तमिळनाडू कृषि विद्यापीठ : तमिळनाडू राज्यातील एक कृषी विद्यापीठ. त्याची स्थापना कोईमतूर येथे १९७१ मध्ये झाली. सुरुवातीला तमिळनाडू राज्यातील पाच संशोधन संस्था आणि दोन कृषी महाविद्यालये त्यास जोडण्यात आली. सध्या त्याची कक्षा मदुराई व कोईमतूर या जिल्ह्यांपुरती मर्यादित असून विद्यापीठात मुख्यत्वे कृषिसंबंधित विषय उदा., कीटकविज्ञान, पशुसंवर्धन, वनस्पतिविज्ञान, कृषिअर्थशास्त्र इ. तसेच संशोधन व विस्तारयोजना एवढे कार्य चालते. विस्तारयोजनेचा विभाग स्वतंत्र असून त्या विभागाचे सर्व कामकाज एक संचालक पाहतो व शेतकऱ्यांस आवश्यक तो सल्लाही देतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. ७६,५१६ ग्रंथ असून ५२५ नियतकालिके तेथे नियमित येत असतात (१९७२). विद्यापीठाचा १९७२ चा अर्थसंकल्प सु. १३·१७ लाख रु. होता. त्या सालात विद्यापीठात ९५९ विद्यार्थी शिकत होते.
देशपांडे, सु. र.
“