ॲल्‌व्हिन हार्वे हॅन्सेन हॅन्सेन, ॲल्‌व्हिन हार्वे : (२३ ऑगस्ट १८८७–६ जून १९७५). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, साकलिक अर्थशास्त्राचाभाष्यकार आणि जॉन मेनार्ड केन्स याच्या सिद्धांतांचा प्रभावी समर्थक. साउथ डकोटामधील व्हिबोर्ग येथे जन्म. त्याने यांक्टोन कॉलेजातून बी.ए. (इंग्रजी १९१०), तर व्हिस्कॉन्सिन वि द्या पी ठा तू न पीएच्.डी. (अर्थशास्त्र १९१८) या पदव्या संपादित केल्या. ब्राउन विद्यापीठ (१९१६–१९) व मिनेसोटा विद्यापीठ (१९१९–३७) येथे त्याने अध्यापन केलेे. १९३७ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. निवृत्त होईपर्यंत (१९६२) तो या पदावर कार्यरत होता. पुढे १९७५ अखेर त्याने अभ्यागत प्राध्यापक म्हणून मुंबई तसेच अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत अध्यापन केले.

 

हॅन्सेनला अर्थव्यवस्थेतील चढउतार व व्यापारचक्र प्रक्रियाअभ्यासण्यात विशेष रस होता. सुरुवातीला जरी त्याने चलनघट धोरणाचेसमर्थन करून केन्सच्या मागणी-वृद्धीविषयीच्या मताशी असहमतीदर्शविली, तरी पुढील काळात केन्सच्या सिद्धांतांचे आणि दृष्टि-कोनाचे त्याने समर्थनच केले. आपल्या बिझनेस सायकल थिअरी (१९२७) व फिस्कल पॉलिसी अँड बिझनेस सायकल (१९४१) या ग्रंथांत त्याने जागतिक महामंदीच्या कारणांची मीमांसा करणाऱ्याकेन्सच्या विचारांचा पुरस्कार केला. तसेच अपूर्ण उपभोग्य सिद्धांतावरटीका केली. शासनामार्फत मिळणारी व दिली जाणारी भरपाई स्थायी स्वरूपाची असणे म्हणजे अर्थव्यवस्था बळकट झाल्याचे लक्षण असल्याचे त्याने प्रतिपादन केले. आपल्या स्टेट अँड लोकल फायनान्स (१९४४ सहलेखक, एच्. एस्. पर्लोफ) या ग्रंथात त्याने करप्रणालीविषयी सविस्तर विवेचन केले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट व हॅरीट्रमन यांच्या कारकिर्दीतील अनेक आर्थिक धोरणांवर हॅन्सेनचा मोठाप्रभाव होता.

 

हॅन्सेन हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापन व संशोधन करीत असताना त्याचा पॉल मॅक्रेकन व पॉल सॅम्युएल्सन या आपल्या विद्यार्थ्यांवरविशेष प्रभाव होता. या दोघांनी पुढे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची पदे भूषविली. हॅन्सेनने पुढे १९४८ च्या व्यापारचक्रांचे विश्लेषण करणारी, गुणाकार पद्धतीने गती देणारी (असिलेरेटर अँड मल्टिप्लायर) प्रतिकृती विकसित केली. केन्सप्रणीत अर्थशास्त्रावरील प्रमाण मानल्या गेलेल्या गाइड टू केन्स (१९५३) या ग्रंथाचा लेखक म्हणून तो विद्यार्थ्यांच्यापुढील अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. त्याचे या क्षेत्रातील स्वतंत्र कार्य म्हणजे महामंदीचे विश्लेषण होय.

 

हॅन्सेनचा फुल रिकव्हरी ऑर स्टॅग्नेशन (१९३८) हा ग्रंथ केन्सच्या विचारावर आधारलेला असून त्यात त्याने वस्तू व सेवांच्या मागणीबाबत योग्य वेळी शासकीय हस्तक्षेप न झाल्यास त्याचा दीर्घकालीन रोजगार निर्मितीवर विपरित परिणाम संभवतो, हे स्पष्ट केले आहे. त्याने सेवनकमी करण्याच्या सिद्धांतावरही टीका केली असून त्यामुळे आर्थिक विकास व रोजगार निर्मितीत घट संभवते, असे विचार मांडले. त्याने विविध शासकीय आयोग व समित्या यांवर सदस्य, सल्लागार या नात्याने कामकेले होते. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनचा उपाध्यक्ष व अमेरिकन अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्ष ही पदेही त्याने भूषविली.

 

हॅन्सेनचे अलेक्झांड्रिया-व्हर्जिनिया येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

चौधरी, जयवंत

Close Menu
Skip to content