आवडी : तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ५३,३३८ (१९७१). हे दक्षिण रेल्वेवर मद्रासच्या पश्चिमेस २२ किमी. आहे. येथे संरक्षण खात्याचा एक अवजड वाहनांचा कारखाना आहे. विजयंता हा भारतीय रणगाडा प्रथम तेथेच तयार करण्यात आला. १९५५ मध्ये येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या धोरणाची प्रथमच घोषणा करण्यात आली.

ओक, शा. नि.