गोंडल : गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आणि पूर्वीच्या गोंडल संस्थानची राजधानी. लोकसंख्या ५५,३४६ (१९७१). हे राजकोटच्या ३८ किमी. दक्षिणेस असून रेल्वे आणि महामार्ग यांवरील महत्त्वाचे केंद्र आहे. संस्थानी काळापासून हे शिक्षणाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. कापड, भांडी, खेळणी, साबण, आगकाड्या इत्यादींचे अनेक छोटे उद्योगधंदे येथे असून ही तालुक्यातील शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे.
शाह, र. रू.