हेब्रिडीझ : युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंडच्या आधिपत्याखालील, अटलांटिक महासागरातील बेटे.हेब्रिडीझ या बेटांत सु. ५०० बेटांचा समावेश होत असून, त्यांचे क्षेत्रफळ सु. ७,२८३ चौ.किमी. आहे. ही बेटे स्कॉटलंडच्या मुख्य भूमीच्या वायव्येस अटलांटिक महासागरात असून ती बेटे वेस्टर्न आयलंडस् म्हणूनही ओळखली जातात. लोकसंख्या ४४,७५९ (२०११) होती. 

 

हेब्रिडीझ बेटांचे औटर हेब्रिडीझ व इनर हेब्रिडीझ याप्रमाणे दोनसमूहांत विभाजन करण्यात येते. नॉर्थ मिंच आणि लिटल मिंच या सामुद्र-धुन्यांमुळे व हेब्रिडीझ समुद्रामुळे औटर हेब्रिडीझ व इनर हेब्रिडीझ एकमेकांपासून अलग झालेली आहेत. औटर हेब्रिडीझ ही बेटे अटलांटिक महासागरात अर्धचंद्राकृती पसरलेली असून ती सु. २१० किमी. लांबव सु. ५० किमी. पेक्षा कमी रुंद आहेत, औटर हेब्रिडीझमध्ये लूझ-हॅरस, नॉर्थ यूस्ट, साउथ यूस्ट, बेनबेकयल, बॅरा, फ्लॅनॅन, सेंट कील्द या प्रमुख बेटांचा समावेश होतो. ही बेटे खडकाळ असून येथे लेविसियन जबूर हा खडक आढळतो. औटर हेब्रिडीझमधील बहुतेक बेटे दलदलयुक्त, ओसाड व काहीशी पडीक जमीन असलेली आहेत.इनर हेब्रिडीझ ही बेटे स्कॉटलंडच्या मुख्य भूमीलगत अटलांटिकमहासागरात आहेत. या बेटांत स्काई, जुरा, आइले, मल, एग, कॉल, आइओन, स्टाफ, कालन्झे, ओरन्झे, रूम, टाइरी, उल्व्ह, स्कॉर्ब ही प्रमुख बेटे आहेत. स्कॉर्ब हे येथील मोठे बेट आहे. याबेटावर कुलिन टेकड्या असून यांची सस.पासूनची उंची १,००९ मी.आहे. हे ब्रिटनमधील प्रसिद्ध गिरिपिंड आहे. रूम बेटावर निसर्गसंरक्षण संशोधन केंद्र १९५७ पासून कार्यरत असून त्यामार्फत येथील भूरचना, वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास करण्यात येतो. हेब्रिडीझ बेटांवरील हवामान सौम्य व दमट आहे. येथील हवामानावर गल्फ यागरम पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम होतो. तसेच अटलांटिकच्या भयंकर वादळांमुळे येथे हानी होते. औटर हेब्रिडीझमधील लूझस बेटावरवा. स. पर्जन्यमान ११० सेंमी. व इनर हेब्रिडीझमधील बेटांवर वा. स. पर्जन्यमान १३० सेंमी. ते २०० सेंमी. असते. लूझ-हॅरस, स्कॉर्ब, जुरा, मल या बेटांव्यतिरिक्त अन्य बेटांवर झाडे अल्प प्रमाणात आहेत. येथे रेड हरिण, मेंढ्या, तट्टू, शेळ्या हे प्राणी व पफिन, सोनेरी गरुड इ. विविध पक्षी आढळतात. 

 

या बेटांवर केल्टिक व नॉर्स लोकांची वसाहत होती. आठव्या शतकात ही बेटे नॉर्वेच्या ताब्यात होती. १२६६ मध्ये नॉर्वेचा राजा मॅग्नससहावा व स्कॉटलंडचा तिसरा अलेक्झांडर यांमध्ये तह होऊन ही बेटे स्कॉटलंडच्या अखत्यारित आली होती. तद्नंतर ही बेटे १७४८ पर्यंत स्कॉटलंडमधील स्थानिक हायलँडर मॅकडॉनेल्ड, मॅकनिल, मॅक्लाऊड इत्यादींच्या अमलात होती. नंतर ही बेटे स्कॉटलंडच्या राजाच्या आधिपत्यात आली. स्थानिक युद्धविराम आणि कृषिविकास यांमुळेयेथे लोकसंख्येत वाढ झाली. एकोणिसाव्या व विसाव्या शतकातयेथील प्रशासकीय व्यवस्थेविषयी ब्रिटनने विशेष प्रयत्न केले होते. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, मेंढ्यापालन, पर्यटन, विणलेले लोकरी कापड, स्कॉच-व्हिस्की निर्मिती यांवर अवलंबून आहे. येथेहॅरिस-ट्विड हे प्रसिद्ध लोकरी कापड तयार करण्यात येते. 

 

हेब्रिडीझ बेटांच्या एकूण भूक्षेत्रापैकी ७७७ चौ. किमी. क्षेत्र लागवडयोग्य आहे. येथील बहुसंख्य लोक खंडाने लहानलहान क्षेत्रांत शेती करतात. त्यांना ‘क्रॉफ्टस् म्हणतात. ते बार्ली, ओट, बटाटे ही पिके घेतात. 

 

हेब्रिडीझ बेटांमधील सु. १०० बेटांवर मानवी वस्ती आहे. पुष्कळशी बेटे ओसाड व मानवी वस्तीस पोषक नाहीत. लोकांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, म्हणून येथे दुसऱ्या महायुद्धानंतर विशेष प्रयत्न करण्यात आले, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. क्रॉफ्टस्च्या राहणीमानात सुधारणा व्हावी, म्हणून १८६६ मध्ये क्रॉफ्टस होल्डिंगॲक्ट अमलात आला. गेलिक व इंग्रजी या भाषा येथे बोलल्या जातात. हेब्रिडीझ बेटांची स्कॉटलंडच्या मुख्य भूमीवरील बंदरांशी थेट वाहतूक चालते. तसेच काही बेटे हवाईमार्गाने स्कॉटलंडशी जोडली आहेत. येथे स्टॉर्नवे, लॉकटार्बट, लॉकमॅडी, लॉक बॉइसडाल, पॉर्टरी, कॅरबुस्ट, ऑर्ड, किल्मूईर इ. प्रमुख शहरे आहेत. 

गाडे, ना. स.