न्यास – १ : एक संगीतसंज्ञा. प्राचीन भारतीय संगीतातील थाटरागरूप ‘जाति’ व ग्रामराग यांच्या आधारस्वराला किंवा अंतिम स्वराला ‘न्यास’ अशी संज्ञा होती. प्रचलित रागांच्या आलापांत ज्या स्वरांवर अधूनमधून मुक्काम करावा लागतो, त्या स्वरांवर न्यास आहे, असे म्हणतात. संगीत मुख्यतः ‘निबद्ध’ स्वरूपाचे असताना ही संज्ञा महत्त्वाची असावी. कारण त्या अवस्थेत तीमुळे संगीताविष्काराचे स्वरूप निश्चित करता येई. त्यामुळेच ही संज्ञा रागसंगीतपूर्व अवस्थेत अर्थपूर्ण ठरली.

देसाई, चैतन्य