कुंदा : (कारी गु. खावो क. कणिग्यन हुळ्ळू लॅ. इशिमम पायलोजम कुल-ग्रॅमिनी). हे वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारे) ०·६ ते १· ५ मी. उंचीचे गवत आहे. मुळे जमिनीत खोल जातात अधश्चरांचे (ठोंबांचे) दाट जाळे जमिनीच्या मशागतीस अडथळे आणते. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत या गवताचा प्रसार सामान्य असून भारतात आंध्र,
मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सोलापूर व अहमदनगर जिल्हे येथे आढळते. सुपीक, काळ्या जमिनीत ते खूप वाढते. फुले मार्च–ऑक्टोबर मध्ये येतात व ती येण्यापूर्वी जनावरास चारण्यास चांगले तथापि त्यांना ते साधारणच आवडते. प्रायोगिक क्षेत्रात या गवताचे हेक्टरी सु. १,०९० किग्रॅ. उत्पादन करण्यात आलेले आहे. ते वाळवूनही वापरतात.
पहा: गवते ग्रॅमिनी.
चौगले, द. सी.
“