सिंग, जॉन मिलिंग्टन : (१६ एप्रिल १८७१–२४ मार्च१९०९). श्रेष्ठ आयरिश नाटककार. इंग्रजीतून लेखन. जन्म राथफार्नहॅम ह्या डब्लिन शहराच्या एकाउपनगरात. त्याचे वडील बॅरिस्टरहोते. तो एक वर्षाचा असतानाच तेवारले. त्याच्या आईने त्याचासांभाळ केला. घरातले वातावरणकट्टर धार्मिकतेचे होते. डब्लिनयेथील ‘ट्रिनिटी कॉलेज ’ मधून बी.ए.झाल्यानंतर (१८९२) तो व्हायोलिनशिकण्यासाठी जर्मनीला गेला.त्याला संगीताची फार आवड होती.जॉनमिलिंग्टन सिंग जर्मनीतल्या वास्तव्यानंतर तो इटलीआणि फ्रान्समध्येही राहिला. १८९६ मध्ये तो पॅरिसमध्ये स्थायिकहोण्याच्या भावनेने राहू लागला तथापि त्याच वर्षाच्या अखेरीस विख्यातअँग्लो-आयरिश साहित्यिक ⇨ विल्यम बटलर येट्स ह्याच्याशी त्याचीभेट झाली. फ्रेंच साहित्यात रमलेला सिंग ह्या भेटीनंतर येट्सच्याव्यक्तिमत्त्वाने प्रभाविझाला. पुढे १८९८ मध्ये तो पुन्हा येट्सच्यासान्निध्यात आला आणि येट्सच्या सांगण्यानुसार आपले आयरिश लोकआणि त्यांचीसंस्कृती ह्यांच्या अभ्यासात गुंतला. येट्सने त्यालाआयर्लंडच्या अटलांटिक किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या ॲरनबेटांवर जाऊन तिथले जीवन आणि परिसर पाहण्याचा सल्ला दिला. तोसल्ला मानून, सिंग त्या बेटांवर जात-येतराहिला. त्यातून द ॲरन आयलंड्स(१९०७) हे त्याचे पुस्तक निर्माण झाले. तेथील त्याच्या वास्तव्याचीसंस्कारचित्रे त्याने त्यात शब्दबद्घ केली आहेत. आयर्लंडमधील अशालोकजीवनाच्या अनुभवांतून त्याची नाट्यलेखन प्रतिभा चेतावली गेलीआणि इंग्रजी नाट्यसाहित्यात मोलाची भर घालणाऱ्या सहा नाट्यकृती त्याने लिहिल्या. त्या अशा : इन द शॅडो ऑफद ग्लेन (१९०३), दटिंकर्स वेडिंग ( लेखन १९०३, प्रयोग १९०९), रायडर्स टू द सी(१९०४), द वेल ऑफ द सेंट्स(१९०५), द प्ले बॉय ऑफ दवेस्टर्न वर्ल्ड (१९०७) आणि दियर्दी ऑफ सॉरोज ( लेखन १९०९,प्रयोग १९१०). ह्यांतीलपहिल्या दोन नाट्यकृती एकांकी असून दटिंकर्स वेडिंग ही दोन अंकी आहे. अन्य नाटके तीन अंकी आहेत.रायडर्स …,द प्ले बॉय … आणि दियर्दी … ह्या त्याच्या विशेषगाजलेल्या नाट्यकृती.
सिंगच्या नाट्यकृतीची संरचना त्याच्या व्यक्तिरेखांमधूनच थेटपणेआणि सहजपणे आकारत जाते असे दिसून येते. प्रवाही, काव्यात्म भाषा हेत्याच्या नाटकांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्या भाषेतली रंगसमृद्घप्रतिमासृष्टी त्याने लोकभाषांतून प्राप्त करुन घेतली. आधुनिक इंग्रजीनाट्यसाहित्यात सिंगच्या नाट्यभाषेचे अनन्यसाधारणत्व उठून दिसणारेआहे. आयरिश लोकांच्या संवादांची स्वरशैली आणि कविता ह्यांच्याएकात्मतेतून घडविलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तीआहे. आयरिशलोकजीवन, लोककथा आणि परंपरा हा सिंगच्या नाट्यलेखनाचाप्रेरणास्रोत असला, तरी त्याच्या नाटकांतून मूलभूत मानवी भावनांचेदर्शन प्रभावीपणे घडते.
सिंगची प्रकृती १८९७ साली ‘ लिंफॅटिक सॅरकोमा ’ ह्या व्याधीमुळेढासळली. शस्त्रक्रियेनंतर काही वर्षे काहीशी सुप्तावस्थेत राहिलेली हीव्याधी १९०५ नंतर पुन्हा प्रकटली. ह्याच व्याधीने डब्लिन येथे त्याचेनिधन झाले.
संदर्भ : 1. Bushrui, S. B. Sunshine and The Moon’s Delight : A Centerary Tribute to John Millington Synge,1972
2. Greene, D. Stephens,E. John Millington Synge, 1871–1909, New York,1959
3. Price,A. Synge and Anglo-Irish Drama, London, 1961.
4. Skelton, R.The Writings of John Millington Synge, Indianapolis, ( Indiana ),1971
कुलकर्णी, अ. र.
“