कनकदास : ( १५०९ – १६०७).एक कन्नड वैष्णव संतकवी.जन्म धारवाड जिल्ह्यातील बाड गावी.जातीने तो बेड( किरात) किंवा धनगर असावा, अशी मते आहेत.त्याचे माता-पिता बचम्मा व बीरप्प.कनकदास वंशपरंपरेने विजयानगरच्या राजाच्या पदरी दंडनायकाच्या हुद्यावर होता.एका लढाईतील पराजयामुळे त्याचे मन संसारास विटले. वैराग्यप्राप्तीनंतर तो ‘दासकूटा’ त( वैष्णव-संघ) समाविष्ट झाल्याचे सांगतात.धारवाड जिल्ह्यातील कागिनेले येथील आदिकेशवदेव हे त्याचे आराध्य दैवत होते.मध्वाचार्यांच्या वैष्णव संप्रदायाचे त्या काळातील श्रेष्ठ यती व्यासराय यांनी पुरंदरदासासोबतच कनकदासासही आपला शिष्य करून घेतले व‘ दास ’ दीक्षा दिली, असे सांगतात.हरिकीर्तनांत त्याची नाममुद्रा ‘कागिनेलेयादिकेशव’ अशी आहे. तो प्रथम रामानुजपंथी होता परंतु नंतर मध्वमतानुयायी झाला, असे म्हणतात.

कनकदासाची कीर्तने उपलब्ध असून ती अत्यंत लोकप्रिय आहेत.त्यांत जातिभेद व तत्कालीन सामाजिक रूढींवरील कठोर टीका तसेच लोकसुधारणेची कळकळ दिसून येते.सर्वसमर्पणभावाने केलेल्या विष्णुभक्तीचा त्याने पुरस्कार केला.स्वतःच्या जीवनाचे सारसर्वस्व विष्णूच आहे, अशी त्याची अढळ श्रद्धा होती.त्याची अनेक पदे उत्कट हरिभक्तीने ओथंबलेली असून त्यांत आध्यात्मिक खोलीही आढळते.ह्या पदांशिवाय त्याच्यानृसिंहस्तवन,मोहनतरंगिणी,रामधान्यचरित्रे,हरिभक्तिसारआणिनळचरित्रेया रचनाही प्रसिद्ध आहेत.कन्नड हरिदास( वैष्णव) साहित्यात⇨पुरंदरदासानंतर( १४८० — १५६४) कनकदासाचेच नाव घेतले जाते.

मळगी, से.रा.(क.) कायकिणी, गौरीश (म.)