आम : (आयुर्वेद). प्रत्येक रोगात आमत्व निरामत्व पहावेच लागते. आम असताना त्याची चिकित्सा न करिता जर रोगाचे उपचार केले तर ते लागू पडत नाहीत. जठराग्नी दुर्बल असता अन्नाचे पचन नीट न झाल्याने उत्पन्न होणारा जो अपक्व रस तो आमाशयात साठतो, तो आम होय. अतिदुष्ट दोषांच्या मिश्रणाने कोद्रूपासून उत्पन्न होणाऱ्या विषाप्रमाणे आम निर्माण होतो. धात्वग्नीच्या दुर्बलतेने अपक्व आहाराचा आम तयार होतो यामुळे मेदोवृद्धी होते.

उपचार : लंघन, दीपन, पाचन करणे व नंतर रुक्ष, लघू, कडू व तिखट आहार देणे, उद्‍वर्तन व संघर्षणही करणे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री