पॉटॉट्स्की , व्हाट्स्लाव्ह : (१६२५ –सु. १६९७). पोलिश कवी. ल्यूझना येथे जन्मला. तो जमीनदार (स्क्वायर) होता आणि पद्धतशीर शिक्षण त्याने फारसे घेतलेले नव्हते. Wojna Chocimska (इं.शी. चोसीम्स वॉर) ह्या महाकाव्यावर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्टित आहे. १६२१ मध्ये ६५,००० पोलिश आणि कसॅक लोकांनी चोसीम शहराच्या रक्षणार्थ सु. ४ लाख तुर्की सैन्याशी दिलेल्या लढ्याचा इतिहास ‘चोसीम्स वॉर’ मध्ये पॉटॉट्स्कीने काव्यबद्ध केलेला आहे. १६७० मध्ये पूर्ण झालेले हे महाकाव्य १८५० मध्ये प्रकाशित झाले. वेधक वर्णने करण्याचे पॉटॉट्स्कीचे सामर्थ्य ह्या महाकाव्यातून जाणवते. त्याने काही उपरोधिका आणि भावकविताही लिहिल्या आहेत.

कुलकर्णी, अ.र