गौळण : मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार.कृष्णाच्या बालक्रिडा, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गौळणींनी यशोदेकडे आणलेल्या तक्रारी, त्यांतूनच गौळणींनी मांडलेले कृष्णदेवाचे प्रच्छन्न ‘कवतिक’, गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या गौळणींचा विरहभाव ह्यांचा भावोत्कट आविष्कार गौळणींत आढळतो. ह्या विशिष्ट गीतप्रकारास ह्यामुळेच ‘गौळण’ असे नाव पडले आहे. श्रीज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांनी गौळणी लिहिलेल्या आहेत.

                     घनु वाजे घुण घुणा । वारा वाजे रुण रुणा । 

भवतारक हा कान्हा । वेगी भेटवा का ।।

ही श्रीज्ञानदेवांची विराणी ‘गौळण’ ह्या गीतप्रकारातच मोडते. गौळणींची कृष्णाविरुद्धची गाऱ्हाणी एकनाथांनी आपल्या गौळणींतून मांडली आहेत.

    वारियाने कुंडल  हाले I

डोळे मोडित राधा चाले II

ही एकनाथांची गौळण प्रसिद्धच आहे.

              हरी तुझी कांति रे सTवळी I

मी रे गोरी  चTपेकळी I

     तुझ्या दर्शने होइन काळी I

मग हे वाळी जन मज II

ह्या तुकTरTम महाराजांच्या गौळणीत कृष्णरूपाशी, म्हणजेच परमTत्म्याशी, जीवाचे पूर्ण तTदात्म सूचित होते.

प्रभाकर-पठ्ठे बापूरावांसारख्या जुन्या-नव्या शाहिरांनीही गौळणी रचलेल्या आहेत, तसेच अज्ञात रचनाकारांनी रचिलेल्या अनेक गौळणी केवळ मौखिक परंपरेने उपलब्ध झालेल्या आहेत. उदा.,

         पैलीच गौळण ग 

पैलीच गवळण    

रंगच लTल 

      पTहुनी झाली दंग  

         माझ्या कुंकवाचा रंग 

   आरशTतलं भिंग 

             फुगडी खेळू किष्णासंग 

जोडव्याचे ठसे 

            किष्ण कमळाखाली बसे

या गीतात पुढे हळदकुंकू, अबीरबुक्का लTवलेल्या गौळणी तो तो रंग वस्त्रांना धारण करीत कृष्णदेवाबरोबर फुगडी खेळताना दाखविलेल्या आहेत. पायातील जोडव्यांचे भूईवर उमटणारे ठसे हे कमळासारखे उमटल्याचे सांगून या कमळावर कृष्णदेव दमूनभागून बसलेला सांगितला आहे. म्हणजे कृष्ण व गौळणी यांच्यामधील रासनृत्याचा हा मनोहारी आविष्कार आहे. हे गीत हवे तेवढे रंग खेळवीत याच रीतीने पुढे बराच वेळ लांबत जाते. या गीतात शृंगाररस मर्यादेने सर्वत्र वावरलेला आहे.

यंगी यमुनेचा घाट 

    शिरी पाणीयाचा माठ 

राधे तुझा रंगपाणी 

कृष्णा तरी झाला दंग 

पायी पैंजण तोडं वाळं 

बिरुद्याचा घंग्राघोळ 

राधे तुझा रंगपाणी 

कृष्णा तरी झाला दंग

या गीतात याच रीतीने अनेक दागिने गोवलेले असून हे गीत असेच पुढे पुढे सरकलेले आहे. श्रीकृष्णाला बघून गौळणी वेड्या होतात, हे अनेक गीतांनी म्हटले असले, तरी या गीतात मात्र राधा गौळणीच्या अंगावरील अलंकारांच्या साजशृंगाराने वेड्या झालेल्या कृष्णाचीच हकीकत सांगितलेली आहे.

                  पहिलीच गवळण काय बोलली । 

बाई मी काढीत होते दूध । 

मुरली ऐकूनी झाले धुंद । 

          रुशीकेशी का मुरली वाजवीसी । 

      नंदापाशी का वेणू जाब देशी ।।

या गीतात या दूध काढणाऱ्या गौळणीबरोबर दूध विरजणारी, ताक घुसळणारी, लोणी काढणारी, तूप कढविणारी अशी गौळण याच रीतीने पुढे प्रकट झालेली आहे. कृष्णदेवाच्या मुरलीने देहभान विसरणाऱ्या या गौळणी आहेत. अशा गीतांनी राधाकृष्णांची रासक्रीडा रंगविताना शृंगाररसालाही भरपूर खेळविलेले असले, तरी ते भक्तिरसाच्या आधारावरच.

बाबर, सरोजिनी