पुट : (आयुर्वेद).पारा,ताम्रादि धातू, रत्ने इ.पार्थिव द्रव्यांचे भस्म करण्याला लागणाऱ्या अग्नीचे प्रमाण दाखविणारे. ठराविक प्रमाणाचा खड्डा करून त्यात रानशेण्या ठेवून, त्यात औषधाचे संपुट ठेवून अग्नी देणे. रानशेण्याच्या ऐवजी द्रव्याला अनुसरून तांदळाच्या दाण्याचे तूस, बोरीची लाकडे,खैराची लाकडे या निरनिराळ्या जळणांचा अग्नी द्यावयाचा असतो. खड्ड्याचे आकारमान व जळणाची जात यांवर अग्नीचे प्रमाण अवलंबुन असते. कपोत पुट आणि बोरीची लाकडे, तूस यांचा अग्नी सौम्य तर महापुुट व त्यात खैराच्या लाकडाचा अग्नी अती तीव्र होय. ह्यांखेरीज अगदी सौम्य व तीव्र अग्नी देण्याचे अनेक प्रकार आहेत. भस्म सूक्ष्म, हलके, निःशल्य व गुणवान व्हावे आणि म्हणुन त्या द्रव्याला योग्य अग्नी मिळावा हा पुटाचा हेतू आहे.[→निरुत्थ].
जोशी, वेणीमाधवशास्त्री