गांधील माशी : हायमेनॉप्टेरा गणातील कीटकांना सामान्यतः हे नाव देतात. त्यांची शारीरिक लक्षणे म्हणजे त्यांची मुखांगे (तोंडाचे अवयव) दंशक (दंश करण्यास योग्य) असतात व स्पर्शिका बारा किंवा तेरा खंडांच्या असतात. सर्वसाधारणतः त्यांना पंख असतात व उदर वक्षाला एका बारीक देठाने जोडलेले असते. मादी व कामकरी गांधील माशीचा दंश भयंकर असतो. त्या मांसाहारी किंवा जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात, हा मधमाश्या व त्यांच्यातील फरक आहे. त्यांच्या २०,००० हून अधिक जाती माहीत असून या माश्या मुख्यत्वे एकेकट्या राहतात.

गांधील माशी

गांधील माशी उपद्रवकारक आहे तशी उपकारकही आहे. तिच्या दंशाने वेदना होतात, पण ती पिकांचा नाश करणाऱ्या कीटकांच्या अळ्या खाते.

गांधील माश्या घरांच्या वळचणीला, स्‍नानघरांत, खिडक्यांच्या झडपांमागे माणसाचा हात न फिरण्याजोग्या आडोशाच्या जागी आपली कागदासारख्या पांढऱ्या चिवट पदार्थापासून लहानसर आकाराची पोळी कोणत्यातरी आधाराला चिकटवून तयार करतात. अजाणतेपणी माणसाचा पोळ्याला धक्का लागल्यास पोळ्यातील गांधील माश्या चवताळून त्याला आपल्या नांग्यांनी कडकडून दंश करतात. त्यामुळे भंयकर वेदना होतात म्हणून माणूस त्यांच्या नाशाचा प्रयत्‍न

करतो.

गांधील माशीचे जीवनचक्र गांधील माशी, अंडी, अळी, कोष व गांधील माशी याप्रमाणे असते. नर-मादी संयोगानंतर नर मरून जातो. मादी सोईस्कर जागा शोधून पोळे बांधू लागते. पोळ्यात षटकोनी आकाराचे गाळे तयार करून मादी प्रत्येकात एक एक अंडे गाळ्याच्या बाजूला चिकटवून ठेवते. थोड्याच दिवसांत अंड्यांमधून अळ्या निघतात. गांधील माश्या त्यांना बाहेरून दुसऱ्या कीटकांच्या अळ्या आणून खाऊ घालतात. काही दिवसांनी अळ्यांचे कोष बनतात. ही कोषावस्था दोन आठवडे किंवा अधिक टिकते. नंतर त्यांच्यामधून गांधील माश्या निघतात.

गांधील माश्या नष्ट करण्याकरिता रात्रीच्या वेळी गांधील माश्या पोळ्यात विश्रांती घेत असताना लांब कTठीला बांधलेल्या पेटत्याबोळ्यांनी पोळीजTळतातवा १o% गॅमेक्झिन भुकटी यंत्राने पोळ्यावर उडवितात.

पहा : कीटकदंश.

पाटील, ह. चिं.