आश्वलायन : ऋग्वेदाच्या एका शाखेचा प्रवर्तक ऋषी. याचे ऋग्वेदाच्या शाकलशाखेचे श्रौतसूत्र, गृह्यसूत्रस्मृति हे ग्रंथ असून ते उपलब्ध आहेत. म्हणून आश्वलशाकल शाखा विद्यमान आहे. भाषेची शैली निराळी असल्यामुळे गृह्यसूत्र आश्वलायनाचे नसावे, त्याच्या शिष्याचे असावे, असे एक मत आहे. तो शौनकाचा शिष्य होता. त्याने आपल्या सूत्रात शेवटी शौनकाला नमस्कार केला आहे. शौनकाचे स्वतःचे सूत्र होते, ते नष्ट झाले. आश्वलायनाचे सूत्र संक्षिप्त व अधिक चांगले आहे.

 

डॉ. आल्ब्रेख्त वेबरच्या मते त्याचा काल इ. . पू. ५०० व चिं. वि. वैद्य यांच्या मते इ. . पू. १२०० हा आहे.

केळकर, गोविंदशास्त्री