जॉस : मध्य नायजेरियातील बेन्वे प्लॅटो राज्याची राजधानी. लोकसंख्या १,१२,९१२ (१९७२ अंदाजे). पठारावर १,२२० मी. उंचीवर बसलेले हे शहर जॉस–कानो लोहमार्गावर कानोच्या दक्षिणेस सु. २२९ किमी. आहे. ह्या शहराच्या आसमंतात विपुल कथिल सापडते. तसेच येथे लोणी बनविण्याचा कारखाना आहे. मध्य आफ्रिकेत असूनही उंचीमुळे ह्या शहरात यूरोपीयांची पुष्कळ वसती आहे. येथे विमानतळही आहे.

लिमये, दि. ह.