इब्‍लिस : ज्यू व ख्रिस्ती या धर्मांतील पिशाचाचे हे इस्लामी प्रतिरूप होय. याचा निर्देश कुराणात ८७ ठिकाणी शेतान (सैतान) या नावाने, तर केवळ अकरा ठिकाणी इब्‍लिस या नावाने आलेला आढळतो. दुष्ट पिशाचाच्या ह्या प्रमुखाचे स्वरूप बरेचसे यहुदी (ज्यू) धर्मातील मूळ ‘डेव्हिल’ सारखेच कल्पिलेले दिसते. आदमची पूजा करण्यास नकार देऊन इब्‍लिसने अल्लाविरुद्ध बंड पुकारले, म्हणून त्याला प्रथम देहान्ताची शिक्षा सांगण्यात आली होती. परंतु त्याच्या विनंतीवरून त्याला निवाड्याच्या दिवसापर्यंत जीवदान देऊन स्वर्गातून (अलहन्नातून) हाकून देण्यात आले (कुराण ७.१३). तो धर्मावर श्रद्धा नसणार्‍यांना छळतो आणि त्यांना कुमार्गाने नेतो अशी समजूत आहे.

करंदीकर, म.अ.