साबणीकरण : (सॅपोनिफिकेशन). रसायनांचे साबणात रूपांतरण करणारी प्रक्रिया म्हणजे साबणीकरण होय. तिच्यात तेले किंवा वसा यांचे क्षारीय जलीय व विच्छेदन होते, अथवा वसाम्लांचे उदासिनीकरण होते. जलसंयोग व जलीय विच्छेदन यांच्यासारखीच, परंतु अल्कली वापरून केलेली खास प्रक्रिया म्हणून ‘साबणीकरण’ प्रक्रियेचा उल्लेख करता येईल. ह्या प्रक्रियेचा उल्लेख विशेषतः तेले, वसा (मेद किंवा चरबी) इ. पदार्थांचे जलीय विच्छेदन करून तयार झालेल्या वसाम्लांपासून अल्कली लवण बनविता येतो.
साबणीकरणासाठी आवश्यक असणारे स्टिअरिक अम्ल ‘ट्विचेल पद्घत’ वापरून तयार करतात. या पद्घतीत वसा धुवून बंदिस्त लाकडी पिपात ठेवतात. त्यात पाणी व थोडा ट्विचेल विक्रियाकारक [ वसेच्या अम्लीय जलीय विच्छेदनामधील उत्प्रेरक ⟶ उत्प्रेरण] टाकतात. हे सर्व मिश्रण वाफेच्या साहाय्याने उकळवितात. यामुळे पाणी व वसा यांचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनलेले दृढ मिश्रण) बनते. विक्रिया झालेले मिश्रण अम्लीय करतात. त्यामुळे पायस भंग पावून वसाम्लांचे मिश्रण वर तरंगू लागते. पाणी व ग्लिसरीन तळातून काढून घेतात व त्यामधील ग्लिसरीन एक उपउत्पादन म्हणून मिळवितात. नंतर वसाम्लांच्या मिश्रणाचे विभाजन व शुद्घीकरण करतात. ही एक जलीय विच्छेदनाचीच प्रक्रिया आहे (आ.१). मराठी विश्वकोशातील ‘वासम्ले’ या नोंदीमध्ये ट्विचेल पद्घतीसंबंधी अधिक वर्णन दिलेले आहे.
CH2–O.CO.C17H35 | CH2–OH | |
| | | | |
CH–O.CO.C१७H३५ + | 3H२O ⟶ | CH–OH + 3C17H35.COOH |
| | | | |
CH2–O.CO.C17H35 | CH२–OH | |
ग्लिसरील ट्रायस्टिअरेट
(वसायुक्तपदार्थ) |
पाणी-वाफ + ट्विचेल
विक्रियाकारक |
ग्लिसरीलस्टिअरिकअम्ल
(ग्लिसरॉल) |
आ.१.स्टिअरिनाचे जलीय विच्छेदन |
वरील विक्रियेत पाण्याऐवजी दाहक (कॉस्टिक) सोड्याचा (किंवा दाहक पोटॅशचा) वापर केल्यास सोडियमाचे (किंवा पोटॅशियमाचे) वसाम्लाबरोबर जे लवण मिळते त्याला ‘साबण’ व त्याप्रकियेला ‘साबणीकरण’ असे म्हणतात. याविक्रियेत तयार झालेले साबण व ग्लिसरीन यांच्या मिश्रणामध्ये मीठ टाकून साबण ग्लिसरिनापासून अलग करण्यात येतो. तसेच या प्रकियेत ग्लिसरिनाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येते (आ.२).
वसा (टॅलो), खोबरे, पाम, ऑलिव्ह, भूईमूग, सरकी, एरंड इत्यादींची तेले याकरिता वापरतात. आंघोळीसाठी जो साबण वापरतात त्यामध्ये ग्लिसरिनाचे प्रमाण जास्त ठेवलेले असते. याशिवाय त्यामध्ये रंग, सुगंधी द्रव्ये आणि औषधी द्रव्ये मिसळलेली असतात.
CH2–O.CO.C17H35 | CH2–OH | ||
| | | | ||
CH–O.CO.C17H35 + | 3NaOH ⟶ | CH–OH + | 3C17H35.COONa |
| | | | ||
CH2–O.CO.C17H35 | CH2–OH | ||
स्टिअरिक
ग्लिसराइड(तेल) |
दाहक सोडा | ग्लिसरीन | सोडियमस्टिअरेट
(सोडियमसाबण) |
आ.२.साबणीकरणप्रक्रिया |
सोडियम साबण कठीण असतात तर पोटॅशियम साबण मऊ व विद्राव रुपातही असतात. शाम्पू व सौंदर्यप्रसाधने तयार करताना एथॅनोलामाइन साबण वापरतात.
काही धातु-साबण विशिष्ट कामांकरिता (झिंक स्टिअरेट– साबण स्वच्छतागृहातील चूर्णांमध्ये, शिसे-साबण मलम किंवा वंगणकारक तेले तयार करण्यासाठी आणि मँगनीज, कोबाल्ट इत्यादींचे साबण शुष्कक म्हणून व्हार्निश व्यवसायात) वापरतात. कपड्यातील मळ व धूलिकण काढून टाकण्याकरिता सोडियम साबण वापरतात. ही प्रक्रिया साबणाकडून भिजविण्याची क्रिया व फेस आणण्याची प्रक्रिया या दोन महत्त्वाच्या घटनांमुळे होते. भिजण्याची क्रिया कमी पृष्ठताणामुळे घडून येते आणि साबणाच्या विद्रावाने कापड जास्त प्रमाणात भिजते. अशा रीतीने धूलिकण अलग होतात.
साबण तयार करताना मोठमोठ्या दाहक सोड्याच्या टाक्या, भट्ट्या वगैरे असाव्या लागतात. तेलांचा साठाही करून ठेवावा लागतो व तो खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
पहा : जलीय विच्छेदन तेले व वसा वसाम्ले साबण.
दीक्षित, व. चिं.
“