जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील एक महत्त्वपूर्ण विद्यापीठ. त्याची स्थापना ३० सप्टेंबर १९७२ रोजी हैदराबाद येथे झाली. त्याच्या कक्षेत आंध्र प्रदेश राज्यातील तंत्रशास्त्राशी निगडित असलेली बहुतेक महाविद्यालये अंतर्भूत होतात. हैदराबाद, अनंतपूर, काकिनाडा येथील प्रत्येकी एक आणि वरंगळ येथील दोन अशी पाच महाविद्यालये त्यास संलग्न केलेली आहेत. विद्यापीठातील अभ्यासक्रम त्या त्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रमानुसार आहे.
देशपांडे, सु. र.