हौसे, बेर्नार्दो आलबेर्तो : (१० एप्रिल १८८७ – २१ सप्टेंबर १९७१). अजबटिनीयन शरीरक्रियावैज्ञानिक. प्राण्यांमध्ये पोष ग्रंथी-तील हॉर्मोने रक्तातील साखरेच्या (ग्लुकोजाच्या) प्रमाणाचे कशा प्रकारे नियमन करतात, या संशोधनकार्याबद्दल हौसे यांना १९४७ सालचे शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिककार्ल फर्डिनंड कॉरीगर्टी थेरेसा (रॅडनिझ) कॉरी या दांपत्यासोबत विभागून मिळाले.

बेर्नार्दो आलबेर्तो हौसे
बेर्नार्दो आलबेर्तो हौसे

 

हौसे यांचा जन्म ब्वेनस एअरीझ (अजबटिना) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी शाळेत झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ब्वेनस एअरीझ विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र शाळेत प्रवेश घेतला आणि १९०४ मध्ये ते पदवीधर झाले. नंतर त्यांचे वैद्यक विषयाचे अध्ययन चालू असताना त्यांना १९०७ मध्ये शरीरक्रियाविज्ञान विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मूलजनकावर संशोधन करून १९११ मध्ये एम्.डी. पदवीकरिता प्रबंध सादर केला आणि त्यांना विद्यापीठाचे पारितोषिक मिळाले. १९१३ मध्ये ते अल्व्हिअर रुग्णालयाचे प्रमुख वैद्य झाले. ते नॅशनल डिपार्टमेंट ऑफ हायजीन या संस्थेतील लॅबोरेटरी ऑफ एक्स्पेरिमेंटल फिजिऑलॉजी अँड पॅथॉलॉजी या प्रयोगशाळेचे प्रमुख होते (१९१५–१९). ते १९१९ मध्ये ब्वेनस ए अ री झ विद्यापीठात मेडिकल स्कू ल म ध्येप्रा ध्या प क झाले. १९४३ मध्ये अर्जेंटिनात लष्करी सत्तांतर झाले आणि जनरलह्वान दोमिंगो पेरॉन यांच्या आदेशावरून १५० अजबटिनीयन शिक्षणतज्ञांना कामावरून कमी करण्यात आले, तेव्हा त्यात हौसे हे देखील होते. १९४४ मध्ये हौसे यांनी ब्वेनस एअरीझ येथे खाजगी अनुदानातून इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी अँड एक्स्पेरिमेंटल मेडिसिन या संस्थेची स्थापना केली. १९४६ मध्ये ते या संस्थेचे संचालक झाले. पुढे ही संस्था शरीरक्रियाविज्ञानातील संशोधनाचे सर्वोत्तम केंद्र बनली.

हौसे यांना अंत:स्रावी ग्रंथींमध्ये विशेष रस होता. त्यांनी औषधि-क्रियाविज्ञानात देखील काम केले. अग्निपिंड छेदनामुळे मधुमेहग्रस्तता दाखविणाऱ्या कुत्र्यांवर १९२४–३७ या कालावधीत संशोधन करीत असताना हौसे यांच्या लक्षात आले की, ॲडिनोहायपोफायसिस (मेंदूच्या खाली असलेल्या पोष ग्रंथी पिंडाचा अग्रीय किंवा ललाटीय भाग) काढून टाकल्यास या रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर कमी होतात आणि असाधारण रीतीने प्राण्यांना इन्शुलिनाच्या प्रती संवेदनशील बनवितात. त्यांनी असे प्रात्यक्षिक करून दाखविले की, पोष ग्रंथीतील स्राव सामान्य (निरोगी) प्राण्यांत टोचला, तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाची लक्षणे दिसतात. यावरून असे लक्षात आले की, पोष ग्रंथीतील स्राव इन्शुलिनाच्या क्रियेला विरोध करतात.

हौसे यांना विविध २५ विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळाल्या तसेच त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ मेडिसिन, अजबटिना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, ब्वेनस एअरीझ ॲकॅडेमी ऑफ मॉरल अँड पॉलिटिकल सायन्सेस, ब्वेनस एअरीझ अशा अनेक संस्थांचे सदस्य होते. त्यांनी विविध १५ विद्यापीठांमध्ये सन्माननीय प्राध्यापक आणि ११ ॲकॅडेमींमध्ये परदेशी सहकारी म्हणून काम केले. त्यांचे सु. ५०० पेक्षा जास्त शोधनिबंध विविधनियतकालिकांत प्रसिद्ध झाले. ह्यूमन फिजिऑलॉजी हा त्यांचा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे.

हौसे यांचे ब्वेनस एअरीझ येथे निधन झाले.

भारस्कर, शिल्पा चं.