उरूस: उरूस अथवा ‘उर्स’ ही इस्लाम धर्मातील संज्ञा असून तिचे दोन अर्थ आहेत : (१) विवाहानिमित्तची जेवणावळ आणि (२) मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा उत्सव. पहिल्या अर्थाचे तपशीलवार वर्णन इस्लामी साहित्यात आढळते.
दुसऱ्या अर्थाने ‘उरूस’ व ‘जुलूस’ ह्या संज्ञा वापरल्या जातात. गौस लाजम, दस्तगीर, दादा हयात, कलंदर ह्यांसारख्या मुसलमान सत्पुरुषांच्या दरवर्षी येणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त हा उत्सव असतो. आणि त्यासाठी अनेक लोक भक्तिभावाने एकत्र येतात. सत्पुरुषाच्या कबरीवर नवे वस्त्र चढवून धार्मिक गीते म्हणत लोक ही यात्रा करतात. पुण्यतिथीच्या आदल्या दिवसापासूनच उरूसाचा आरंभ होतो, त्यास ‘संदल’ म्हणतात. उत्सवानिमित्त अनेक लोक एकत्र जमल्याने त्याला जत्रेचे स्वरूप आले व पुढे त्यासच उरूस म्हणू लागले असावे.
करंदीकर, म. अ.