्जक.फवारणी सिंचन : या पद्घतीत प्रत्येकझाडास त्याचा स्वत:चा फवारणी पंप बसविलेलाअसतो. हरितगृह व फळबागांसाठी या पद्धतीत पाण्याच्या वापराची क्षमता ८५ टक्क्यांपर्यंत पोहचते.

  

(२) तुषार सिंचन : ज्यापिकासाठी संपूर्ण जमिनीवर वा क्षेत्रावरपाणी पुरविणे गरजेचे असते अशा पिकासाठी तुषार सिंचन विकसितकरण्यात आले आहे.

सिंचन पद्घतींचे प्रचालन : या सर्व सिंचन पद्घती संगणकाद्वारेकार्यान्वित करता येतात. संगणकीकरणामुळे सत्काल प्रचालन, प्रचालनाच्या कार्यानाच्या शृंखला करता येतात. नियंत्रित प्रचालन अनेकतास काटेकोरपणे, विश्वा सार्हपणे व मनुष्यबळ वाचवून करता येते.जेव्हा संगणक प्रणाली ठराविक प्रमाणात पाणी व वरखते पुरविल्याचीनोंद करते तेव्हापुरवठा स्वयंचलित रीत्या बंद होतो. संगणकीकरणाद्वारेपाणी देण्याच्या पाळ्या देखील ठरविता येतात. प्रणालीत संवेदकेदेखील बसविलेली असतात, जे पाणी देण्याच्या योग्य वेळा ठरविण्यासमदत करतात.

जमिनीत आर्द्रता संवेदके बसविलेली असतात, जे मातीतीलआर्द्रतेच्या स्तराविषयीची माहिती पुरवितात. दुसऱ्या एका प्रकारात वनस्पतीसंवेदके बसविलेली असतात, ती खोडाच्या वा फळाच्या आकारांच्याबदलांवरुन पाणी देण्याच्या वेळा व प्रमाण ठरवितात. संवेदके थेटसंगणकास जोडलेली असतात, ज्यामुळेस्वयंचलित सिंचन प्रणालीलागरजेनुसार पाणी पुरविता येते. स्वयंचलित नियंत्रक पद्घती कशा पद्घतीनेवापरात येते, यासाठी आ.२. दिलेली आहे.

वाघ, नितिन भ.

पहा : आर्किमिडीज स्कू कालवे व देशांतर्गत जलमार्ग कोयना प्रकल्पजलवाहिनी जायकवाडी प्रकल्प तलाव दलदल धरणे व बंधारे नदीनदी खोरे योजना निचरा पंप पवन चक्की पाणीपुरवठा पूर नियंत्रणफराक्का प्रकल्प बोगदा भूमिजल मोट रहाटगाडगे विहीर सरोवर.

संदर्भ : 1. Cuenca, R. Irrigation System Design, 1989.

  2. Framji, K. K. Garga, B. C. Luthra, S. D. L. Irrigation and Drainage in the World, 1981–83.

   3. Hay, D. R. Ed., Planning Now for Irrigation and Drainage in the 21st Century,1988.

   4. Hillel, D. Ed., Advances in Irrigation Engineering, 1987.

   5. Hoffman, G. J. Howell, A. Solomon, H., Eds., Management of Farm Irrigation Systems, 1990.

  6. Stewart, B. A. Nielsen, D. R. Eds., Irrigation of Agricultural Crops, 1990.