चतर्जी, अधरकुमार : (२२ नोव्हेंबर १९१४ —  ). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. कटक, बारीसाल व कलकत्ता येथे शिक्षण घेतल्यानंतर शाही हिंदी नौसेनेत कॅडेट म्हणून १९३३ मध्ये प्रवेश १९४० मध्ये

ॲडमिरल अधरकुमार चतर्जी

पाणबुडीविरोधतंत्रज्ञ म्हणून प्रशस्ती मिळाली. ऑगस्ट १९४७ मध्ये भारतीय नौसेनीय योजना संचालक म्हणून नियुक्ती. जुन १९५० मध्ये कॅप्टन अधिकारश्रेणी मिळून ‘दिल्ली’ या युद्धनौकेचे ते प्रमुख अधिकारी झाले. डिसेंबर १९५० ते जानेवारी १९५३ इंग्लंडमध्ये भारतीय हायकमिशनरचे नौसेना सल्लागार. १९५७ मध्ये इंपीरिअल संरक्षण महाविद्यालयात उच्च शिक्षण. १९५८ मध्ये ते रिअर ‍ॲडमिरल झाले. १९६२—६६ दरम्यान भारतीय नौसेनेचे सेनापती म्हणून त्यांनी काम केले. मार्च १९६६ मध्ये ते नौसेनाप्रमुख झाले. १९६८ मध्ये त्यांस ‍ॲडमिरल हा अत्युच्च दर्जा मिळाला. १९७० मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

दीक्षित, हे. वि.