जांगल : जंगल, ओसाड प्रदेश त्यात पाऊस थोडा पडतो. या प्रदेशांत नद्या, झरे, आड, विहिरींना पाणी कमी असते झाडे कमी व तीही लहान व काटेरी असतात डोंगर कमी उष्णता खूप व वारा पुष्कळ वाहतो स्थिर, कृश, क्लेशसह, दीर्घायू व निरोगी माणसे त्यात असतात. वातपित्तदोषजन्य विकार त्यात अधिक होतात. यात तिखट रसाची उत्पत्ती अधिक होते.

पहा : स्वस्थवृत्त.

जोशी, वेणीमाधवशास्त्री