लेऑपॉल्टस्टाफ, लेऑपॉल्ट : (१४ सप्टेंबर १८७८—३१ मे १९५७). पोलिश कवी. पूर्वी पोलंडमध्ये, परंतु आता युक्रेनमध्ये असलेल्या लव्हॉव्ह येथे जन्मला. लव्हॉव्ह विद्यापीठातील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो क्रेको येथे आला. ‘ ड्रीम्स ऑफ पॉवर ’ ( इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९०१ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याचे तिसाहून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘ द डे ऑफ सोल ’ (१९०३, इं. शी.) आणि ‘ द नीडल्स आय ’ (१९२७, इं. शी.) हे त्याचे काही उल्लेखनीय का व्य सं ग्र ह. त्याची कविता विविध रूपांनी समृद्ध असून, ती तंत्र- दृष्ट्याही सफाईदार आहे. आपल्या काव्याविष्कारासाठी जुने घाट अपुरे वाटल्यास तो नवे घाट निर्माण करीत असे. Wilkina हा त्याचा अखेरचा काव्यसंग्रह १९५४ मध्ये प्रसिद्ध झाला. अनेक ताज्या आणि नवीन काव्य-कल्पना त्याला त्याच्या वृद्धावस्थेत सुचत, ह्याचे प्रत्यंतर ह्या काव्यसंग्रहा-वरून येते. स्टाफने काही नाटकेही लिहिली. ⇨ फ्रीड्रिख व्हिल्हेल्म नीत्शे, ⇨ योहान वोल्फगांग फोन गटे ह्यांच्या साहित्याची त्याने भाषांतरे केली तथापि कवी म्हणूनच तो मुख्यत: ओळखला जातो.

पोलंडमधील स्कारझिस्को-कम्येन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.

Close Menu
Skip to content