गुजरात कृषि विद्यापीठ : गुजरात राज्यातील हे विद्यापीठ अहमदाबाद येथे असून त्याची स्थापना १९६९ च्या कृषिविकास अधिनियमानुसार झाली. विद्यापीठाच्या कक्षेत गुजरात राज्यातील कृषी महाविद्यालये अंतर्भूत होतात. सध्या विद्यापीठाने सरदार पटेल विद्यापीठ, सौराष्ट्र विद्यापीठ व दक्षिण गुजरात विद्यापीठ यांचाच शैक्षणिक आकृतिबंध स्वीकारला असून या विद्यापीठांची कृषिविषयक शिक्षण देणारी पाच महाविद्यालये त्यास संलग्न केली आहेत.
देशपांडे, सु. र.