उरण: कुलाबा जिल्ह्यातील उरण महालाचे केंद्र. लोकसंख्या १२,६१६ (१९७१). हे मुंबईच्या आग्नेयीस १२·८७ किमी. असून सडकेने पनवेलच्या नैर्ऋत्येस २३·५ किमी., धरमतर खाडीच्या उत्तरेस वसले आहे. येथून ४·८३ किमी. उत्तरेकडे असलेल्या मोरा बंदरातून घारापुरीस व मुंबईस बोटवाहतूक चालते. दिवा-उरण रेल्वेमार्गाचे काम चालू असून मुंबईच्या दक्षिण टोकापासून उरणपर्यंत पूल बांधून उरण हे मुंबईचे उपनगर बनविण्याची योजना विचाराधीन आहे. येथील मिठागरे व रंगीत फरशा प्रसिद्ध आहेत.

शाह, र. रू.