झाबुलीस्तान: अफगाणिस्तानातील गझनी प्रांताला अरब भूगोलवेत्त्यांनी दिलेले नाव. चीनच्या बादशाहाने इ.स. ७१३ मध्ये आपल्या साम्राज्याच्या सीमेवरील ज्या संस्थानांना अरबांच्या विरुद्ध मदत केली त्यांत हे संस्थान होते. या संस्थानांनी मुसलमानी धर्माला व प्रचारकांना विरोध केला होता. सध्या अफगाणिस्तानात झाबुल व गझनी असे दोन वेगवेगळे प्रांत आहेत.
सावंत, प्र. रा.