गिला मॉन्स्टर : हा ६० सेंमी. लांबीचा बेढब विषारी सरडा आहे. याचे शास्त्रीय नाव हेलोडर्मा सस्पेक्टम आहे. अमेरिकेतील गिला नदीच्या आसपास प्रथम सापडल्यामुळे याला सदरहू नाव मिळाले. अमेरिकेतील काही राज्यांत आणि मेक्सिकोत हा आढळतो. याच्या खालच्या जबड्यात असणाऱ्या विषग्रंथीतून विष बाहेर

गिला मॉन्स्टर

पडते. याच्या दंशाने माणूस मरत नाही. रंग गुलाबी किंवा नारिंगी आणि त्यावर गर्द तपकिरी पट्टे व चकंदळे असतात. लहान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी व अंडी याचे भक्ष्य होय. दिवसा लपून बसून रात्री हा भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. 

  

कर्वे, ज. नी.

Close Menu
Skip to content