गणपुले, परशुराम बळवंत : (? १८७५–? १९७३). गुजरातमधील मंगलोरी कौले व चिनी मातीच्या वस्तूंचे यशस्वी कारखानदार. जन्म पुणे जिल्ह्यात गुंजवणे येथे. शिक्षण मामांकडे बडोद्यास कलाभवनमध्ये. बडोदे सरकार बुडत चाललेला कौलेविटांचा कारखाना यांनी पहिल्या महायुद्धापूर्वी चालविण्यास घेऊन सुस्थितीत आणला. बिलिमोरा येथेही एक कारखाना काढून त्याची मर्यादित कंपनी केली. वांकानेर (काठेवाड) येथे कौलेविटांचा कारखाना काढल्यानंतर मोरवी संस्थानचा बरण्यांचा कारखाना चालविण्यास घेऊन त्याचे रूपांतर ‘परशुराम पॉटरी वर्क्स कं. लि’ या प्रसिद्ध कारखान्यात केले. यांनी परप्रांतात जाऊन या विशिष्ट धंद्यात धडाडीचे यश मिळविले व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्यांची सोयही केली.
धोंगडे, ए. रा.
“