ख्यालनामा : विशेष प्रचारात नसलेला हा एक शास्त्रीय कंठसंगीताचा प्रकार असून उत्तर भारतीय परंपरेतील ]ग्वाल्हेर घराण्यात बराच गायला जातो. ख्याल या संगीतप्रकाराप्रमाणेच याची बांधणी विशिष्ट तालांत व उपयोग विशिष्ट रागविस्तारार्थ होत असतो. पण याची रचना करताना ]तराणा या दुसऱ्या उत्तर भारतीय कंठसंगीत प्रकाराप्रमाणे अर्थहीन शब्दांचा वापर करण्यात येतो. काही प्रमाणात का होईना, पण निश्चितपणे पडणारे शब्दार्थांचे बंधन टाळून व द्रुत लयींतील तराण्यातील संथ आलापी अस्वाभाविक ठरविणारी द्रुत लय बाजूला सारून या संगीतप्रकारात रागविस्तार करता येतो, हा त्याचा विशेष होय.
रानडे, अशोक