जलवनस्पति : (लॅ. हायड्रोफाइट्स). वनस्पतींच्या आसमंतातील पाण्याच्या प्रमाणानुसार त्यांचे जलवनस्पती, ⇨ मरुवनस्पती  व ⇨ मध्यवनस्पती  असे तीन गट मानले आहेत. [→ परिस्थितिविज्ञान]. संपूर्णतः किंवा अंशतः पाण्यात वाढणाऱ्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पतींना व सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा अधिक पाणी असलेल्या जमिनीत (दलदलीत) वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलवनस्पती’ म्हणतात. समुद्र, नद्या, ओहोळ, तलाव, हौद, डबकी व तत्सम ठिकाणी ह्या आढळतात. पाण्यातील त्यांच्या स्थितीप्रमाणे त्यांचे निमग्न (बुडलेल्या), प्लवमान (तरंगणाऱ्या) आणि जलस्थलवासी असे भेद केले आहेत. संपूर्णतः पाण्याने वेढलेल्या वनस्पतींना निमग्न, अंशतः किंवा संपूर्णपणे पाण्यावर तरंगणाऱ्या

आ. १. एलोडिया : (१) पानाफुलांसह फांदी, (२) फूल, (३) किंजपुटाचा उभा छेद.      आ. २. सेरॅटोफायलम : (१) फांदी, (२) पान, (३) पुं-पुष्प, (४) केसरदले, (५) स्त्री-पुष्पाचा छेद, (६) फळ..   आ. ३. नायास : (१) फांदी, (२) पान, (३) पुं-पुष्प, (४) स्त्री-पुष्प, (५) बीज.वनस्पतींना प्लवमान, तर उथळपाण्यात वाढत असल्याने वनस्पतीचातळचा भाग पाण्यात व उरलेला भागहवेत राहिलेला असणाऱ्यावनस्पतींना जलस्थलवासी म्हणतात.निमग्न वनस्पती निलंबित(लोंबकळत्या अवस्थेत) किंवापाण्याखालच्या जमिनीत रोवलेल्या,तर प्लवमान वनस्पती मुक्तपणेतरंगणाऱ्या किंवा तळाशी रोवलेल्या असतात. पाण्यातील काही ⇨शैवले  आणि एलोडीया  (आ. १),ऑटेलिया  (आ. ४), हायड्रिला, ⇨सवाला  (टेप ग्रास), सेरॅटोफायलम  (आ. २), नायास (आ. ३) इ. निमग्नअसतात अंबुली, काही शैवले, ⇨पाणकणीस, पॉलिगोनम, एक्विसीटम  व मार्सिलिया [→ जल नेचे] इ.जलस्थलवासी व ⇨ शिंगाडा, पोटॅमोजेटॉन नटान्स (आ. ५), ⇨ डकविड (लेम्ना  व वुल्फिया), केसर(जुसिया रेपेन्स) (आ. ६), पाण्यातील हायसिंथ, युट्रिक्युलेरिया (गेळ्याची वनस्पती), ⇨ गोंडाळ, ⇨ कुमुद,सॅल्व्हिनिया, ॲझोला  [→ जल नेचे] इ. प्रमुख प्लवमान होत.

 आ. ४. ऑटेलिया : पानाफुलांसह वनस्पती.      आ. ५. पोटॅमोजेटॉन नटान्स : पाने व कणिश फुलोरा असलेली फांदी.    आ. ६. केसर (जुसिया रेपेन्स) फांदी : (१) श्वसनमुळे, (२) पाने, (३) फूल.


जलवनस्पतींना जास्त पाणी व कमीऑक्सिजन अशा परिस्थितीत रहावे लागत असल्याने त्यांच्या आकारमानात व शारीरिक संरचनेत बराचबदल झालेला आढळतो. त्या ओषधीय [→ ओषधि] व नरम असतात. काही मूलहीन (उदा.,सेरॅटोफायलम, युट्रिक्युलेरिया) असून निमग्न वनस्पतींत मूलतंत्राची वाढ फार कमी असते तेशाखाहीन किंवा अल्पशाखीय असते. मूलरोमांचा (मुळावरील शोषक केसांचा) व मूलत्राणाचा (मुळाच्याटोकावरील टोपीसारख्या आवरणाचा) येथे पूर्ण अभाव असतो. काही जातींत (उदा., लेम्ना ) मूलत्राणाचीजागा मूलगोपांनी (पिशवीसारख्या टोपणांनी) घेतलेली असते. जलस्थलवासींत व प्लवमान जातींतमूलतंत्र अल्पशाखीय व अल्परोमयुक्त (कमी लवदार) असते. जुसिया रेपेन्स (हिं. केसर) च्या खोडापासूनकाही आगंतूक मुळे हवेत वाढतात व श्वसनाचे कार्य करतात (आ. ६ श्वसनमुळे). ती फुगीर ववायुकोटरयुक्त असतात. शिंगाड्याच्या खोडावरच्या तंतु-मुळांसारख्या अवयवांबद्दल मतभेद आहेत.जलवनस्पती पाण्यात वाढत असल्याने पाण्याशी संलग्न असलेल्या सर्व भागांवरील ⇨ अपित्वचेद्वारे(सर्वांत बाहेरील पेशींच्या थराद्वारे)

त्यांना पाणी शोषता येते वत्यामुळे पाणी शोषण्याचे मुळांचे कार्य गौण ठरून बऱ्याच वनस्पतींतत्यांना फक्त जमिनीत धरून ठेवण्याचे कार्य मूलतंत्र करीत असते.यांचे खोड बहुधा लांब कांड्यांचे व हिरवे असते, किंवा त्याचेरूपांतर तिरश्चर (खोडांपासून निघून जमिनीत वाढणारी दुर्बलफांदी), अपप्ररोह [ धावते → गोंडाळ] किंवा मूलक्षोड [→ खोड]यांत झालेले असून पांढरे किंवा तपकिरी असते. निमग्नजलवनस्पतींची पाने पातळ, लहान, लांब व अरुंद किंवा खंडितअसतात. यामुळे त्यांचा पाण्याच्या हालचालीला विरोध न होताजास्तीत जास्त शोषण होते. प्लवमान जलवनस्पतींत ती सापेक्षतःमोठी, अखंड, गोलसर असतात. जलस्थलवासींच्या काही जातींतसर्व पाने सारखी तर इतरांत पाण्यात राहणारी पाने निमग्नवनस्पतीसमान व हवेतील पाने स्थलवनस्पतीसमान असतात,याला विषमपर्णत्व म्हणतात. उदा., सॅजिटॅरिया, रॅनन्क्युलस, लिम्नोफिला, निंफिया, इ. वंशातील काही जाती.

जलवनस्पतींच्या पाण्यात बुडालेल्या सर्व भागांवरील अपित्वचेच्या कोशिकांचा थर पातळ असून त्यावर ⇨उपत्वचेचा  थर नसतो. खोड वपाने यांच्या अपित्वचेच्या कोशिकांत (पेशींत) हरितकणू असतात व त्यायोगे अपित्वचेतही प्रकाशसंश्लेषणाचे (सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात

हरितद्रव्याच्या मदतीने अन्ननिर्मितीचे) कार्य होते. निमग्न वनस्पतींच्या खोडांवर तसेच पानांवर त्वग्रंध्रे(अपित्वचेतील सूक्ष्म छिद्रे) नसतात. प्लवमान वनस्पतींच्या पानांच्या वरच्या पृष्ठभागांवर वजलस्थलवासी वनस्पतींच्या पाण्याबाहेरील पानांच्या कोणत्याही एका किंवा दोन्ही पृष्ठभागांवर वखोडावर त्वग्रंध्रे असतात. पाण्यातील खोड व पाने केशहीन तर पाण्यावरचे भाग केसाळ असतात. निमग्नपानांच्या संरचनेत स्कंभोतक व विरलोतक [→ शारीर, वनस्पतींचे] स्पष्ट नसतात, तर पाण्याबाहेरीलकिंवा पाण्यावर तरंगणाऱ्या पानांतील मध्योतकात (खालील व वरील अपित्वचेच्या मधल्या भागातील अन्ननिर्माण करणाऱ्या मृदूतकात) हे भाग स्पष्ट असतात. पाण्यातील भागांच्या अपित्वचेपासून श्लेष्मद्रव्य(बुळबुळीत पदार्थ) स्रवत असल्याने ते भाग बुळबुळीत असतात. मूळ, खोड, पाने व इतर भागांत⇨वायूतकाचे प्रमाण जास्त तर ⇨दृढोतक  व ⇨प्रकाष्ठ  यांचे प्रमाण फारच कमी असते. या ऊतकामुळे(समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहामुळे) ह्या वनस्पतींना त्यांच्या श्वसनक्रियेस आवश्यकअसलेला ऑक्सिजन व प्रकाशसंश्लेषणाकरिता जरूर तो कार्बन डाय-ऑक्साइड वायुकोटरात साठवितायेतो तसेच यामुळे वनस्पती पाण्यात तरंगतात. तरंगणाऱ्या पानांच्या वरच्या पृष्ठभागांवर तसेच पाण्यातयेणाऱ्या कळ्या, फुले व इतर भागांवर मेणाचा पातळ थर असल्याने त्या भागांचे पाण्यापासून संरक्षण होते,तसेच पानांवरील त्वग्रंध्रे पाण्याने चोंदून राहत नाहीत. फळांच्या आवरणात तसेच त्यांना आच्छादणाऱ्याइतर भागांत वायुकोटरे असल्याने ती पाण्यावर तरंगतात. या वनस्पतींत द्वितीयक वृद्धी (खोड व मुळे

यांची लांबी वाढणे बंद झाल्यावरत्यांच्या व्यासात होणारी वाढ) नसते. वायुकोटरात पाणी शिरल्यामुळे हवामार्ग बंद न व्हावे म्हणून त्यातमधूनमधून मध्यपट (मधले विभाजक पडदे) असतात.

निमग्न जलवनस्पतींतील सेरॅटोफायलमसारख्या काही वनस्पतींत फुले पाण्यातच येतात व तेथेच त्यांचे ⇨परागण  होते. सवालासारख्या जातीत व प्लवमान वनस्पतींत पाण्याच्या पृष्ठभागावर फुले येतात व वायू,पाणी, भुंगे, पक्षी व तत्सम इतर वायवी माध्यमांच्या साहाय्याने परागण होते. जलस्थलवासी वनस्पतींत फुलेनेहमी हवेतील भागातच येतात. पाण्यात उमलणारी फुले लहान रंगहीन व गंधहीन असतात, तर पाण्यावरयेणारी लहान किंवा मोठी पण आकर्षक व गंधयुक्त असतात. जलवनस्पतींत फळांचे व बियांचे विकीरण(पसरवणे) पाण्याकरवी होते. फुले व फळे यांच्या निर्मितीचे प्रमाण जलवनस्पतींत कमी असून शाकीयप्रजोत्पादन (पान, खोड यांसारख्या अवयवांपासून वनस्पतीनिर्मिती) अधिक प्रमाणात आढळते. वर्षातीलकाही काळ जोमाने वाहणाऱ्या पाण्याखाली, खडकास चिकटून वाढणाऱ्या काही वनस्पतींत ⇨पोडॉस्टेमोनेसीत  विशेष प्रकारच्या अनुयोजनात्मक संरचना आढळतात.

जलचरांचे मुख्य खाद्य जलवनस्पती असून स्थलवासी वनस्पतींपेक्षा एकंदर जास्त अन्न जलवनस्पतींपासूनतयार होते. ‘जलशैवलापासून खाद्यनिर्मिती’ हा आजच्या अन्नधान्य समस्येवर तोडगा असून त्यावर अधिक संशोधन चालू आहे.

पहा : उतके, वनस्पतींतील जल नेचे नेचे पोडॉस्टेमोनेसी शारीर, वनस्पतींचे शैवले हायड्रोकॅरिटेसी.

संदर्भ : 1. Billings, W. D. Plants and Ecosystems, London, 1964.

   2. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

   3. Sculthorpe, C. D. The Biology of Aquatic Vascular Plants, London, 1967.

घन, सुशीला प.