हॅडॉक (मेलॅनोग्रॅमस ईगलफिनस)हॅडॉक : हा अस्थिमत्स्य (शरीरात हाडांचा सांगाडा असणारामासा) गॅडिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलॅनोग्रॅमस ईगलफिनस असे आहे. त्याचा प्रसार उत्तर अटलांटिक महासागरात आहे. अमेरिकेच्या किनाऱ्यावर न्यू फाउंडलंडजवळील खंड-फळीचा प्रदेश, आइसलँड, फेअरो बेटे व बॅरेंट्स समुद्र आणि दक्षिणेस दूरवर न्यू जर्सीपर्यंत (प्रसंगी केप हॅटेरासपर्यंत) आणि यूरोपीय किनाऱ्यावर बिस्के उपसागरात तो आढळतो. कॉड मासे आढळणाऱ्या भागांत याचा प्रसार असला, तरी तो काहीसे उबदार पाणी असलेल्या भागात अधिक आढळतो.

 

हॅडॉक माशाला कॉड माशाप्रमाणेच तीन पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त असणाऱ्यात्वचेच्या स्नायुमय घड्या) व दोन गुदपक्ष आणि हनुवटीवर लहानस्पृशा असते. काळी पार्श्विक रेखा आणि छातीवरील परांच्या वरच्याबाजूस असलेला एक काळा ठिपका यांवरून तो वेगळा ओळखतायेतो. त्याचा रंग पाठीवर करडा किंवा तपकिरी असून खालच्या बाजूला फिकट असतो. सामान्यतः त्याची लांबी सु. ९० सेंमी. व वजन सु. ११ किग्रॅ. असते. तो समुद्राच्या तळाजवळ बहुधा ५०–१५० मी. खोलीवर वावरतो. तो मांसाहारी असून तळाशी असणारे अपृष्ठवंशीय (पाठीचाकणा नसणारे) प्राणी तसेच स्क्विड (लोलिगो) व लहान मासे खाऊन आपली उपजीविका करतो. सामान्यतः त्याचा विणीचा हंगाम फेब्रुवारीते जूनच्या सुरुवातीपर्यंत असतो परंतु स्थानिक परिस्थितीनुरूप तो बदलतो. साधारण १.५ मिमी. व्यासाची अंडी प्लवकाबरोबर एकत्रितपणे तरंगतात व १२–२० दिवसांत त्यांतून पिले बाहेर पडतात. लहान मासे सु. तीन महिन्यांपर्यंत पाण्यात वरच्या भागात तरंगतात व तळाशी जाण्याइतपत मोठे होईपर्यंत प्लवकातील अपृष्ठवंशी प्राण्यांवर उपजीविका करतात.

 

हॅडॉक माशाची वाढ सुरुवातीला झपाट्याने होते व नंतर ती मंदावते. पहिल्या वर्षी त्याची लांबी १५ सेंमी., दुसऱ्या वर्षी ३० सेंमी., पाचव्या वर्षी ५० सेंमी., दहाव्या वर्षी ७५ सेंमी. आणि तेराव्या वर्षी ९० सेंमी. होते. आतापर्यंत पकडलेला सर्वांत मोठा हॅडॉक मासा आइसलँडमधील असून तो ११० सेंमी. लांब व १६.७ किग्रॅ. वजनाचा होता. त्याचे आयुर्मान१५ वर्षांपेक्षा जास्त नसते. तो फार खादाड मासा असून उत्तर समुद्रातत्यांचे थवे वाटेत येणाऱ्या हेरिंग माशांच्या अंड्यांचा फडशा पाडतात.हा महत्त्वाचा खाद्य मत्स्य असून तो धुरी देऊन ‘फिनान हॅडी’ यानावाने विकला जातो.

जमदाडे, ज. वि.

 

हॅडॉक (मेलॅनोग्रामस ईगलफिनस)