गुणे पांडुरंग दामोदर : (२० मे १८८४–२५ नोव्हेंबर १९२२). प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक. जन्म अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे व उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजातून झाले. मॅट्रिक परीक्षेत दुसरी शंकरशेट शिष्यवृत्ती (१९००), बी. ए. परीक्षेत ‘भाऊ दाजी’ पारितोषिक व एम.ए. मध्ये ‘झाला वेदान्त’ पारितोषिक मिळविले (१९०७). १९०८ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक झाले. सरकारी शिष्यवृत्ती मिळवून लाइपसिक (जर्मनी) विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादिली (१९१३). ते विलिंग्डन कॉलेज, सांगली येथेही संस्कृतचे प्राध्यापक म्हणून होते. 

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, मुंबई विद्यापीठ, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांच्या कार्यांत ते भाग घेत. ॲन इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह फायलॉलॉजी  (१९१८) हा संस्कृत, प्राकृत व आधुनिक देशी भाषा यांचा तौलनिक अभ्यास मांडणारा त्यांचा इंग्रजी ग्रंथ व चिं.वि. वैद्यांबरोबर ‘मराठी भाषेच्या उत्पत्ती’ संबंधी त्यांचा झालेला वाद (विविधज्ञानविस्तार, १९२२ पुनर्मुद्रण १९६८) तसेच ‘मराठी भाषेचा कालनिर्णय’ व ‘अपभ्रंश भाषेतील वाङ्‌मय’ (भारत इतिहास संशोधक मंडळ वार्षिक वृत्त – ६ व ७) हे त्यांचे लेख भाषाशास्त्रीय अभ्यासात विशेष भर घालणारे आहेत. याशिवाय माझा युरोपातील प्रवास (१९१५), जर्मनीतील लोकशिक्षण (१९१६) ही त्यांची पुस्तके असून त्यांनी मोजके, पण व्यासंगी असे समीक्षालेखही लिहिलेले आहेत.                    

मालशे, स. गं.

गुणाढ्य : पहा बड्‍डकहा. 

गुणे पांडुरंग दामोदर :(२० मे १८८४ – २५ नोव्हेंबर १९२२). प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक. जन्म अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे व उच्च शिक्षम मुंबईच्या विल्सन कॉलेजातून झाले. मॅट्रिक परीक्षेत दुसरी शंकरशेट शिष्यवृत्ती (१९००), बी.ए. परीक्षेत ‘भाऊ दाजी’ पारितोषिक व एम.ए. मध्ये झाला वेदान्त पारितोषिक मिळविले (१९०७). १९०८ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक झाले. सरकारी शिष्यवृत्ती मिळवून लाइपसिक (जर्मनी) विद्यापीठाची पीएचे.डी. पदवी संपादिली (१९१३). ते विलिंग्डन कॉलेज, सांगली येथेही संस्कृतचे प्राध्यापक म्हणून होते. 

भांडारकर प्राच्यविद्या संशोध मंदिर, मुंबई विद्यापीठ, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांच्या कार्यांत ते भाग घेत. अन इंट्रोडक्शन टू कंपेरेटिव्ह फायलॉलॉजी (१९१८) हा संस्कृत, प्राकृत व आधुनिक देशी भाषा यांचा तौलनिक अभ्यास मांडणारा त्यांचा इंग्रजी ग्रंथ व चिं.वि. वैद्यांबरोबर ‘मराठी भाषेच्या उत्पत्ती’ संबंधी त्यांचा झालेला वाद (विविध ज्ञानविस्तार, १९२२ पुनर्मुद्रण १९६८) तसेच ‘मराठी भाषेचा कालनिर्णय’ व ‘अपभ्रंश भाषेतील वाङमय’ (भारत इतिहास संशोधक मंडळ वार्षिक वृत्त – ६ व ७) हे त्यांचे लेख भाषाशास्त्रीय अभ्यासात विशेष भर घालणारे आहेत. याशिवाय माझा युरोपातील प्रवास (१९१५), जर्मनीतील लोकशिक्षण (१९१६) ही त्यांची पुस्तके असून त्यांनी मोजके, पण व्यासंगी असे समीक्षालेखही लिहिलेले आहेत. 

                                                                                मालशे, स.गं.