आराउकानियन भाषासमूह : अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषाकुलांपैकी एक कुल. ह्या कुलातील आराउकानियन ही एकच भाषा सध्या ज्ञात आहे. तिला ‘मापूचे’ असेही नाव आहे. उत्तर चिली आणि अर्जेंटिनाचा संलग्‍न भाग येथे सु. २,०८,००० लोक ही भाषा बोलतात. पिकुंचे, हुइलिचे आणि पेवेंचे-मापुचे अशा तिच्या तीन बोली आहेत.

संदर्भ : Voegelin, C. F. Voegelin, F. M. Languages of the World,” Anthropological

         Linguistics, 7:7, Bloomington (Indiana). Oct. 1965.

केळकर, अशोक रा.