ऐंद्रजल : (आयुर्वेद). इंद्राने दिलेले पावसाचे पाणी. प्रकार दोन : गांग व सामुद्र.
चांदीच्या भांड्यात शाली जातीचा भात ठेवून त्यावर पावसाचे पाणी शिंपडून दीड तास तसेच ठेवावे. त्या वेळात भात जर निर्मलजशाचा तसा राहिला, त्याला पाणी सुटले नाही व वर्ण बदलला नाही तर ते गांगजल व मलिन, पाणी सुटलेला व वर्णही बदलेला भात झाला तर ते सामुद्रजल. हे आश्विन कार्तिकाशिवाय पिऊ नये. गांग पाणी नेहमी प्यावे, गांग पाणी वस्त्रगाळ करून प्यावे. ते खाली पडल्यावर त्यावर सूर्य, चंद्र व वायू तसेच जमीन व काल यांचेही परिणाम होतात. त्यांचे गुणावगुण त्यात येतील.
जोशी, वेणीमाधवशास्त्री