इटालियन (इतालियन) भाषा: इटालियनचा समावेश इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाषेपासून झालेल्या रोमान्स गटात होतो. म्हणजे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच इ. भाषा तिच्या भगिनी होत.

इटलीमध्ये या भाषेच्या अनेक बोली आढळतात. उत्तरेकडे लिग्यूरियन, पीडमाँटिश, लाँबर्ड, एमील्यन, रोमान्योल व काही अंशी व्हिनीशियन यांचा समावेश असलेली गॅलो-इटालियन मध्य इटलीत तस्कन, तसेच मार्च, अंब्रिया व उत्तर लेशियम येथील बोली दक्षिणेकडे दक्षिण लेशियम, आब्रूत्सी, कँपेन्या, कॅलाब्रिया, आप्यूल्या व सिसिली या भागांच्या बोली आणि इटलीबाहेर स्वित्झर्लंडचा दक्षिण भाग, उत्तर कॉर्सिका व फ्रान्समधील नीसजवळचा भाग येथील बोली.

इटालियनचा सर्वांत जुना भाषिक पुरावा ९६० ते ९६४ या काळातील आहे. प्रमाण इटालियन भाषा (इताल्यानो) ही मुख्यतः फ्लॉरेन्सच्या सुसंस्कृत समाजात विकसित झालेली तस्कन बोली (लिंग्वा तोस्काना) आहे.

लेखनासाठी इटालियन भाषा रोमन लिपीचा उपयोग करते. मात्र या लिपीत जे, के, डब्ल्यू, एक्स्, वाय् ही अक्षरे नाहीत म्हणजे तिच्यात फक्त एकवीस अक्षरेच आहेत.

ध्वनिविचार:इटालियनमध्ये खालील ध्वनी आहेत: 

स्वर:आ, इ, ए, ॲ, उ, ओ, ऑ 

व्यंजने :

(१)

स्फोटक

 
   

मृदुतालव्य 

क, ग 

   

दंत्य

त, द 

   

ओष्ठ्य

प, ब 

 

(२)

अर्धस्फोटक

   
   

तालव्य

च, ज 

   

दंत्य

च, ज 

 

(३)

अनुनासिक

   
   

तालव्य

   

दंत्य

   

ओष्ठ्य

 

(४)

अर्धस्वर

   
   

तालव्य

   

ओष्ठ्य

 

(५)

द्रव

   
   

कंपक

   

पार्श्विक

ल, ल्य

 

(६)

घर्षक

   
   

तालव्य

   

दंत्य

स, झ 

   

दंतौष्ठ्य 

फ, व 

याशिवाय आघातचिन्हे तीन आहेत पण प्रस्तुत लेखात ती विचारात घेतलेली नाहीत.

रूपविचार : नाम : सर्व नामे स्वरान्त आहेत. लिंगे दोन आहेत: पुल्लिंग व स्त्रीलिंग. अनेकवचनाचे सामान्य नियम असे : (१) पुल्लिंगी आकारान्त नामांचे, पुल्लिंगी ओकारान्त नामांचे व विशेषणांचे, एकारान्त नामांचे व विशेषणांचे आणि ‘मानो’ (हात) या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन अंत्य स्वराच्या जागी इ हा स्वर येऊन होते. उदा., ‘मानी’. (२) आकारान्त स्त्रीलिंगी नामांचे व विशेषणांचे अनेकवचन आ च्या जागी ए येऊन होते. (३) ओ, आघातयुक्त ए, आघातयुक्त ई, इए किंवा उ अंती असणारी नामे अनेकवचनांत बदलत नाहीत.

विशेषण : सर्व विशेषणे ओकारान्त किंवा एकारान्त असतात. फक्त ‘पारी’ (सम), ‘दिस्पारी’, ‘इंपारी’ (विषम) ही तीन विशेषणेच इकारान्त आहेत. ओकारान्त विशेषणांचे स्त्रीलिंगी रूप आकारान्त होते. एकारान्त व इकारान्त विशेषणे स्त्रीलिंगात बदलत नाहीत.

विशेषणांचे तुलनात्मक रूप त्यापूर्वी ‘पिऊ’ (अधिक) व ‘मेनो’ (कमी) हे शब्द ठेवून आणि श्रेष्ठत्वदर्शक रूप या शब्दांपूर्वी ‘इल’ हे निर्गुण विशेषण ठेवून होते. पहिली दहा संख्याविशेषणे अशी : (१) ‘ऊनो’ (पु.), ‘ऊना’ (स्त्री.), (२) ‘दूए’, (३) ‘त्रे’, (४) ‘क्वान्तो’, (५) ‘चिंक्वे’, (६) ‘सेइ’, (७) ‘सेत्ते’, (८) ‘ओत्तो’, (९) ‘नोवे’, (१०) ‘दिएची’. शंभर व हजार यांचे पर्याय अनुक्रमे ‘चेंतो’ व ‘मील्ले’ हे आहेत. एक याशिवाय सर्व विशेषणे विकाररहित आहेत. क्रमवाचक विशेषणे मात्र नामाच्या लिंगवचनांप्रमाणे बदलतात.

सर्वनाम : सर्वनामांची रूपे अशी : ‘इओ’ (मी), ‘नोदू’ (आम्ही), ‘तू’ (तू), ‘वोदू’ (तुम्ही), ‘एल्यी’-‘एस्सो’-‘एइ’-‘ए’ (तो), ‘एस्सी’ (ते), ‘एल्ला’-‘एस्सा’ (ती), ‘एस्से’ (त्या). यांपासून स्वाभित्वदर्शक विशेषणे बनतात. उदा., ‘उल मिओ’ (माझा), ‘ला मिआ’ (माझी) इत्यादी. सर्वनामांपूर्वी संबंधदर्शक शब्द ठेवून पुढीलप्रमाणे रूपे मिळतात. उदा., ‘दि मे’ (माझ्याकडून), ‘आ मे’, ‘मी मे’ (मला), ‘दा मे’ (माझ्याने). दर्शक सर्वनामे अशी : ‘क्वेस्तो’ (हा), ‘क्वेस्ती’ (हे), ‘क्वेस्ता’ (ही), ‘क्वेस्ता’ (ही), ‘क्वेस्ते’ (ह्या). याचप्रमाणे ‘क्वेल्ला’ (तो) याची रूपे.

प्रश्नार्थक व संबंधी सर्वनामे ‘की’ (कोण), ‘के’ (जो) व ‘कुइ’ (ज्याला) ही आहेत. 

क्रियापद : क्रियापदांचे तीन वर्ग आहेत. ते म्हणजे ‘आरे’, ‘एरे’, ‘इरे’ हे प्रत्यय शेवटी येणारे. या प्रत्ययांनुसार ती चालतात. ‘आवेरे’ व ‘एस्सेरे’ (असणे) ही दोन सहायक क्रियापदे आहेत. नमुन्यादाखल वर्तमानकाळाची रूपे:

आमारे 

क्रेदेरे 

आवेरे 

एस्सेरे 

सेर्विरे 

आवडणे

विश्वास येणे

जवळ असणे

असणे

सेवा करणे

आमो

क्रेदो

सोनो

सेर्वो

आमि

क्रेदि

आइ

सेइ

सेर्वि

आमा

क्रेदे

सेर्वे

आमिआमो

क्रेदिआमो

आब्बिआमो

सिआमो

सेर्विआमो

आमाते

क्रेदेते

आवेते

सिएते

सेर्वीते

वर्तमान, अपूर्ण भूत, निश्चित भूत, अनिश्चित भूत, पूर्ण भूत, भविष्य, पूर्ण भविष्य, संकेत (वर्तमान व भूत), आज्ञार्थ, विध्यर्थ (वर्तमान, अपूर्ण भूत, पूर्ण भूत) यांत क्रियापदे चालवली जातात. त्यांची धातुसाधितेही बनतात.

क्रियाविशेषणे : बहुतांश क्रियाविशेषणे विशेषणाच्या स्त्रीलिंगी रूपाताल – ‘मेंते’ हा प्रत्यय जोडून होतात. काही थोडी, पुल्लिंगी  विशेषणापूर्वी ‘दी’ हा संबंधवाचक शब्द ठेवून होतात. काही मात्र स्वतःसिद्ध असतात.

संबंधवाचक : नामांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध त्याच्यापूर्वी संबंधवाचक शब्द ठेवून होतो. उदा., ‘सोत्तो इल लिब्रो’ (पुस्तकाखाली), ‘सोप्रा इल लेत्तो’ (पलंगावर), ‘फुओरी दी काझा’ (घराबाहेर) इत्यादी.

वाक्यविचार : वाक्यरचनेची कल्पना पुढील काही उदाहरणांवरून येईल : (१) ‘क्वेस्तो व्याले फिनिशे सुल जार्दीनो’ – ही गल्ली बागेशी संपते. (२) ‘हो इंपारातो लिताल्यानो आ रोमा’- मी रोमला इटालियन शिकलो. (३) ‘इ नोस्ति आमीचि सोनो आर्रिवाती’- आपले मित्र आले आहेत. (४) ‘पोर्ता ते देइ प्यात्ती’ – बशा घेऊन ये. (५) ‘प्रीमा दि पार्त्ती रे’- निघण्यापूर्वी. (६) ‘क्वेस्ता लेन्या नॉन आर्दे’- हे लाकूड जळत नाही.

संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.  

कालेलकर, ना. गो.